जगदंबा तलवार
तलवारी संबंधीची करवीर संस्थानातील नोंद -
पंतप्रधान सरकार कदीम करवीर, शस्त्रागार तर्फे रावबहाद्दूर दादासो सुर्वे
नोंदणी जीनस – जगदंबा तलवार
जिनसाचे नाव | डाग आकार सहित | तपशील दास्तान | चालूकडे
तलवार सडक | १९७-११ | १९७-११ | हल्ली नाही
जगदंबा मेणावर
तपशील – नाकीत्यास हिरे ६,माणके ४४ ,पाचा १०
एकूण पराज हिरे १३,पाचा १८ , माणके ४६७
मिळून सबंध तलवार.
चौथे शिवाजी – प्रतापसिंहराजे भोसले यांनी हि तलवार प्रिन्स ऑफ वेल्स याला भेट दिल्याचे सांगण्यात येते.
भवानी तलवार – शिवछत्रपतींनी वापरलेल्या अनेक तलवारींपैकी हि एक, परमानंद नेवासकर कृत शिवभारत मध्ये “मी तुझ्या तलवारीमध्ये आशीर्वाद बनून राहीन” अश्या अर्थाचा श्लोक होता, त्याचे नंतर भवानी आईने तलवार दिली असे रुपांतर झाले.असो…
तर हि भवानी तलवार रायगड पडला तेव्हा झुल्फिकार खानच्या हातात पडली असावी.त्याचवेळी शाहू छत्रपती,येसूबाई राणीसाहेब व इतर लोक कैद झाले.औरंगजेबाने येसूबाई आणि शाहू महाराजांची विशेष बडदास्त ठेवली येसूबाई यांना स्वतः चा शिक्का व चरितार्थासाठी काही वतने दिली,तसेच शाहूंना “सरकार राजा शाहू ” अशी पदवी दिली.
नंतरच्या काळात शाहू महाराज मोठे झाल्यावर औरंगजेबाने त्यांचे धर्मांतर करण्याचे ठरविले परंतु शाहू आणि येसूबाई राणी साहेबांनी त्यास विरोध दर्शविला त्यामुळे औरंगजेबाने तो विचार सोडून दिला आणि शाहूंचे लग्न बहादुर्शहा च्या मुलीशी लावले
त्या लग्नप्रसंगी औरंगजेबाने भवानी तलवार,अफझलखानची तलवार आणि काही रत्ने शाहूंना भेट दिली.नंतर हीच तलवार शाहू महाराजांबरोबर सातार्यात आली,तीच तलवार सातारा छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर मध्ये आहे.त्यावर ‘सरकार राजा शाहू’ असे कोरले आहे.
तुळजा तलवार - तिसरी तलवार म्हणजे सिंधूदूर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदीरातील तुळजा फिरंग ही तलवार.सहजी महाराजांनी ती तलवार शिवाजी महाराजांना दिली असे सांगण्यात येते. यापैकी तिसरी तलवार असण्याची शक्यता इतिहास संशोधकांनी वर्तवल्यामुळे या तलवारीचं महत्त्व वाढलं आहे. या तलवारीला जतन कराण्यासाठी ती काचेच्या पेटीत ठेवण्यात आली आहे. तसेच पूजेसाठी तिची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे.
संदर्भ साभार – भवानी तलवार ब्लॉग
महाराष्ट्र टाईम्स
रॉयल एशियाटिक सोसायटी
औरंगजेबाचे अखबार
शिवकालीन शस्त्रे – पुरंदरे
थोडक्यात लंडन येथील तलवार ही "भवानी" तलवार नसून "जगदंबा" तलवार आहे. याचा दुजोरा ज्येष्ठ इतिहास संकलक श्री आप्पा परब Shri Appa Parab Noted History Complier सुद्धा देतात . सातारा जलमंदिर राजवाड्यात "भवानी" तलवार आहे. लंडन येथे जगदंबा तलवार आहे. छत्रपती शंभूजी यांना ठार केल्यावर जुल्फिकार खानाने रायगड घेतला. तेव्हा महाराणी येसूबाई आणि युवराज शाहू यांना बंदी बनवण्यात आले. तेव्हा "भवानी" तलवारही जप्त करून औरंगजेबाला नजर करण्यात आली. पुढे औरंगजेबाने आपल्या अखेरचे दिवस ओळखून मराठ्यां मध्ये दुही माजवी म्हणून युवराज शाहूंना "भवानी" देऊन मुक्त केले. म्हणजेच थोडक्यात त्यांनी युवराज शाहूंना छत्रपती शिवरायांची तलवार देऊन "छत्रपती" म्हणून मान अप्रत्यक्ष दिला. थोड्यात सातारा गादीकडे "भवानी" आली. त्यामुळे कोल्हापूरचे छत्रपती चौथे शिवाजी यांनी ति प्रिन्स ऑफ वेल्सला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. लंडन येथील संग्रहालयात "जगदंबा" आणि सातारा जलमंदिर येथे "भवानी" आहे.

No comments:
Post a Comment