Friday, 27 February 2015



शिवरायांची प्रतिभा ही अतिशय उत्तुंग होती हयात कणभरही संशय नाही. शिवरायांच्या अंगभूत गुणांची बरोबरी तर सोडाच त्याचे एक दशमांश सुद्धा आज कोणात सापडणार नाही हे अगदी सत्य आहे.

किंतु, "शिवरायांना ' कुळवाडीभूषण रयतेचा राजा ' हे विशेषण महात्मा जोतिबा फुले यांनी दिले" ह्याचा जर आधार दिला असता तर फार बरे झाले असते. कारण माझ्या वाचनात आलेल्या फुलेंच्या 'सार्वजनिक सत्यधर्मपुस्तक' हयात तर फुलेंनी शिवरायांना अक्षरशून्य असे उद्बोधुन त्यांनी समर्थ रामदासांच्या कपटजालात फसून शुद्र-अतिशुद्रांच्या ईश्वराने पाठवलेल्या मसीहा मुसलमानांचा पाठलाग केला; असे लिहिलेले मिळाले. मग फुलेंनी शिवरायांना 'कुळवाडीभूषण रयतेचा राजा' हे विशेषण लावले असे म्हणणे हे खुद्द फुलेंना दुतोंडी ठरवते. जे मला तरी उचित वाटत नाही. असो....

"ज्योतिबा फुले ह्यांच्यामुळे जगाला शिवराय माहीत झाले" हां दावा तर अतिशय चुकीचा व जणू शिवरायांच्या प्रतिभेलाच धक्का लावण्याचा अपराध आहे. कारण शिवराय जेव्हा हयात होते तेव्हाच; अर्थात फुले जन्माला येण्याच्या २०० वर्षे आधीच अफझल्याला यमसदनी धाड़ले तेव्हाच शिवरायांची किर्ती जगभर पसरली होती.. अक्षरशः इंग्लंडच्या वृत्तपत्रात त्यांची बातमी छापून आली होती. आणि ५ मोठ्या पातशाह्यांना धुळ चारुन महाबलाढ्य असे हिंदु साम्राज्य निर्माण करून तत्कालीन बहुतांश राजशक्तींच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत शास्त्रोक्त पद्धतीने स्वतःचा राज्याभिषेक करवणार्या व महाराष्ट्रातीलच नव्हे; तर अखिल हिंदुस्थानातील जनमानसावर विलक्षण छाप सोड्णार्या शिवरायांची जगाला ओळख करून दिली हे म्हणणे म्हणजे एखाद्या अफ्रीकन जंगलात राहणार्या कृष्णवर्णी मनुष्याने सुर्याला तेलाचा दिवा दाखवण्यासारखे आहे.

तसेच ज्या फुलेंनी शिवरायांची ओळख जगाला करून दिली असा दावा केला जातोय त्यांनी आपल्या अख्ख्या आयुष्यात शिवचरित्राचे किती पारायण केलेत, त्यावर किती व्याख्यान दिलीत? कारण त्यांनी शिवचरीत्राला जनमानसात पोहोचवण्यासाठी खुप काही कयास घेतले हे सिद्ध करणारा एकही समकालीन पुरावा नाही.

मुळात बहुतांश गोष्टी ह्या तथ्यहीन व केवळ कोरे आरोप आहेत ज्यांचा एकही समकालीन पुरावा उपलब्ध नाही. जसे की; "छञपती शिवरायांनासुध्दा धर्माच्या नावाखाली शुद्र ठरविले होते. राज्याभिषेक नाकारला होता" ह्याला एकही समकालीन पुरावा उपलब्ध नाही.

"महात्मा फुलेंना एक इंग्रजी अधिकारी लिजिट साहेब यांनी इंग्रजीमध्ये असलेला छञपती शिवरायांचा इतिहास थोडाफार सांगितला होता. त्यांना शिवरायांबद्दल उत्सुकता निर्माण झाली".... मुळात; ज्या इंग्रजांना शिवरायांनी आपल्या स्वराज्याच्या सरहद्दीत एक इंचही घुसू दिले नाही... ज्यांना कधी उभेही केले नाही... त्या इंग्रजाकडून शिवचरीत्र समजले; ते ही महाराष्ट्रातच जन्मलेल्या एका महाराष्ट्रीयन माणसाला.... हे म्हणजे महताश्चर्यच म्हणावे लागेल... ह्याचा अर्थ असा निघतो की हां माणूस एकतर कधीही महाराष्ट्राच्या मातीशी जुडला नसावा; किंवा त्याला शिवरायांविषयी फार काही आपुलकीच नसल्याने त्याने त्यांच्या चरित्राविषयी कधी अभ्यास केला नसावा, अन्यथा त्याला आपल्या स्वजनांवर विश्वास नसावा.

"टिळकांनी फुलेंच्या सामाजिक क्रांतीला धर्मप्रतीक्रांतीत परावर्तित केले आणि बहुजन राजा ब्राम्हणी बंदीगृहामध्ये बंदिस्त केला" हां तर अतिशय हास्यास्पद दावा आहे... कारण स्वतः फुलेंनी आपल्या पोवाडयात समर्थ रामदास स्वामींना शिवरायांचा गुरु संबोधून त्यांनी शिवरायांना उत्तेजित केल्याने ते मुसलमानांच्या पाठीमागे लागले असा दावा केलाय... ह्याचा अर्थ; स्वतः फुले हे मानतात की शिवराय ज्याला वर लेखकाने ब्राम्हणी धर्म संबोधले आहे त्या सनातन हिंदु धर्मासाठी मुसलमानांविरोधात लढले (ज्यांना फुले आपले मसीहा मानतात). पुन्हा; शिवरायांच्या समकालीन सर्व साहीत्यात; मग ते कवी भूषण ह्यांच शिवभूषण असो, की स्वामी परमानंदांच शिवभारत असो, की सभासद बखर असो, प्रत्येकात हे जागोजागी अगदी स्पष्ट जाणवते की शिवराय हे ज्याला वरील लेखक ब्राम्हणी धर्म म्हणून उपालंभ देतोय त्या सनातन हिंदु धर्माचे परम निष्ठावान, कट्टर पुरस्कर्ते व त्याला मानणारे होते.... ह्या संबंधी बरेच आधारभूत प्रसंगही शिवचरीत्रात सापडतात... जाणकारांना जास्त बोलणे न लगे.

आणि जे इंग्रज जगभर स्वतःच्या कपटपूर्ण निती विषयी जगभर प्रसिद्द होते; व ज्यांनी शिवरायांना नेहमी एक शत्रु म्हणूनच पाहीले, त्या इंग्रजाकडून कोणत्या प्रकारचे शिवचरीत्र शिकले असावे हे स्पष्टच आहे.... व अशा माणसाकडून शिवचरीत्र शिकून काय धारणा बनणार हे ही अगदी स्पष्ट आहे.

आता राहीला शेवटचा व सर्वात महत्वाचा मुद्दा.... शिव-समाधी शोधाचा.. तर त्यावर अखेरचे २ शब्द....

शिव-प्रभुंची समाधी जेथे आहे ते रायगड ही शिव-प्रभुंनी स्थापन केलेल्या हिंदु साम्राज्याची राजधानी.. तेव्हा १६७४ मध्ये शिवराज्यभिषेकापासून ते १८१८ मध्ये इंग्रजांकडून झालेल्या मराठेशाहीच्या पतनापर्यंतच्या एकुण १५० वर्षात फार तर मधले एक ते दीड दशक सोडले तर (जेव्हा रायगड जंजीऱ्याच्या सिद्दीकड़े होते व नंतर १७३५ मध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांनी पहिल्या छत्रपती शाहुंसाठी तो जिंकुन दिला), बहुतांशी रायगड हे शिव-प्रभुंच्या वंशजांकड़े, अर्थातच मराठ्यांकड़ेच होते. त्यामुळे आणि शिवप्रभुंच्या व्यक्तिमत्वाविषयी महाराष्ट्रातील असलेला जनमानसातील स्नेह व आदर भाव पाहता पुढील ३०-४० वर्षातच शिव-प्रभुंची समाधी हरवणे किंवा विस्मृतीत जाणे कदापि शक्य नाही.

पुन्हा; १८१८ मध्ये इंग्रजांसमोर मराठ्यांच्या पतनानंतरही जो तह झाला तो सातार्याची गादी व इंग्रज यांच्यात झालाय.
त्यावेळी अजिंक्यतारा, रायगड व परळीचा किल्ला याचा ताबा सातारकरांनी स्वत:कडे ठेवला होता.

अजिंक्यतारा- निवासस्थान
परळीचा किल्ला- गुरूस्थान
रायगड- राजधानी.

ह्याचा अर्थ; १८१८ नंतर ही बऱ्याच काळ रायगड हे सातारा गादीकड़े होते; जे की शिव-प्रभुंचेच वंशज होते ...

त्यामुळे समाधी न तर हरवली होती न विस्मृतीत पडली होती... हां केवळ एक खोटा प्रचार आहे... अप-प्रचार.... तसेही समाधी काही कोणाच्या खिशातील पाकीट किंवा एखाद वस्तु नाही की हरवेल.... व जिचा शोध लावावा लागेल....

मुळात, सदोदितच्या युद्धजन्य स्थितीमुळे व इंग्रजांनी केलेल्या तूफ़ान मार्याने रायगडची पडझड झालेली होती... आणि जे रायगडाने झेलले तेच काही प्रमाणात समाधीने ही... त्यामुळे समाधीची वास्तू थोड़ी जीर्ण झाली होती.... जिचाच जीर्णोद्धार पुढे १९१३ मध्ये टिळकांनी पुढाकार घेऊन करवून घेतला. त्याचे छायाचित्र आजही उपलब्ध आहे.

किंतु; काही हिंदु धर्म-द्रोही व ब्राम्हण-द्वेषी उपटसुंभ प्रवृत्तींना एका ब्राम्हणाला मिळत असलेले हे श्रेय पाहवले नाही... व त्यांनी समाधी शोधाची काल्पनिक स्टोरी बनवून तीचा प्रचार केला... मुळात, फुलेंच्या समाधीच्या शोधाचा एकही समकालीन ऐतिहासिक पुरावा उपलब्धच नाही.. जसे की एखादे तेलचित्र, किंवा एखाद्या वर्तमानपत्रात बातमी.... किंवा फुलेंच्या एखाद्या सोबतीने आपल्या लिखाणात कुठे नमूद केलेले त्याचे वर्णन वगैरे....

त्यामुळे त्यांच्या समाधी-शोधाचा हां दावा पूर्णपणे फोल असून त्यामागे द्वेषपूर्ण वृत्तीने रचलेले कारस्थान मात्र आहे.... तेव्हा असा हां खोटा इतिहास व अप-प्रचार त्वरीत थांबवावा ही विनंती...

हर हर महादेव जय श्रीराम
जय भवानी जय शिवाजी......!!!!

पाचाडचा जिजाबाईंचा वाडा : -
उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाडाची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास ‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात.

तोफा बद्दल थोडसं...
बांगडी तोफेची नाळ घडीव लोखंडापासून केलेली असते. लोखंडी गोलावर पट्ट्या एका आधारावर रचून त्यावर लोखंडी धाव गरम असताना चढवली जाते. थंड झाल्यावर ही धाव चप पट्टयांमधील जागेवर सांधली जाते. अशा अनेक धाव जोडून तोफेची नाळ तयार करत.तोफेच्या मागच्या आणि पुढच्या बाजूस अधिक बळकटी यावी म्हणून जास्तीच्या धावा साधण्यात येत असे.
जंजिर्यामधील कलाल बांगडी तोफेच्या रचनेत लोखंडी पट्टयांचा वापर दिसून येत नाही पण मुल्हेर येथील शिवप्रसाद / रामप्रसाद या तोफांमध्ये लोखंडी पट्ट्या वापरलेल्या दिसतात.
चारशे वर्षापासून असलेल्या बांगडी तोफा पुरातन हिंदुस्तानी कारागिरांच कौशल्य सिद्ध करतात.

- इतिहासाच्या झरोक्यातून...


औरंगजेबला महाराजांची धास्ती

इ.स.१६६६ दरम्यान शिवाजी महाराज आग्रा कैदेत असतांना त्यांच्या भीतीने औरंगजेब आग्र्‍याच्या किल्ल्यातून समोरच असलेल्या जामा मशिदीत नमाज पढावयास जातांना इतका प्रचंड आरक्षक व्यवस्था (बंदोबस्त) ठेवतो, याचे त्या वेळी सर्वांनाच आश्चर्य वाटले होते; पण शिवाजीराजांच्या भीतीपोटी तो असे करत असे, याचा उल्लेख राजस्तानी पत्रात आहे.

संदर्भ : Shivaji's Visit to Aurangzib at Agra -सर जदुनाथ सरकार

#आग्रा_भेट_प्रकरण
#आवर्जून_वाचावे_असे_काही

“मावळा” काल आणि आज...
१९ फेब्रुवारी १६३०,नाही.. १६२७ कदाचित पण मला वाटत १६३० ठीक. हा प्रश्न मलाच नाही तर समस्त शिवप्रेमी मावळ्यांना पडला आहे कि महाराजांचा जन्म कधी झाला.आणि त्यांचा जन्म दिवस तिथी नुसार साजरा करायचा कि तारखे नुसार...??? असो..
“१९ फेब्रु.१६३०” साली महाराष्ट्राच्या भूमीवर देव देश धर्म रक्षणार्थ साक्षात महादेवाने शिवरायांच्या रुपात जन्म घेतला आणि बघता बघता आईसाहेब जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाने शिवरायांनी स्वतःच्या मनगटाच्या बळावर श्रींच हिंदवी स्वराज्य म्हणजे रयतेच राज्य स्थापन केलं.
६ जून १६७४ ला छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक सोहळा पंडित गागा भट्ट यांच्या हस्ते संपन्न झाला आणि रयतेचं स्वराज्य स्थापन झालं.राजसिंहासना कडे महाराजांची पाऊले चालत असतांना पहिल्या पायरीवर महाराजांचे चरण स्पर्श होताच महाराजांच्या कानावर आवाज आला राजं... महाराजांनी आवाजाच्या दिशेला नजर टाकली तर त्यांना दिसला तो मावळा तानाजी मालुसरे त्यांना आठवण झाली ती “राजं आईसाहेबांचं स्वप्न हाय नवं कोंढाणा स्वराज्यात आणायचा असं मग आधी लगीन कोंढाण्याच आणि मग माझ्या रायबाचं” स्वतःच्या पोटच्या पोराचं लग्न बाजूला ठेवून स्वराज्यासाठी कोंढाणा काबीज करायला गेलेला तानाजी परत आलाचं नाही.गड आला पण सिंह मात्र गेला. महाराजांनी दुसरी पायरी चढली आणि तितक्यात त्यांच्या चरणाला स्पर्श केला तो न्हाव्याच पोरग मावळा शिवा काशीदनं तो म्हणाला महाराज तुमची कापड अंगावर घातली आणि हा देह पवित्र झाला. भाला छातीत आरपार घुसला व्हता बघा, पण तरीबी आम्ही झुकलो नाय कारण डोक्यावर जिरेटोप होता नं राजं.शिवाजी महाराज म्हणून मरण आलं धन्य झालो आम्ही आमच्या जिवनाच सार्थक झालं.शिवा काशीद सारखा मावळा महाराजांना भेटला आणि त्याने शिवरायांचे रूप धारण करून मोघलांच्या छावणीत घुसून महाराजांच्या छातीवरील घाव स्वतःच्या छातीवर झेलून जिवनाचं सार्थक केलं
महाराज सिंहासनाच्या जवळ आल्या नंतर महाराजांच्या समोर उभे ठाकले ते म्हणजे मावळा बाजीप्रभू देशपांडे आणि महाराजांना म्हणाले महाराज एका वडीलकीच्या नात्यानं संगतोया कि मुकाट्यान तुम्ही पालखीत बसून विशालगड गाठा तो पर्यंत मी या खिंडीत या मोघलांना अडवून धरतो जो पर्यंत या देहात प्राण आहे तोवर एकबी गनिमाला खिंडीतून पुढे जाऊ देणार नाही.लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगलाचं पाहिजे.आजही हे शब्द त्या खिंडीत गुंजत आहे.इतकाच नाही तर त्या मावळ्यांच्या रक्तान ती खिंड पावनखिंड म्हणून ओळखली जाऊ लागली. असे अनेक मावळे स्वराज्याच्या कामी आले कित्येक मावळ्यांनी स्वतःच आयुष्य स्वराज्याच्या निर्माणासाठी खरची घातलं, मावळ्यांनी शिवरायांना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं आणि स्वराज्याच रक्षण केलं.स्वराज्य उभ केलं स्थापन केलं.
म्हणून आज ४०० वर्षांचा काळ लोटला गेला असतांना सुद्धा त्यांची नाव अभिमानाने घेतली जातात.त्यांच्यावर काव्य आणि पोवाडे रचले जातात.त्यांच्या शौर्याची गाथा सुवर्ण अक्षरात लिहिली जाते.कारण ते स्वामिनिष्ठ स्वभिमानी कडवट मावळे होते. स्वामिभक्ती,स्वामीनिष्ठा आणि स्वाभिमान यांचा अद्-भूत संगम म्हणजे “मावळा” हि व्याख्या लक्षात ठेवा. इतकच नाही तर महाराजांच्या स्वप्नपूर्तीसाठी राष्ट्राच्या आणि स्वराज्याच्या निर्माणासाठी सह्याद्रीसारखं ठाम पणे उभं राहून शत्रूंच्या तलवारीचे घाव आपल्या छातीवर झेलणारे ते म्हणजे मावळेचं हो.या मावळ्यांच्या फौजे मध्ये कोणी एका जाती किंवा धर्माचा नव्हता तर १८ पगड जाती आणि १२ बलुतेदार यांचा समावेश होता.परंतु आता सर्व काही बदललेलं आहे.
एक काळ असा होता कि त्या काळात एका भगव्या झेंड्या खाली सर्व एकजूट होते परंतु आता तर कोणता झेंडा घेऊ हाती ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.कारण आता गल्ली पासून दिल्ली पर्यंत कार्यकर्ते कमी आणि नेते जास्त झालेत.प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार स्वतःचे संघटन उभारले आहे. त्यामुळेचं आजच्या युवा पिढीला देशसेवा आणि राष्ट्रसेवा करण्यात रस राहिलेला नाही.देशात आज अस एकही नेतृत्व नाही कि ज्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याच्याशी एकनिष्ठ राहून देशाची प्रगती साधता येईल.असे असतांना ४०० वर्षपूर्वी याच मातीत जन्माला आलेल्या शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काही मोजकी मंडळी देशाची प्रगती आणि देव देश धर्म रक्षणाची कार्य करत आहेत.ज्याला ते शिवकार्य असं संबोधतात.
आजच्या परिस्थितीचा जर अभ्यास केला ना तर आज फक्त भाषणबाजी सुरु आहे.
जो नाही तो फक्त बोंबलत हिंडत आहे.’’अस करा..तस करा..यांनी अस केल होत..ते असे जगले..आणि स्वतः मात्र काहीच नाही.आजच्या काळात अहो असे वक्ते आहेत कि ज्यांची भाषणे ऐकतांना लोक भावूक होतात,सर्व भान विसरून तल्लीनपणे ते ऐकतात इतकंच नाही तर त्यांच्या डोळ्यातून पाणी सुद्धा येत.अंगावर शहारे उभे राहतात.परंतु ज्या वेळेस कार्यक्रम संपला एकदा काय त्या श्रोत्यांनी त्यांची चड्डी झटकली कि बस..संपलं भाषण उठा आणि निघा.“गाढवा पुढे वाचली कथा आणि कालचा गोंधळ बराच होता” अशी म्हण तेव्हा तिथे लागू पडते.शिवरायांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज फक्त नजरेने त्यांच्या मावळ्यांशी संवाद साधत होते.आणि मावळे सुद्धा तसे निष्ठेचे होते त्यांना आपल्या राजाला काय हव आहे ते लगेच कळत होत.तिथे शब्दांची गरजचं नव्हती कारण तिथे तो संवाद एका गुरुशिष्यांचा असायचा.देव आणि भक्ताचा असायचा.आता मात्र तस काहीच नाही.
एकदा शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले असतांना तिथून सुटका करून घेण्यासाठी महाराजांनी एक योजना आखली त्यांनी गडाच्या पायथ्याशी असलेल्या न्हाव्याच्या पोराला बोलावलं आणि त्याला शिवाजी महाराजांचे रूप धारण करायला सांगितले त्याने आज्ञाप्रमाण म्हणून ताबडतोब राजांसारखा पोशाख परिधान करून समोर आला आणि महाराजांना मुजरा केला.महाराजांनी त्याला बघितलं आणि थक्क झाले कारण तो चक्क शिवाजी महाराजांसारखा दिसत होता.त्याच नाव होत मावळा शिवा काशीद.महाराज त्याला बोलले शिवा तू हुबेहूब आमच्या सारखा दिसतोस ओळखूपण येत नाही आणि इतक्यात तो शिवा काशीद म्हणाला महाराज ज्या अर्थी तुम्ही सुद्धा आम्हाला ओळखू शकत नाही याचा अर्थ तो गनीम सुद्धा आम्हाला ओळखणार नाही.आणि हे शब्द ऐकताच महाराज त्याला म्हणाले शिवा तुला कस माहिती कि आम्ही तुला शिवाजी महाराज बनवून गनिमांच्या भेटीस पाठवणार आहे. तेव्हा शिवा म्हणाला महाराज तुमची जागा आमच्या हृदयात आहे आणि जे तुमच्या मनात आहे ते आम्हास कळणार नाही.आम्हास सर्व कळल आहे आपली फक्त आज्ञा असावी तुम्ही निश्चिंतपणे गड सोडा तो पर्यंत आम्ही गनिमांना अडवून धरतो.अहो हाच तो संवाद गुरुशिष्यांचा. परंतु आता मात्र हा संवाद आपल्याला बघायला मिळत नाही. कारण आताचा गुरु सुद्धा तितका पावरफुल नाही आणि शिष्य सुद्धा तितका निष्ठेचा नाही.
मी सारख सारख शिवाजी महाराजांचा उल्लेख का करत आहे असा प्रश्न सर्वांना पडला असेल तर तुम्हाला एक सांगावस वाटत कि जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराज हे असं एक व्यक्तिमत्व जन्माला आलं कि ज्यांच्यामुळे आज मंदिरात देव,दारात तुळस आणि समाजात स्त्री जातीला मान आहे.जन्माला आलेल्या नवजात शिशूला हे सांगाव लागत नाही आणि त्याच्यासमोर मांडाव सुद्धा लागत नाही कि शिवाजी महाराज कोण होते इथली मातीच त्याच्या हृदयात शिवरायांच्या कीर्तीची शौर्यगाथा आधीच रेखाटून ठेवते.इतक मोठ कार्य कि जे मांडायचं झाल तर सागरा इतकी शाई आणि गगना इतक पान सुद्धा कमी पडेल.आणि असा कर्तव्यदक्ष जाणता राजा या भूतलावर पुन्हा झाला नाही आणि होणार सुद्धा नाही.म्हणून अश्या परमप्रतापी भोसले कुलाधीकुलभूषनंचा उल्लेख कितीदा जरी केला तरी कमीचं.
आणि असही आजच्या पिढीला वेड लागलं आहे हो शिवबाचं ! गाडीवर,टी-शर्टवर, अंगावर(गोंधन), गळ्यात(लॉकेट), हातात(अंगठी) शिवाजी महाराजांना घेवून फिरतांना दिसत आहे.त्यांच्या अश्या वागण्यामुळे त्यांना महाराजांबद्दल किती आदर,प्रेम आणि अभिमान आहे हे दिसून येते मात्र त्यांची कर्म जर बघितली तर मला या सर्व गोष्टींची लाज वाटते आणि राग सुद्धा येतो त्यांच्या अश्या वागण्याचा.
एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती तिथे ४ मावळे सोबत घेवून राजे शिवाजी महाराज सुद्धा होते म्हणजे यांच्या वेशभूषा साकारलेली मुल सुद्धा होती. ढोलताशांच्या गजरात मिरवणूक सुरु झाली.मिरवणूक सुरु असतांना एका मावळ्याने म्हणजे मावळ्याची वेशभूषा साकारलेल्या त्या मुलाने एका दुसऱ्या मुलाला गुटखा दे अशी मागणी केली. तेव्हा त्याच्या सोबतच्या दुसऱ्या मावळ्याने त्याला जाणीव करून दिली अरे तू मावळा आहे ना आणि तंबाखू काय खातो महाराज बघतील ना मागून.तेव्हा ज्याने त्याला गुटखा आणून दिला तो खालचा मुलगा लगेच बोलला अरे महाराज कशाला काही करतील मी महाराजा कडूनच तर गुटखा मागून आणला.ते सर्व बघून डोळ्यात पाणी दाटलं हो, “श्रोत्यांनो हि आजची सत्य परिस्थिती आहे. अहो ज्यांनी स्वतः शिवाजी महाराज आणि मावळ्यांचा वेश धारण केला त्यांना त्यांची महती कळली नाही तर मग मला सांगा अंगावर आणि गाडीवर तसेच शर्ट वर शिवाजी महाराजांचे चित्र किंवा नाव टाकून आपल्याला शिवराय कळणार आहे का ? शिवाजी महाराज डोक्यावर घेवून फिरण्याचा विषय नाही तर डोक्यात उतरवण्याचा विषय आहे हे कळायला हवं.रस्त्याने जात असतांना जर नजरेस महाराजांचे स्मारक दिसले तर आपल मस्तक आपोआप झुकत आणि ते झुकायलाचं हव परंतु आज त्याच स्मारकाच्या खाली उभ राहून मुलींची छेड काढली जाते.यांच्या गाडीवर मागे लिहिलेलं असत आम्ही फक्त शिवरायांचे भक्त तरी मग तुम्ही नेत्यांच्या समोर झुकताच तरी कसे.शिवरायांचा भक्त स्त्रीजातीचा आदर करतो तिचे रक्षण करतो,अन्याय सहन करत नाही, तो न्यायप्रिय असतो. तसेच शिवरायांचा भक्त म्हणजे मावळे यांनी शिवाजी महाराज सोडले तर कधीच कोणत्या राजा पुढे किंवा बादशहा पुढे ते झुकले नाही आणि त्यांनी कधी पाठीवर कुणाची शाब्बासकीची थाप तर मुळीच घेतली नाही.इथे मात्र महाराजांचे नाव घेवून दीडदमडी साठी आणि पदासाठी पक्षांतर सहज केले जाते.काय हेच का तुम्ही मावळे, आहो तुम्ही कावळे आहात कावळे.
महाराज्यांना एकदा गोवळकोंड्याचा बादशहा कुतुबशहा कडील आमंत्रण आले आणि महाराज त्यांच्या भेटीला गेले तिथे कुतुबशहा ने महाराजांना महाल
दाखवला,सोने-चांदीचा खजाना दाखवला शस्त्रशाळा,घोडेशाळा दाखवली आणि मातंग, बलाढ्य,बळकट,लढाऊ अशी हत्तींचीशाळा दाखवली आणि महाराजांना म्हणाले महाराज तुमच्या कडे सुद्धा असेल ना असे हत्ती तेव्हा महाराज बोलले आमच्या कडे हत्ती नाही पण या हत्तीसारखी माणस मात्र आहे.
तेव्हा त्या कुतुबशहा ने सांगितलं कि ठीक आहे मग तुमच्या कडील हत्तीसारख्या माणसाची आमच्या या हत्तीशी लढाई होऊ द्या.आणि महाराजांनी यसाजी कंक याला आज्ञा केली आणी लगेच यासाजी मुजरा करून हत्तीच्या समोर गेला आणि त्याने एका क्षणात हत्तीला गारद केला कुतुबशहा बघतच राहिला आणि त्याने त्याच्या गळ्यातील सोन्याची माळ बक्षीस म्हणून यासाजी ला दिली आणि तितक्यात यसाजी मागे सरकला आणि बोलला कि आमचे कौतुक करायला आमचे महाराज समर्थ आहे आम्हाला आमच्या पाठीवर कुणाच्या शाब्बासकीची थाप सुद्धा नको. निष्ठा म्हणजे ती हिच.आणि मावळ्यांची शिवरायांबद्दलची स्वामिनिष्ठता म्हणजे हिच आहे.आणि अश्या स्वमिभाक्तांना आम्ही अभिमानाने मावळे म्हणतो.
आजच्या युवा पिढीला इतकच सांगू इच्छितो कि, गड्कील्ल्यांवरती उभे राहून फोटो काढण्यापेक्षा गड्कील्ल्यांसारख ताठ आणि स्वाभिमान धरून उभे रहा तेव्हा शिवरायांच स्वराज्य टिकेल आणि तेव्हा तुम्ही खरे मावळे आहात याची पावती मिळेल.आज अनेक काही संघटना शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून दुर्गसंवर्धन तसेच निस्वार्थ समाजसेवा करतांना दिसत आहे.गडकिल्ले स्वच्छता मोहीम सुद्धा राबवतांना ते दिसत आहे.तर अश्या या संघटनांना पाठींबा देवून त्यांच्या सोबत मिळून स्वराज्याचे गडकोट संवर्धन करण्याच कार्य हाती घ्या आणि ज्या गडकिल्ल्यांनी ४०० वर्षापूर्वी आपले रक्षण केले आज तुम्ही त्यांचे रक्षण करा कारण गडकिल्ले टिकले तर इतिहास टिकेल आणि इतिहास टिकला तरचं राष्ट्र टिकेल आणि जो कोणी हे कार्य करण्यास धन्यता मानत असेल तर तोच खरा मावळा आहे अस मी मानतो.कारण गडकिल्ल्यांची खरी किंमत हि एका खऱ्या मावळ्यालाचं असते.
--------------
मोडेन पण वाकणार नाय हि मावळ्याची जात हाय
अंधाराला घाबरत नाय आभाळाची साथ हाय
मोडेन पण वाकणार नाय हि मावळ्याची जात हाय
शब्दामध्ये गोडवा आमच्या रक्तामध्ये इमानदारी
करत नसतो कधी आम्ही किती कुणाची जहागीरदारी
भगव्या समोर स्वराज्यातच गड्कील्ल्यांचा घात हाय
मोडेन पण वाकणार नाय हि मावळ्याची जात हाय
गड्कील्ल्यांसाठी भांडतो आम्ही मदतीसाठी लढतोय
स्वराज्यात शिवरायांचा रायगड आज रडतोय
हे नुसतेच तांडव नाही आमचे अन्यायावर मात हाय
मोडेन पण वाकणार नाय हि मावळ्याची जात हाय
पुरे झाले तुमचे आता आश्वासनाचे हल्ले
बुरुजासकट जागे करू स्वराज्यातील किल्ले
पाठीवर अजून आमच्या शूर शिवाचा हात हाय
मोडेन पण वाकणार नाय हि मावळ्याची जात हाय
स्मरण ठेवा तानाजीचं मरण आठवा संभाजीचं
स्वराज्यासाठी रक्त सांडल पावनखिंडीत बाजीच
त्यांनी पाठीमागून वार केले हाच मोठा घात हाय
मोडेन पण वाकणार नाय हि मावळ्याची जात हाय
-----------------------------------------------------------------------------------
- सागर महाडिक (शाब्दिक वादळ)
जगदंब

Friday, 20 February 2015


मालवण जवळील कुरटे बेटावर शिवलंका अवतरली.

जंजिरे सिंधूदुर्ग टोपीकर, सिद्दी आणि मोगलांच्या उरावर राज्य करू लागला. ही हवाई नजर टिपली आहे स्व. श्री गोपाळ बोधे सरांनी. पण त्याकाळी अशी साधनं नसताना गरुड भरारी घेणारी नजर असू शकते ति फक्त राजर्षी सिंधू सागराधीपती शिवाजी महाराज यांचीच!

- सुभे आरमार

सुबक
बांधणीचा विस्तीर्ण
असा तलाव #पद्मावती तलाव
#राजगड


1869 ला फुले रायगडावर गेले नव्हते

ते त्यानंतर गेले

दुसरं महत्वाच

19 फेब्रुवारि ही तारीख कोणी काढली आणि कधी मिळाली ??

कारण तेव्हा शिवजयंती साजरी होतचं नव्हती
आणि होत असेलही तर ती वैशाख शुद्ध २ ला

कारण आपल्याला शिवजयंतीची खरी तिथी मिळाली ती १९२५ च्या आसपास तेव्हा समजल की खरी तिथी फाल्गुन वद्य तृतीया
शके १५५१

पुढे जेव्हा इंग्रज भारतात पसरले तेव्हा आपल्याला तारीख मान्य करावी लागली

आणि १९९५ ला शिवसेनेच्या राज्यात सेनेने एक समिति नेमली आणि वैशाख की फाल्गुन महिन्यात साजरी करावी हे इतिहासकारांना विचारल तेव्हा त्यांनी फाल्गुन वद्य तृतीया हीच मान्य मंजूर केली.

त्या दिवशी तारीख होती १९ फेब्रुवारी १६३०

पण मूलात वाद होता पारंपारिक वैशाख तिथी की फाल्गुन ची तिथी

फाल्गुन तिथी मान्य झाली होती

पण लगेच शिवसेनेचे राज्य गेले आणि खान्ग्रेस आणि राष्ट्रखादी वाल्याचे राज्य आले

मग काय आधीच शिवरायांचे नाव न घेणारे आणि शिवजयंती साजरी न करणारी सरकार ने शिवजयंतीचा घोळ आणखी वाढवला

आणि फाल्गुन तिथी मान्य न करता तारीख पुढे आणली आणि सुट्टी मान्य केली

आणि तीन तीन शिवजयंती सुरु झाल्या .

-बळवंतराव दळवी
किल्ले खारेपाटण....

मुंबई - गोवा महामार्गावरील खारेपाटण गाव हे ८ व्या शतकात शिलाहार राजाची राजधानी होती. त्याकाळी खारेपाटण गाव ‘बलिपत्तन’ या नावाने ओळखले जात असे. खारेपाटण गाव वाघोटन खाडी किनार्‍यावर वसलेले आहे. प्राचिन काळी व्यापारी गलबते विजयदुर्गाजवळ वाघोटन खाडीत शिरत व तेथून खारेपाटण ‘‘बलिपत्तन’’ गावापर्यंत येत. येथे जहाजातून माल उतरवून तो बावडा, फोंडा घाटामार्गे देशावर पाठविला जात असे. अशा या प्राचिन बंदराचे, राजधानीचे रक्षण करण्यासाठी खारेपाटणचा किल्ला बांधण्यात आला. ८ व्या शतकापासून १८ व्या शतकापर्यंत जवळजवळ १००० वर्षाच्या इतिहासाचा साक्षिदार असलेला हा किल्ला आहे

छायाचित्र साभार:- सह्याद्री प्रतिष्ठान..

!!.......दवंडी रायगड वरून......!!

ऐका हो ऐका, आपला राजा शिवजी राजाची रायगडा वरुन सर्वानसाठी दंवडी आहे, सर्वानी ध्यान देवुन ऐका...॥

तुम्हाला जर मि हवा असेन,
हिदंवी स्वराज्य हव असेल,
आपल्या हिदंवी स्वराज्याचा इतिहास जाणून घ्यायचा असेल,
आपल्या इतिहासाचा जिवंत वारसा तुम्हाला जपायचा असेल, तरच गड - किल्ले पहायला या अन्यथा नका येवू.., माझे आहेत तेवढे शिलेदार, मावळे, गङकरी खूप झाले माझ्या गड - किल्याची राखण आणि निगा करायला.
तुम्ही इथे फक्त फिरायला म्हणुन येता, दंगा मस्ती करता, दारू पिवून धिँगाना घालता आणि कचरा करून जाता तूम्ही केलेल्या या घानीमुळे माझ्या गड - किल्ल्याचा श्वास गुदमरतोय रे........॥

मी प्रत्येक गडावर पिण्याच्या पाण्याची सोय करून ठेवली आहे, तरीही या प्लास्टीक च्या बाटल्या का आणता..?? आणि त्या रिकाम्या झाल्या कि इथेच टाकूण जाता. हा सगळा कचरा जर तुमच्या घरात टाकला तर कसे वाटेल तुम्हाला..?
अरे निदाण तुम्ही आणलेला कचरा तरी सोबत परत घेवुन जा..!!

दूसरी गोष्ट, मी तुम्हाला "परस्त्रीचा" चा आदर करायला शिकवले आणि तम्ही इथे लपटगीरी करायला येता...
आता हे खपवून घेतले जाणार नाही, माझे शिलेदार, मावळे, गडकरी प्रत्येक गडावर नजर ठेवुण आहेत. गडावर कोण कचरा, घाण कृत्य करत असेल तर त्याला कडेलोट वर नेवुण पोकऴ बाबुँचे फटके देण्यात येतील...!!

रयतेचा राजा
शिवाजी राजा....!!
छत्रपती शिवाजी महाराजांचे पायदळाचे सेनापती येसाजी कंक यांच्या तलवारी!

रायगडाचे १९३० साली टीपलेले छायाचित्र..।।

महादरवाजा, किल्ले पुरंदर
१६५९ नोव्हेंबर मध्ये स्वराज्यावर अफझलखान चालून आणि आणि छत्रपतींनी त्याला प्रतापगड पायथ्यालाच आडवा केला.

अफझल वधाची बातमी विजापूरला पोचण्याच्या आत शिवरायांनी वेगाने चाल करीत कोल्हापूर प्रांत काबीज केला. सोबत पन्हाळा आणि विशाळगड काबीज केले.

उपराजधानी पन्हाळा गेल्याने आदिलशहाच्या जखमेवर मीठ चोळले गेले.

अफझल वधाची आणि पन्हाळा मराठ्यांच्या ताब्यात गेल्याची बातमी एकाच वेळी विजापूर दरबारात गेली. वरून आभाळ कोसळले आणि त्याच वेळी पायाखालून जमीन सरकली अशी गत आदिलशहाची झाली.

त्याने अफझलपुत्र फाझलखानला सैन्य देऊन पन्हाळा व कोल्हापूर पुन्हा मिळवण्यासाठी पाठवले, पण शिवरायांनी त्याचा दारूण पराभव केला

तोरणा तटबंदीला लागून असलेली शिवकालीन वज्रहनुमानाची सुरेख मूर्ती चे दर्शन मिळाले शेवटी शोधून..
#राम_रक्षक



चित्रकार वासुदेव कामत यांनी काढलेले पावनखिंड प्रसंगाचे चित्र!!
या चित्रात शिवराय, शिवरायांचे रूप घेतलेले वीर शिवा काशिद,वीर बाजी प्रभु देशपांडे आणि बांदल वीर दिसताहेत
🚩🚩🚩🚩
किल्ले रायगडाच्या बालेकिल्ल्यातून दिसणारा " गंगासागर तलाव आणि टकमक टोक "
आणि टकमक टोकाच्या पाठीमागे आपल्या थोरल्या भावासारखा असणारा पाठीराखा " कोकणदिवा '…!!!

PHOTOGRAPHY By --- Atul Vijay Chavan


कलालबांगडी

#कलालबांगडी हे तोफेचे नाव आहे. हि लांब पल्ल्याची तोफ असून भारतातील मोठ्या तोफांच्या यादीतील हि तिसर्या क्रमांकाची तोफ आहे . कलालबांगडी हि तोफ जंजिऱ्याच्या सिद्दी च्या मालकीची होती. संभाजी महाराजांनी जंजिरा जिंकण्यासाठी जेव्हा जंजिऱ्याच्या नैऋत्य दिशेला पद्मदुर्ग घडवण्यास सुरुवात केली तेव्हा हा किल्ला पूर्ण व्हायचा आधीच उध्वस्त करण्यासाठी कलालबांगडी तोफेने मारा करण्यात यायचा ; जंजिरा आणि पद्मदुर्गाचे अंतर लक्षात घेता तोफेचा पल्ला किती आहे हे कळते. सध्या हि तोफ मुरूडच्या किल्ले जंजिरा येथे सुस्तिथीत पहावयास मिळते.

शाहिस्तेखानला रोज "डायरी"
लिहिण्याची सवय
होती. त्या डायरीचे नाव "शाहिस्तेखान
बुर्जी"
असे आहे. त्यामध्ये "शिवरायांनी"
केलेल्या हल्ल्याच्या प्रसंग त्याने नमूद
केलेला आहे. आणि याच बुर्जीत खानानं
आणखी एक घटना नोंदवली आहे.

तो असं लिहितो,,,
"शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे
लालमहालातून निघून गेले. काही वेळाने गोंधळ
थांबला. शाहिस्तेखानाची एक बहिण धावत धावत
खानाकडे आली आणि म्हणाली, 'भाईजान
मेरी बेटी लापता हैं!...मेरी बेटी लापता हैं,
भाईजान!' त्यावेळी आपली बोटं
छाटलेला शाहिस्तेखान स्मितहास्य करत
म्हणाला,...'शिवाजीची माणसं तिला पळवणार
नाहीतच,
पण!
जरी त्यांनी पळवली असेल
तरी "बेफिक्र" राहा.
कारण! तो "शिवाजी राजा"
पोटच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल.

"अरे! कोण विश्वास
दुश्मनालाही महाराजांच्या चारित्र्यावर...!"
"अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून
बसली होती, नंतर
ती सापडली".

मित्रांनो हि गोष्टं सांगण्याच तात्पर्य एवढचं
कि, " आज या सबंध भारतीय
समाजाला "शिवाजी महाराजांसारख्या"
चारित्र्यवान
महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज
आहे".
!!!छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!!

!!! - जय शिवराय !!! —
अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात
"शिवाजी द मॅनेजमेंट गुरू" हा 100
मार्काचा पेपर
घेतला जातो.

पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात
"आदर्श राजा असा असावा"
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा शिकवला जातो.

💥अनेक देशांमध्ये आदर्श राजे
छत्रपतींचा इतिहास
अभिमानाने शिकवतात.

पण आमचं दुर्दैव.......
आमच्याकडे शिवरायांचा इतिहास पुसण्याचाच प्रयत्न केला जातो.
#‎दुर्मिळ_माहिती‬
‪#‎ऐतिहासिक_हस्ताक्षरे_शिक्के‬
हस्ताक्षरे :-
१. विजापुरी
२. मलिक अंबर
३. दादाजी कोंडदेव
४ व ५ . महाराजा शहाजीराजे
६,७ व ८. छत्रपती शिवाजी महाराज
९. छत्रपती संभाजी महाराज

शिक्के :-
१०. महाराजा शहाजीराजे
११. जिजाऊ मांसाहेब
१२. छत्रपती शिवाजी महाराज
१३. मोरोपंत पिंगळे
१४. छत्रपती संभाजी महाराज
शिवरायांच्या कट्टर मावळ्यांनो आज मी आपणा सर्वना एक त्रिकालबाधित सत्य सांगतो ते निट आणि व्यवस्थित समजुन घ्या...!
शिवरायांचे खरे गुरू कोण????
या प्रश्नाच उत्तर मी देतो आणि तेच खरे आहे बघा पटतय का ते
बरेच लोकांची आणि विविध पक्ष, संघटनाची अशी समजुत आहे कि शिवरायांचे गुरू हे आहेत.

या संतान बाबात मला खूप आदर आहे आणि त्यांना मी मनापासून मानतो.
पण महाराजांच्या गुरूचा प्रश्न आहे ना????
कोण म्हणत कि
१. संत तुकाराम महाराज हे शिवरायांचे गुरू होते
२. रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरू होते
३. दादोजी कोंडदेव महाराजांचे गुरू होते
४. काही लोक म्हणतात कि मुस्लिम पंतातील बाबा ते पण शिवरायांचे गुरू होते
आपले शिवराय अध्यतिम होते
चांगले विचार, आचार जोपासणारे होते शिवाय अथाग भक्तीमय होते इत्यादी...
वरिल दिलेल्या महान संतांना आणि महापुरूष छत्रपती शिवरायांचे गुरू
कसे काय असु शकतात??
आणि ते परिपुर्ण गुरू कसे काय असती???
कारण हे सर्व महान संत आणि महापुरूष
छान अभंग, काव्या दासवाणी, प्रचंड भक्तीमय विचार आणि अध्यत्मिक, धर्म आणि काव्य, जीवन आणि वाङ्मय, इत्यादी गोष्टींवर बोलायचे
आता त्रिकालबधित सत्य
शिवरायांचे खरे परिपुर्ण गुरू म्हणजे त्यांच्या आऊसाहेब राजमाता जिजाऊ आईच होत्या हेच अंतिम सत्य आहे...!!!
कारण आईजिजाऊनी शिवरायांच्या जन्मापासून ते मृत्युपर्यत त्यांची प्रत्येक गोष्टीत त्यांना मार्गदर्शनच नाय तर त्यांनची जडणघडण ही शेवटच्या श्वासापर्यत केली
शिवरायांना अध्यत्मिक, युध्दनिती, वैचारिक गोष्टी, सामर्थमय आणि दैव्यज्ञानी अंर्तमय विचार,
नैतिक अन प्रगतीमय अचार विचार,
धर्म जागृतीकरण
धर्म आणि काव्य, जीवन आणि वाङ्मय,
भाषा आणि परंपरा इत्यादी
गोष्टी आहेत आणि अजुन बरेच आहेत पण गुरू आई बद्दल बोलाव तेवढ कमीच आहे...
तसेच रामयण, महाभारत अन बरेच गोष्टींची, काव्याची, अंभगाची सांगड घालुन त्यांना एक मर्यादा पुरूष अन एक जगातील सर्वात्मातील उत्तम असा जाणता राजा छत्रपती शिवराय बनवले अन त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापण केले..!!!
इत्यादी अनेक गोष्टी जर आपण निट उघड्या डोळ्यानी अन मनापासून जाणुन घेतल्या तर एकच नाव आपल्या मनात स्थिर होत ते म्हणजे
"राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊआई" यांच शिवरायांच्या गुरू आहेत हे याठिकाणी सिध्द होत
तसेच ते देवांचे देव महादेवचे प्रचंड भक्त होते आणि ते त्यांची उपासणा करायचे हे पण तितकेच सत्य आहे
आणि आईतुळजा भवानीचे पण ते भक्त होते
आता तुम्ही एक शंका निर्माण कराल कि आई ही प्रथम गुरूच असते पण शिवरायांच्या बाबतीत त्या एक आई म्हणुन तर गुरू होत्याच पण त्या शिवरायांच्या संपुर्ण जीवनात प्रथम आणि अंतिम गुरू होत्या.
हर हर महादेव...!
राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊचा विजय असो...!
श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो...!
श्रीमंत श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो...!
स्वलेखन : रमेश साहेबराव जाधव.
"The Great Maratha Warriors"
लेखनची तारीख : २१ सप्टेंबर २०१३


कान्होजी जेधे देशमुख हे छत्रपती शिवाजी महाराजांना पितृतुल्य व्यक्तिमत्व होते. मावळात हिंदवी स्वराज्य रुजवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

अफझलखानच्या स्वारीच्या वेळी १२ मावळचे १० देशमुख एकत्र आणून छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य राखण्यासाठी खंबीरपणे साथ देणारे, तसेच त्या प्रसंगी बादशाही फर्मान झुगारून आपल्या वातनावर आणि घरादारावर जोखीम पत्करून पाणी सोडणार कान्होजी जेधे यांची तलवार!

सध्या ही तलवार श्री बाळासाहेब जेधे, कारी, तालुका भोर, जिल्हा पुणे यांच्या संग्रही आहे.

Kanhoji Jedhe Deshmukh was a paternal figure to Chhatrapati Shivaji Maharaj. He had a lion's share in imbibing the ideology of Hindavi Swarajya in Mawal.

The sword belongs to Kanhoji Jedhe who was instrumental in securing support of 10 of the twelve Deshmukhs of Mawal provinces during the trying and calamitous period of the invasion of dreaded Bijapur General Afzal Khan. He paid no heed to Bijapur Badshah's firman mentioning dire consequences to those who help Shivaji Maharaj and was ready to make the ultimate sacrifice of his estates, title and family for the cause.

The sword is currently with Balasaheb Jedhe at Kari, Bhor Taluka, Pune.
http://shivrajyapratishthan.blogspot.in/



शिवकालीन सैन्य रचना..