महाराष्ट्र हा किल्ल्यांचा देश आहे. याच महाराष्ट्रातील काही उत्तम किल्ल्यांमध्ये देवगिरी किल्ल्याची गणना होते.
सभासदाने याचे वर्णन ‘‘ दुर्गम दुर्ग देवगिरी हा पृथ्वीवरील चखोट गड खरा परंतु तो उंचीने थोडका ’’असे केलेले आहे. या देवगिरी पूर्वी "सुरगिरी" या नावाने देखिल ओळखला जात असे.
राजा भिल्लम यादवाने बांधलेल्या या राजदुर्गाची प्रतिष्ठा आणि एश्वर्य इंद्रनगरीशी स्पर्धा करीत होते, असेही देवगिरीचे वर्णन आढळते. या देवगिरीची "देवगड व धारगिरी" अशी ही नावे आढळतात.
पुढे मोगलांचे यावर आक्रमण झाल्यावर याचे नाव ‘ दौलताबादचा किल्ला ’ म्हणून प्रसिध्द झाले.
#पहाण्याची ठिकाणे :
हत्ती तलाव, भारतमाता मंदिर , चॉद मिनार, कालाकोट देवगिरी
#पोहोचण्याच्या वाटा :
देवगिरीचा किल्ला औरंगाबाद - धुळे रस्त्यावर औरंगाबाद पासून १५ किमी अंतरावर आहे. या दौलताबादला जाण्यासाठी औरंगाबाद-धुळे, औरंगाबाद - कन्नड, चाळीसगाव, खुलदाबाद अशी कोणतीही एसटी चालते. या शिवाय औरंगाबादहून अनेक खाजगी जीप आणि वाहने दौलताबादला जातात.
साभार : ट्रेक क्षितीज

No comments:
Post a Comment