Sunday, 15 March 2015

"किल्ले रत्नदुर्ग"

"किल्ले रत्नदुर्ग"

रत्नदुर्गाची बांधणी बहमनी काळखंडात
झालेली आहे.
सन १६७० साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला
अदिलशहाकडुन जिंकून घेतला.
किल्ल्याच्या तटबंदीची डागडुजी करून
किल्ला
मजबूत केला.
किल्ल्याचा आकार साधारणत: घोड्याच्या
नाळेसारखा आहे,
किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ १२० एकर आहे.
रत्नदुर्ग तीनही बाजूंनी समुद्राने
वेढलेला आहे.
किल्ल्याच्या आग्रेय दिशेला मिरकरवाडा हे बंदर आहे.
किल्ल्यावर अत्यंत सुंदर असे भगवती मंदिर आहे.
मंदिराच्या जवळच तीन तोंडाचा भुयारी मार्ग आहे,
या भुयाराचा शेवट खाली समुद्रकिनार्याजवळ होतो
तेथे एक प्रचंड गुहा आहे,
सध्या ती बंद करण्यात आली आहे.
किल्ल्यात एक लहान तळे व एक खोल
विहीर आहे.
किल्ल्याच्या एका बाजूला दीपगृह
आहे,
तेथून रत्नागिरी शहराचे तसेच अथांग
समुद्राचे मनमोहक दर्शन होते.

किल्ल्यातील तीन तोंडाच्या भुयारी मार्गाजवळ
एक बुरूज आहे.
या बुरुजाचे नाव रेडे बुरूज आहे,
यावर एक स्तंभही उभारला आहे.

किल्ल्यावर जाण्यासाठी पायथ्यापर्यंत डांबरी रस्ता आहे.
किल्ल्याच्या पायथ्याशीच शंकराचे
श्री भागेश्वर मंदिर आहे.
एका तासात किल्ला पाहून होतो.

रत्नदुर्ग किल्ला रत्नागिरी शहरापासून
अवघ्या २-३ कि.मी.अंतरावर आहे.
गडावर राहण्याची-जेवणाची सोय नाही.
पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment