वय वर्ष ८४ अखंड शिव शंभूंचा ध्यास , पायात चप्पल न घालत फिरणं ,किल्ले श्री रायगडावरील शिव मूर्तीची पूजा , ज्या गडकोटानी आयुष्यभर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची साथ दिली ते गडकोट तीर्थक्षेत्र व्हावीत यासाठी १ लाखभर धारकरयांची धारतीर्थ मोहीम काढण , शंभू महाराजांचं बलिदान लक्षात राहावं आणि त्याची जाणीव आजच्या पिढिला करून देण्यासाठी कठोर असा बलिदान मास पाळण , शिवाजी महाराजांसारख तेज त्याग आणि शक्ती आम्हाला पण दे म्हणून नवरात्रात गावोगावी दुर्गामातेच्या चरणी हजारोंच्या संख्येने धावत जाण्याचा कार्यक्रम देशाला देण (महाराष्ट्र,कर्नाटक,तामीऴन
छत्रपती परंपरेचा वाढ दिवस मोठ्या हौसेने साजरा करण ,आणि शिवाजी संभाजी रक्तगटाची तरुण पिढी तयार करण्यासाठी आजच्या तरुणाला लाजवेल असा जीवापाड प्रयत्न करण हे फक्त आणि फक्त गुरुवर्य आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजीच करू शकतात.
ज्यांचे आम्ही दास....!
त्याचा रायगडीये वास.....!
असे म्हणत आपले सबंध आयुष्य शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे खरे जीवन आधी स्वत; जगून मग दुसर्यांना जगायला सांगणारे गुरुजी पाहाताना गुरुजींचाच एक श्लोक आठवतो .
जळल्या वीना न उजळे जगतात काही |
मातीत बीज कणिसा स्तव नष्ट होई ||
झीजताच सौरभ सुटे खालू चंदनाचा |
संभाजी मार्ग आमुचा ही समर्पणाचा ||
जसा दिवा स्वतः जळून जग प्रकाशमय करतो तसे गुरुजी एक सन्यासी जीवन जगून हिंदुस्थान ला शिव-शंभू रक्त गटाच्या लोकांचा समाज निर्माण करण्याच्या व्रताशी कटिबद्ध आहेत.
ONE MAN ARMY ..!!
एका सदरा व धोतरावर आयुष्य घालवले.हजारो युवकांना शिवाजी संभाजी महाराजांच्या कार्याचा खरा अर्थ सांगीतला.
आजवर कोणालाही न जुमाननार्या मात्र शिवरायांच्या रक्तातील असणार्या छत्रपती उदयनमहाराज यांच्या डोऴ्यातुन अश्रु उभे करणारे व्यक्तीमत्व...!!!!
" आदरणीय गुरुवर्य संभाजीराव विनायकराव भिडे गुरुजी. "
गुरुजी आमच्या कातड्याचे जोडे करुन तुमच्या पायात घातले तरी तुमचे उपकार फिटणे अशक्य....
ONE MAN ARMY हि संकल्पना खरोखर तुम्हास लागु पडते एका माणसाची ताकत काय असते हे पाहायचे असेल तर एकवेळ नक्की यांना भेट द्या .
हो..अगदी सहज भेट मिळेत..APPOINTMENT वैगेरे ची गरज नाही.
कधी कधी एस,टी .मध्ये सुध्दा भेटतील ,कारण V I P सारखी वेगळी गाडी प्रवासाला त्यांना लागत नाही.
ओठावर मिश्या मावत नाहीत..आणि काळजात शिवाजी-संभाजी मावणार नाहीत..असे व्यक्तिमत्व भेटले कि समजावे हेच ते गुरुजी...
वाकून नमस्कार कराल..तेव्हा..पायात चप्पल सुध्दा .दिसणार नाही.
राजकारण ,सत्ताकारण , अर्थकारण हे सगळे थुंकून टाकून #श्री_शिवप्रतिष्ठान_हिंदुस
जय श्री राम
जय भवानी
जय जिजाउ
जय शिवराय
जय शंभुराजे
जयोस्तु हिंदू राष्ट्रम्
जयोस्तु मराठा
जय महाराष्ट्र !!!
॥ राष्ट्रांत निर्मू अवघ्या शिवसुर्यजाळ ॥
॥ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ॥
-संस्कृती फोटोग्राफी
No comments:
Post a Comment