Saturday, 21 March 2015

गुढीपाडव्याच्या आणि हिंदूनववर्षाच्या कोटी कोटी शिवमय शुभेच्छा

गुढीपाडव्याच्या आणि हिंदूनववर्षाच्या कोटी कोटी शिवमय शुभेच्छा
गुढीपाडव्याच्या दिवशी वर्षारंभ करण्याचे नैसर्गिक, ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्त्व !
महत्त्व : इसवी सन १ जानेवारीपासून, आर्थिक वर्ष २१ मार्चपासून, हिंदू वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून, व्यापारी वर्ष कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून, शैक्षणिक वर्ष जूनपासून, सौर वर्ष, चांद्र वर्ष व सौर-चांद्र वर्ष (लुनी सोलर) या वर्षांचेही निरनिराळे वर्षारंभ, इतके वर्षारंभ करण्याचे दिवस आहेत. यांत सर्वत्र बारा महिन्यांचेच वर्ष आहे. `वर्ष बारा महिन्यांचे असावे', असे प्रथम कोणी सांगितले व जगाने ते कसे मान्य केले ? याचा प्रथम उद्‌गाता `वेद' आहे. वेद हे अतीप्राचीन वाड्गमय आहे, याबद्दल दुमत नाही. `द्वादशमासै: संवत्सर: ।' असे वेदात आहे. वेदांनी सांगितले म्हणून ते जगाने मान्य केले. या सर्व वर्षारंभांतील अधिक योग्य प्रारंभदिवस `चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा आहे. १ जानेवारीला वर्षारंभ का, याला काहीही कारण नाही. कोणीतरी ठरविले व ते सुरू झाले. याउलट चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक व आध्यात्मिक कारणे आहेत.
नैसर्गिक : ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत- संपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त व विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) व वसंत ऋतू सुरू होतो. सर्व ऋतूंत `कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे', असे भगवंतांनी श्रीमद्‌भगवद्‍गीतेत (१०:३५) म्हटले आहे. या वेळी समशीतोष्ण अशी उत्साहवर्धक व आल्हाददायक हवा असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.
ऐतिहासिक : या दिवशी
अ. रामाने वालीचा वध केला.
आ. राक्षसांचा व रावणाचा वध करून भगवान रामचंद्र अयोध्येला परत आले.
इ. शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळवला.
ई. या दिवसापासूनच `शालिवाहन शक' सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवला.
आध्यात्मिक
सृष्टीची निर्मिती : ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.
१ जानेवारी नव्हे, तर गुढीपाडवा हाच पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन : `गुढीपाडव्याला सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्‍वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित असल्याने सृष्टी नवचेतनेने भारित होते. याउलट ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्‍वाच्या लयकाळाशी निगडित असते. गुढीपाडव्याला सुरू होणार्‍या नववर्षाची तुलना सूर्योदयाला उगवणार्‍या तेजोमयी दिवसाशी करता येईल.
गुढी उभारण्याची पद्धत:
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा हिंदु धर्मियांचा वर्षातील पहिला सण व नूतन वर्षाचा पहिला दिवस. अभ्यंगस्नान करणे, दाराला तोरणे लावणे व पूजा यांबरोबरच घरोघरी गुढी उभारून हा सण साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्तींच्या राक्षसांचा व रावणाचा वध करून भगवान श्रीराम अयोध्येत परत आले, तो हाच दिवस. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती याच दिवशी केली. अशा या सणाला हिंदूंच्या जीवनात विशेष महत्त्व आहे. सूर्योदयाच्या वेळी प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असल्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी !
गुढीपाडव्याच्या दिवशी तेज व प्रजापति लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. सूर्योदयाच्या वेळी या लहरींतून प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असते. ते जिवाच्या पेशींत साठवून ठेवले जाते व आवश्यकतेनुसार त्या जिवाकडून ते वापरले जाते. त्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी.
गुढीचे स्थान : गुढी उभी करतांना ती दरवाजाच्या बाहेर; परंतु उंबरठ्यालगत (घरातून पाहिल्यास) उजव्या बाजूला उभी करावी.
पद्धत :
अ. गुढी उभी करतांना सर्वप्रथम सडासंमार्जन करून अंगण रांगोळीने सुशोभित करावे गुढी उभारण्याच्या जागी रांगोळीने स्वस्तिक काढून त्याच्या मध्यबिंदूवर हळद-कुंकू वाहावे.
आ. गुढी उभी करतांना ब्रह्मांडातील शिव-शक्‍तीच्या लहरींना आवाहन करून तिची स्वस्तिकावर स्थापना करावी. यामुळे गुढीच्या टोकावर अस लेल्या सर्व घटकांना देवत्व प्राप्‍त होते.
इ. गुढी जमिनीवर उंबरठ्यालगत; परंतु थोडीशी झुकलेल्या स्थितीत उभी करावी.
आंब्याच्या पानांचे महत्त्व
इतर पानांपेक्षा आंब्याच्या पानांत जास्त सात्त्विकता असल्यामुळे त्यांची ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता अधिक असते. गुढीच्या टोकाला आंब्याची पाने बांधली जातात. कोवळया पानांत तेजतत्त्व अधिक असते, म्हणून पूजेत आंब्याच्या कोवळया पानांचा वापर करावा.
कडूलिंबाच्या पानांचे महत्त्व
गुढीला कडूलिंबाची माळ घातली जाते. ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या पानांनंतर कडूलिंबाच्या पानांत जास्त असते. या दिवशी कडूलिंबाच्या कोवळया पानांद्वारे वातावरणात पसरलेल्या प्रजापति लहरी खेचून घेतल्या जातात. प्रजापति लहरी ग्रहण करण्यासाठी आवश्यक गुण सर्वसाधारण व्यक्‍तीत ईश्‍वराकडून येणार्‍या लहरी ग्रहण करण्याची क्षमता खूप कमी असते.
खालील गुण असणारा जीव या लहरी अधिकाधिक प्रमाणात ग्रहण करू शकतो.
१. अंतर्मनापासून सातत्याने ईश्‍वराचे स्मरण करणे
२. गुरु व ईश्‍वर यांच्यावर अढळ श्रद्धा असणे
३. ईश्‍वराची संकल्प शक्‍ती कार्यरत असणे
४. शक्‍तीचा वापर राष्ट्र व धर्म यांच्या कार्यांसाठी करणे
सूर्यास्तानंतर लगेचच गुढी उतरवावी ज्या भावाने गुढीची पूजा केली जाते, त्याच भावाने गुढी खाली उतरवली पाहिजे, तरच जिवाला तिच्यातील चैतन्य मिळते. गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून व प्रार्थना करून गुढी खाली उतरवावी. गुढीला घातलेले सर्व साहित्य दैनंदिन वापरातील वस्तूंच्या शेजारी ठेवावे. गुढीला अर्पण केलेली फुले व आंब्याची पाने यांचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. गुढी सूर्यास्तानंतर लगेचच खाली उतरवावी. सूर्यास्तानंतर १ ते २ तासांत वातावरणात वाईट शक्‍ती कार्यरत होऊ लागतात. सूर्यास्तानंतरही गुढी उभी असल्यास त्यात वाईट शक्‍ती प्रवेश करू शकतात. त्या शक्‍तींचा आपल्याला त्रास होऊ शकतो.
गुढीची पूजा करतांना व गुढी उतरवतांना पुढील प्रार्थना करावी
अ. गुढीची पूजा करतांना करावयाची प्रार्थना : `हे ब्रह्मदेवा, हे विष्णु, या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील प्रजापति, सूर्य व सात्त्विक लहरी आमच्याकडून ग्रहण केल्या जाऊ देत. त्यांतून मिळणार्‍या शक्‍तीतील चैतन्य सातत्याने टिकून राहू दे. मला मिळणार्‍या शक्‍तीचा वापर माझ्याकडून साधनेसाठी केला जाऊ दे.', हीच आपल्याचरणी प्रार्थना !

Thursday, 19 March 2015

आवश्य वाचावे ( गुढी पाडवा संपूर्ण देश भर साजरा होईल )



आवश्य वाचावे

या येत्या दोन दिवसात गुढी पाडवा संपूर्ण देश भर साजरा होईल ....
माझ्या सेक्युलर मित्रांनो,

तूम्ही येशू ख्रिस्ताचा जन्म व फिरंगी नववर्ष जोमाने साजरे केले. तो येशू आपल्या ना देशाचा, ना गोताचा, तरी पन जाउदे. त्यात दोष तुमचा नाही. हा सर्व गळ्यात "लंगोट" घालून "कॉन्व्हेंट" ला शिकल्याचा परिणाम. बघूया तूमचे किती ख्रिस्ति मित्र हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देतात का.??

कदाचित तुम्हाला माझा राग येईल तो स्वभाविक आहे. पण मित्रांनो, याचा एक वेळ विचार करा, अन स्वाभिमानी बना, भारतिय बना... तेवढे तूम्ही समजूतदार आहातच...

हिंदूंनी गुढीपाडवा साजरा करू नये म्हणून औरंगजेबाने छ. संभाजी महाराजांची 40 दिवस हाल करून फाल्गुन अमावस्येला म्हणजे एक दिवस आधी क्रूर हत्या केली .....आपण हा औरंग्याचा मनसुबा साध्य होऊ द्यायचा नाही. आपण गुढीपाडवा जोशातच साजरा करायचा...

आणि हो

फक्त राजकारणी माणसा कडून एकच अपेक्षा आहे पाडव्याच्या " फेर्या " काढतांना भगवाच झेंडा मिरवा, तुमच्या पक्षाच्या झेंडे घरीच ठेवा "हिंदुनववर्ष " आहे हे लक्षात ठेवा. भगवा हे आपल्या अस्मितेचे प्रतिक .…
__/\__

हिंदू असाल तर मेसेज शेअर करून आपल्या सर्व मित्र-मैत्रिणींना जाणीव करून द्या

मुजरा या मराठ्यांच्या राजधानीस

मुजरा या मराठ्यांच्या राजधानीस
मावळ पंढरी, धारकऱ्यांची जननी, शिवरायांच्या कर्तृत्वाची उंची, राजाराम महाराजांची जन्मभूमी, बेलाग, बुलंद.
जेम्स डग्लस, खाफीखान, साकी मुस्तैदखान, मेहमूद हाशिम खालीखान यांसारख्या परकीयांना देखील आपल्या वैभव संपन्नतेवर लिखाणास भाग पाडणारा
किल्ले राजगड......
असो हिमालय किती भव्य तरी
मनी पूजीन राजगडा



Wednesday, 18 March 2015

राजमुद्रा

 

छत्रपती राजाराम महाराजांचे पुत्र शिवाजी यांनीही आपल्या परम्‌प्रतापी आजोबांच्या राजमुद्रेप्रमाणेच आपलीही राजमुद्रा बनवून घेतली. अगदी जशीच्या तशी. फक्त थोरल्या महाराज शिवछत्रपतींच्या मुद्रेतील "शाहसूनो:" अर्थात "शाह(जी)पुत्रा" ऐवजी "रामसूनोः" म्हणजेच "रामपुत्र" हे शब्द घालण्यात आले. सदर मुद्रा ही राजारामपुत्र शिवाजी (दुसरे) यांच्या एका अस्सल पत्रावरील आहे.

: Kaustubh Kasture

सह्याद्री … (जेवढा देखणा तेवढाच राकट, रोद्र, कणखर)



सह्याद्री …
(जेवढा देखणा तेवढाच राकट,
रोद्र, कणखर)
हिमालय दिसायला देखणा, उंच उंच
गगनभेदी गिर्यारोहकांसाठी नेहेमीच आकर्षण.
हिमालय सर करणे अवघड गोष्ट नाही. पण …….

सह्याद्री रौद्र रूप धारण केलेला
कणखर,
हिमालयाच्या पेक्षा थोटकाच पण
सह्याद्री सर करायला सिंहाच काळीज हव.
पायात १०० हत्तींच बळ हवं.
छत्रपती शिवरायांसारखा दृढ निश्चय हवा
भल्या भल्या गिर्यारोहकांच्या काळजाचा
थरकाप उडवनारा सह्याद्री पर्वत
जेवढा देखणा दिसतो तेवढाच रोद्र आहे.

चौर्‍याऐंशी बंदरात हा जंजीरा

चित्रगुप्त याने लिहिलेल्या बखरीत सिंधुदुर्गबाबत पुढील मजकूर नमूद केला आहे :
'चौर्‍याऐंशी बंदरात हा जंजीरा,अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका,अजिंक्य जागा निर्माण केला । सिंधुदुर्ग जंजीरा,जगी अस्मान तारा । जैसे मंदिराचे मंडन,श्रीतुलसी वृंदावन, राज्याचा भूषण अलंकार । चतुर्दश महारत्नापैकीच पंधरावे रत्न, महाराजांस प्राप्त जाहले ।
Photo- late. Gopal Bodhe

Tuesday, 17 March 2015

आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी


वय वर्ष ८४ अखंड शिव शंभूंचा ध्यास , पायात चप्पल न घालत फिरणं ,किल्ले श्री रायगडावरील शिव मूर्तीची पूजा , ज्या गडकोटानी आयुष्यभर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची साथ दिली ते गडकोट तीर्थक्षेत्र व्हावीत यासाठी १ लाखभर धारकरयांची धारतीर्थ मोहीम काढण , शंभू महाराजांचं बलिदान लक्षात राहावं आणि त्याची जाणीव आजच्या पिढिला करून देण्यासाठी कठोर असा बलिदान मास पाळण , शिवाजी महाराजांसारख तेज त्याग आणि शक्ती आम्हाला पण दे म्हणून नवरात्रात गावोगावी दुर्गामातेच्या चरणी हजारोंच्या संख्येने धावत जाण्याचा कार्यक्रम देशाला देण (महाराष्ट्र,कर्नाटक,तामीऴनाडु,दिल्ली,हरीयाना,पानीपत,गुजरात,राजस्थान ई.राज्यात दुर्गामाता दौड सुरु केली ),
छत्रपती परंपरेचा वाढ दिवस मोठ्या हौसेने साजरा करण ,आणि शिवाजी संभाजी रक्तगटाची तरुण पिढी तयार करण्यासाठी आजच्या तरुणाला लाजवेल असा जीवापाड प्रयत्न करण हे फक्त आणि फक्त गुरुवर्य आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजीच करू शकतात.

ज्यांचे आम्ही दास....!
त्याचा रायगडीये वास.....!

असे म्हणत आपले सबंध आयुष्य शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे खरे जीवन आधी स्वत; जगून मग दुसर्यांना जगायला सांगणारे गुरुजी पाहाताना गुरुजींचाच एक श्लोक आठवतो .

जळल्या वीना न उजळे जगतात काही |
मातीत बीज कणिसा स्तव नष्ट होई ||
झीजताच सौरभ सुटे खालू चंदनाचा |
संभाजी मार्ग आमुचा ही समर्पणाचा ||

जसा दिवा स्वतः जळून जग प्रकाशमय करतो तसे गुरुजी एक सन्यासी जीवन जगून हिंदुस्थान ला शिव-शंभू रक्त गटाच्या लोकांचा समाज निर्माण करण्याच्या व्रताशी कटिबद्ध आहेत.

ONE MAN ARMY ..!!

एका सदरा व धोतरावर आयुष्य घालवले.हजारो युवकांना शिवाजी संभाजी महाराजांच्या कार्याचा खरा अर्थ सांगीतला.
आजवर कोणालाही न जुमाननार्या मात्र शिवरायांच्या रक्तातील असणार्या छत्रपती उदयनमहाराज यांच्या डोऴ्यातुन अश्रु उभे करणारे व्यक्तीमत्व...!!!!
" आदरणीय गुरुवर्य संभाजीराव विनायकराव भिडे गुरुजी. "

गुरुजी आमच्या कातड्याचे जोडे करुन तुमच्या पायात घातले तरी तुमचे उपकार फिटणे अशक्य....

ONE MAN ARMY हि संकल्पना खरोखर तुम्हास लागु पडते एका माणसाची ताकत काय असते हे पाहायचे असेल तर एकवेळ नक्की यांना भेट द्या .

हो..अगदी सहज भेट मिळेत..APPOINTMENT वैगेरे ची गरज नाही.
कधी कधी एस,टी .मध्ये सुध्दा भेटतील ,कारण V I P सारखी वेगळी गाडी प्रवासाला त्यांना लागत नाही.
ओठावर मिश्या मावत नाहीत..आणि काळजात शिवाजी-संभाजी मावणार नाहीत..असे व्यक्तिमत्व भेटले कि समजावे हेच ते गुरुजी...

वाकून नमस्कार कराल..तेव्हा..पायात चप्पल सुध्दा .दिसणार नाही.

राजकारण ,सत्ताकारण , अर्थकारण हे सगळे थुंकून टाकून #श्री_शिवप्रतिष्ठान_हिंदुस्थान च्या रूपाने हिंदवी स्वराज्याच्या गुरूजींनी सुरू केलेल्या कार्य चळवळीला सालाम !!!

जय श्री राम
जय भवानी
जय जिजाउ
जय शिवराय
जय शंभुराजे
जयोस्तु हिंदू राष्ट्रम्
जयोस्तु मराठा
जय महाराष्ट्र !!!

॥ राष्ट्रांत निर्मू अवघ्या शिवसुर्यजाळ ॥
॥ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ॥

-संस्कृती फोटोग्राफी

महाराणी काशीबाईसाहेब याची समाधी

महाराणी काशीबाईसाहेब याची समाधी, कुशावर्त वृन्दावन, रायगड. या छत्रपती शिवरायाच्या अष्टराद्नी पैकी एक. या राज्याभिषेकाच्या काही महिने आधी वारल्या

चला तिर्थक्षेत्र वढु बुद्रुक





 

चला तिर्थक्षेत्र वढु बुद्रुक

39 दिवस धर्मवीर संभाजी राजांवर मुघलांनी अनन्वीत अत्याचार केले,
हात,डोळ,पाय,चामडी काढली,अमिषे दाखवली,
पन आपल्या राजाने हिंदू धर्म सोडला नाही,

अशा या राजाला ज्या दिवशी मारले ती मृत्युंजय अमावस्या 19 मार्च संध्याकाळी 6,28 मिनीटांनी चालु होत आहे,
सर्व हिंदुचे कर्तव्य आहे ज्या राजामुळे आज आपण सुखा समाधानाने जगत आहोत,त्यांचे बलिदान हे कायम स्मरणात ठेवले पाहीजे,

भोसरी येथुन 19 तारखेला रँली वढु येथे जाणार आहे,(फक्त अंथरुण सोबत आणावे,जेवण,चहा,नाष्टा तसेच अंघोळीची पुर्ण व्यवस्था केलेली आहे,महीलांसाठी पन वेगळी व्यवस्था आहे)

वढु बुद्रुक येथे रात्रभर विविध कार्यक्रम आहेत,20 तारखेला राजांचे समाधीवर विमानातुन 11.30 वाजता पुष्पवृष्टी होणार आहे,

ज्यांना 19 तारखेला रहाते येण्यास जमत नसेल,अशांसाठी 20 तारखेला सकाळी 9 वाजता टु व्हीलर रँली भक्ती शक्ती चौकातुन तिर्थक्षेत्र वढु बुद्रुक येथे जाणार आहे,

महाराजांनी मारले त्यावेळी 5 लाख मोघलांचा जल्लोश वढुला चालु होता,
आपण ज्या दिवशी लाखोंच्या संख्येने तिथे पोहचु आणि धर्मवीर संभाजी राजेंचे बलिदान ध्यानात ठेवुन कार्य करु,तिच खरी मृत्युंजय राजाला श्रद्धांजलि होईल

हिंदु धर्म प्रसारक

ख़ास ब्रिगेडि मुर्खांसाठी....महत्वाचा पुरावा...

ख़ास ब्रिगेडि मुर्खांसाठी....महत्वाचा पुरावा... 










भोसले घराणे हे गोब्राह्मण प्रतिपालक असल्याचा पुरावा प्रत्यक्ष संभाजी महाराजांनी त्यांच्याच बुधभूषणम् या ग्रंथात दुसऱ्या अध्यायातील ५५४ व्या श्लोकात दिला आहे...

अधित्य वेदांपरिसंस्तीर्य चाग्निनिष्टवा यज्ञ पालयित्वा प्रजाश्च।
गोब्राह्मणार्थे शस्त्रपूतान्तरात्मा हतः संग्रामे क्षत्रियः स्वर्गमेति।।

" श्री शम्भु वर्मा " कृत बुधभूषणम् अध्याय २ श्लोक क्र ५५४

अर्थ~ वेदांचे रक्षण करणे, अग्नि आणि यज्ञ यांचे रक्षण करून प्रजेचा सांभाळ करणे, गाय आणि ब्राह्मण यांचे रक्षणासाठी हाती शस्त्र धारण करणे आणि प्रसंगी रणक्षेत्रामध्ये वरील हेतुसाठी प्राण अर्पण करणे या गोष्टी क्षत्रियाला स्वर्गप्राप्ति मिळवून देतात.

Sunday, 15 March 2015

महान ते महाराज आणि महान त्यांचे आरमार...,


महान ते महाराज आणि महान त्यांचे आरमार...,

स्वराज्याच्या आरमाराचा उदय होण्याआधी सागरावर पोर्तूगीज आरमाराचा अंमल चालत असे.'सागरावर आमचीच मालकी आहे त्यामुळे आमच्या परवान्याशिवाय कुणीही समुद्रात संचार करू नये ' अशी गर्जना पोर्तूगीज करीत. त्यांच्या परवान्याशिवाय आदिलशाहच काय पण, दिल्लीचा मोगल बादशाहही मक्केच्या यात्रेला जायचे असेल तर, पोर्तुगीज परवाना काढूनच गलबतात बसे! पण १६७८ नंतर स्वराज्याचे आरमार पोर्तुगीजांची तमा न बाळगता बिनदिक्कत समुद्र संचार करू लागले, पुढे महाराजांचे व पोर्तुगीजांचे चौथाईवरून वितूष्ट आले तेव्हा महाराजांनी त्यांची जहाजेच जप्त करून टाकली.
पोर्तुगीजांप्रमाणेच इंग्रजांनाही महाराजांच्या आरमाराची चुणूक खांदेरी-उंदेरीच्या

लढाईत १६८९ साली पाहायला मिळाली होती.इंग्रजांनी एका पत्रात अशी बढाई मारली होती की, ' शिवाजी महाराजांची गलबते अगदीच भिकार असून आपले एक गलबत देखिल त्यांच्या १०० गलबतांचा धुव्वा उडवू शकेल! पण लवकरच त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला. खांदेरीच्या युद्धात मराठा आरमाराने एवढा पराक्रम गाजवला आणि इंग्रजांच्या Revenge व Hunter या लढाऊ जहाजांना एवढे झोडपून की, इंग्रजांच्या तोंडचे पाणी पार पळाले.

अखेर we shall not be able long to oppose him ( दीर्घकाळापर्यंत आम्ही महाराजांशी टक्कर देऊ शकत नाही किंवा these little boates deceive us to admiration (म्हणजे महाराजांच्या सरपट्या होड्या आम्हाला आश्चर्यकारक रीतीने चकवितात) असे हताश उद्गार काढणे त्यांच्या भाळी आले.

"किल्ले रत्नदुर्ग"

"किल्ले रत्नदुर्ग"

रत्नदुर्गाची बांधणी बहमनी काळखंडात
झालेली आहे.
सन १६७० साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला
अदिलशहाकडुन जिंकून घेतला.
किल्ल्याच्या तटबंदीची डागडुजी करून
किल्ला
मजबूत केला.
किल्ल्याचा आकार साधारणत: घोड्याच्या
नाळेसारखा आहे,
किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ १२० एकर आहे.
रत्नदुर्ग तीनही बाजूंनी समुद्राने
वेढलेला आहे.
किल्ल्याच्या आग्रेय दिशेला मिरकरवाडा हे बंदर आहे.
किल्ल्यावर अत्यंत सुंदर असे भगवती मंदिर आहे.
मंदिराच्या जवळच तीन तोंडाचा भुयारी मार्ग आहे,
या भुयाराचा शेवट खाली समुद्रकिनार्याजवळ होतो
तेथे एक प्रचंड गुहा आहे,
सध्या ती बंद करण्यात आली आहे.
किल्ल्यात एक लहान तळे व एक खोल
विहीर आहे.
किल्ल्याच्या एका बाजूला दीपगृह
आहे,
तेथून रत्नागिरी शहराचे तसेच अथांग
समुद्राचे मनमोहक दर्शन होते.

किल्ल्यातील तीन तोंडाच्या भुयारी मार्गाजवळ
एक बुरूज आहे.
या बुरुजाचे नाव रेडे बुरूज आहे,
यावर एक स्तंभही उभारला आहे.

किल्ल्यावर जाण्यासाठी पायथ्यापर्यंत डांबरी रस्ता आहे.
किल्ल्याच्या पायथ्याशीच शंकराचे
श्री भागेश्वर मंदिर आहे.
एका तासात किल्ला पाहून होतो.

रत्नदुर्ग किल्ला रत्नागिरी शहरापासून
अवघ्या २-३ कि.मी.अंतरावर आहे.
गडावर राहण्याची-जेवणाची सोय नाही.
पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.

!आजचे शिव-दिनविशेष🚩 16 मार्च 1673

!आजचे शिव-दिनविशेष🚩
16 मार्च 1673
"कोंडाजी फर्जद" यांनी केवळ 60 मावळ्यांच्या साथीने जिंकलेला "किल्ले पन्हाळा" वर छञपती शिवरायांचे पुन्हा आगमन.
छञपतींचे किल्ल्यावर आगमन होताच दक्षिण दरवाजावरील भालदारांनी महाराजांची ललकारी दिली. महाराजांनी सबंध गडाचे अतिप्रेमभराने दर्शन घेतले.
"कोंडाजी फर्जद" आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. त्यांना खूप धनदौलत देऊन त्यांची पाठ थोपटली.
असा मायावंत राजा "आई भवानी" ने आपल्याला दिला, म्हणून सर्वांनाच धन्य धन्य वाटले.
तब्बल 12 वर्षांनंतर "किल्ले पन्हाळा" स्वराज्यात सामील झाला होता.

"जय भवानी, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे"
"जय महाराष्ट्र, जय गडकोट"
!! हर हर महादेव !!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
संदर्भ:- "सह्याद्रीचे अग्निकुंड"
© "सह्याद्री प्रतिष्ठान -महाराष्ट्र"

Friday, 13 March 2015

Will Make An Impact Soon..!!!

जगदीश्वर ध्यानस्त नरसिंह
कृतागसमपि त्राह्यत्रेर्मृत्योस्त्वं च मिषक्तमः ।
तत्संधिं भिंधि सर्वाकयोनेर्मुञ्चस्व मां शिव ॥६॥

श्रीद पुष्टिद ते व्याप्तं दिक्षु क्षीरनिभं यशः ।
रुङ्मार्ष्टिकृद्रक्ष मां त्वं गंगा यन्मूर्ध्नि चर्क्षराट् ॥७॥

द्रष्टा वसति सर्वत्र बत मामीक्षसे न किम् ।
स्तुतेर्धर्मेशशक्तिर्निरस्तमृत्योनमेजते ॥८॥

तिष्ठानंदद चित्ते मे समंतात् परिपालय ॥९॥

इति श्रीवासुदेवानंदसरस्वतीविरचितं महारुद्र स्तोत्रं संपूर्णम् ॥


३८५ वर्षानंतर पुन्हा...

३८५ वर्षानंतर पुन्हा...
भाग १ ला
शिवबा..कुठं निघालात ! (मांसाहेब जिजाऊ शिवरायांना उद्देशून)
आऊसाहेब खूप दिवसापासून आमचा सह्याद्री आम्हाला त्याच्या भेटीला बोलवत आहे.म्हटलं जरा त्याची भेट घेवून यावी.म्हणून सह्याद्रीच्या भेटीला जात आहे.
शिवबा मागच्या वेळेस तुम्ही गेला होता तेव्हा हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची शपथ घेवून आला होतात.ते हि मला न सांगता..परंतु आता तसलं काही करू नका म्हणजे झालं.
कारण तेव्हा ती गरज होती..आणि आता ती इतिहास जमा झालेली एक सुंदर गोष्ट आहे.
आता शास्त्रासहित कार्यभाग घडू द्या.आपण त्या निसर्गाच्या शास्त्राआड येता कामा नये.
ठीक आहे आऊसाहेब आम्ही या निसर्ग परमेश्वराच्या शास्त्रधरून सुरु असलेल्या कार्यात बाधा येईल असा कोणतचं कार्य करणार नाही.आम्ही फक्त सह्याद्रीचा फेरफटका मारून येतो...
आशीर्वाद असावा... जगदंब !
आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत.
(जिजाऊसाहेबांनी शिवरायांना आशीर्वाद देऊन सह्याद्री भेटीची परवानगी दिली.)
अरे..राज्या तुझ्या मायला..ते पोरग कुठं गेल बघ जरा,इथे मिरवणुकीची तयारी झालेली आहे.त्याला लवकर शिवाजी महाराजांचे कपडे घाल आणि तो घोड्यावाला आला कि नाही ते पण बघ..हो बघतो’’बघतो !
आईला गण्या..तुला कोणी दिली रे हि कापड,मायला लई भारी दिसतोस तू,एकदम शिवाजी महाराजांसारखाचं. मी शिवाजीचं आहे ! गण्या बोलू लागला..
राज्या म्हणतो..अरे तू शिवाजी महाराजांचे कापड घातले म्हणून तू त्यांच्यासारखा दिसत आहेस फक्त कळल का.उगाचं शिवाजी महाराजं बनू नको..चल लवकर खाली सर्व तुझी वाट बघत आहेत मिरवणुकीला सुरवात होईल थोड्या वेळात.अरे हा घोड्यावाला का नाही आला अजून..तितक्यात गण्या बोलला माझा अश्व मी सोबत आणला आहे. हो का महाराजं कुठं आहे तुमचा अश्व..आणि गण्याने हृदयावर हाथ ठेवला आणि फक्त जगदंब म्हटलं तितक्यात अश्व समोरून घावत आला.राज्याला काही कळतं नव्हत,शेवटी त्याने लक्ष न देता.गण्याला घेवून गेला आणि त्याला त्या अश्वावर बसवलं.आणि त्या शिवाजी महाराजांचे रूप धारण केलेल्या गण्याला अश्वासोबत शिवरायांच्या स्मारका जवळ आणून उभ केलं.आणि तो दुसऱ्या कामाला लागला..
मित्रांनो..शिवरायांच्या स्मारकाजवळ अश्वावर विराजमान झालेली ती व्यक्ती दुसरी कोणी नसून साक्षात विश्ववंदनीय शिवाजी महाराजंचं होते.त्या ठिकाणी गण्याने शिवरायांचे नाही तर शिवरायांनी त्या बाल गण्याचे रूप धारण केलेले होते.
थोड्या वेळाने शिवाजी महाराजांच्या बाजूला दोन मावळे आले.त्या दोघांनी सर्व प्रथम महाराजांना मुजरा केला आणि बोलले महाराज आपण हे असले बाळरूप धारण कराल असं वाटलं नव्हतं.आणि महाराजांनी एक स्मित हास्य केलं आणि बोलले आज शिवजन्मोत्सव साजरा केला जात आहे. म्हटलं चला आज शिवभक्तांच्या आनंदात आपण पण शामिल होऊ या ..पण तुम्ही असे अचानक इथे कसे आलातं.महाराजं आम्हाला आऊसाहेबांनी तुमच्या सोबतीला पाठवलं आहे.
(कदाचित त्या मावळ्यांनी सुद्धा तेथील मावळ्यांचे रूप धारण केलेलं असावेत)
आणि महाराजांनी हृदयावर हात ठेवून आऊसाहेबांचे स्मरण केलं आणि बोलले
“आऊसाहेब आम्हाला माफ करा आम्ही आपल्या पासून एक गोष्ट लपवली.ती म्हणजे आम्ही इथं सह्याद्रीचा फेरफटका मारायला नाही तर या सह्याद्रीच्या गडवाटची वाट लावणाऱ्या माणसांना योग्य वाटेवर आणण्यासाठी आलो आहोत...जगदंब !
ये चला..प्रमुख पाहुणे आलेत.मिरवणुकीच्या उद्घघाटनप्रसंगी एक प्रमुख व्यक्तीला तिथे बोलावण्यात आलेलं होत.त्याने सर्व प्रथम महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून त्यांना नमस्कार केला नंतर महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले आणि आरती ओवाळली व श्रीफळ फोडून मिरवणुकीला सुरवात झाली.कलियुगातील मिरवणुकीचा ताफा हा तुम्हाला माहिती आहेचं, सुरवातीला डी.जे. नंतर स्वयंघोषित बेधुंदपाने नाचणारे मावळे...नंतर स्वतः साक्षात शिवाजी महाराज आणि त्यांच्या सोबत असलेले दोन मावळे म्हणजे नेताजी आणि तानाजी.व महाराजांच्या मागे एका वाहनावर ठेवलेली महाराजांची मूर्ती होती.मिरवणुकीचा ताफा वाजत गाजत पुढे सरकत होता.तितक्यात तानाजी महाराजांना म्हणाला राजं हा कसला शिवजन्मोत्सव आपल्या मावळ्यांनी तलवारीच्या खणखनाटावर मोघलांना नाचवलं होत पण आज स्वतःला तुमचे मावळे म्हणवून घेणाऱ्यांना नाचवायला ढोलकीची एक थापचं पुरेशी आहे.बघा कसे नाचता आहे बेधुंद होऊन.
तितक्यात नेताजी बोलला महाराज ते बघा ते काहीतरी पेय पीत आहे आणि लगेच नाचायला घुसत आहेत.काय असेल हो महाराजं ते.महाराज बोलले माहिती नाही.
नंतर नेताजीने त्या मिरवणुकीतील एका व्यक्तीला विचारलं कि अरे भावा ते लोक काय पेय पीत आहेत. तर तो बोलला कि ती दारू आहे दारू.नंतर नेताजी महाराजांना म्हणाला महाराज दारू तर आपण पीत नव्हतो आपण तिला फक्त बारूद उडवायला वापरत होतो.पण हि कोणती दारू आहे अशी जिला हे लोक पीत आहेत.तेव्हा महाराज बोलले कदाचित ते मद्य असावं.
आणि ते मद्य पिऊन हि माकड माझ्या समोर नाचत आहे. खरचं निर्लज्जतेचा कळस केला या सर्वांनी..आणि महाराजांनी डोळे बंद केले आणि एक क्षण हि तिथे न थांबता महाराजांनी थेट प्रतापगड गाठला..त्यांच्या मागोमाग नेताजी आणि तानाजी सुद्धा प्रतापगडावर महाराजांच्या समोर हजर झाले. महाराजांनी व दोघ मावळ्यांनी त्यांची खरी रूप धारण केली.
तानाजी : महाराजं आपण तिथून असे अचानक का निघून आलात..
महाराजं : तान्हा..आम्ही आऊसाहेबांना शब्द दिला आहे कि,आम्ही शास्त्रसोडून कुठलंच कार्य करणार नाही.आणि आम्ही जर अजून काही वेळ त्या माणसांच्या मिरवणुकीत असतो तर कदाचित आमच्या म्यानातून भवानी बाहेर उपसली गेली असती आणि आमच्या हातून कित्येक जणांचा नरसंहार घडला असता.अरे कसला अभिमान आणि स्वाभिमान बाळगत आहे हि माणसं.ज्यांना माणूस म्हणायची सुद्धा आम्हाला लाज वाटते.हिचं काय ती रयत ज्यांच्यासाठी आम्ही आमची जीवाभावाची माणसं गमावली.. काय तर शिवजन्मोउत्सव म्हणे..
अरे शिवजन्मोत्सव तर फक्त नावाला आहे त्या मागे यांची हि असली गैरकृत्य चालतात,आज आम्हाला आऊसाहेबांना दिलेला शब्द अडवत आहे नाहीतर...
तानाजी आणि नेताजी : महाराजं शांत व्हा !
नेताजी : महाराज सर्वच ठिकाणी अश्याप्रकारे शिवजन्मोत्सव साजरा होतो असे नाही.काही ठिकाणी आपल्या पालखीचे सुद्धा आयोजन केले जाते तिथे पारंपारिक वाद्य वाजवली जातात.पोवाडे म्हटले जातात.सांस्कृतिक आणि समाज प्रबोधन करणारे कार्यक्रम सुद्धा राबवले जातात.आजही असे कार्यक्रम आयोजित केलेले असतीलं आपली आज्ञा असेल तर आपण तिथे जाऊया..
महाराज : नेता..आम्हाला माहिती आहे.पण तुम्ही सांगितलेली शिवजयंती हि दर वर्षी नित्यनियमित न चुकता साजरी केली जाते.बरोबर ना..
नेताजी : व्हयं महाराजं !
महाराजं : मग तरी सुद्धा यांच्यात बदल का नाही.वर्षातून एकदाचं यांना माझे गुणगान गावसं वाटतं, दर वर्षी माझा वेश धारण करून मिरवणुकीत एक दिवसाचा का होईना पण कोणीही शिवाजी महाराज बनतो.पण पुढचं वर्ष येईपर्यंत त्याने आम्हाला आवडेल असं एकही कर्म केलेलं नसतं.मग यांच्या पेक्षा शिवा काशीद श्रेष्ठचं म्हणावा लागेल.जो एक दिवसाचा शिवाजी महाराज बनला पण आमच्या हृदयावर त्याचं नाव कोरून गेला.पण यांना आमच्या हृदयावर नाव कोरता येण्याइतक कार्य करता तर येत नाहीचं नाही. पण यांना साध माझं हृद्य म्हणून या सह्याद्रीच्या कुशीत उभी असलेली गडकिल्ले सुद्धा शाबूत ठेवता येत नाही.त्यांचं संवर्धन करता येत नाही.माझ्या जयंतीला हा असला नाच गाण्यात पैसा खर्च करण्यापेक्षा तो पैसा माझ्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी खर्च केला तर तिचं खरी शिवजयंती असेल आणि तोच खरा मला केलेला मानाचा मुजरा असेलं.
तानाजी : महाराज क्षमा असावी.. पण तो काळ वेगळा होता.
महाराजं : का ! पुन्हा शिवा
काशीदसारखे,बाजीप्रभू यांच्यासारखे,तुमच्यासारखे जीवाचं रान करून मातृभूमीचं रक्षण करणारे मावळे जन्माला घालायचं सामर्थ्य या मातृभूमीत राहिलेलं नाही का ? तान्हा..
तानाजी : नाही महाराजं मला तस म्हणायचं नव्हतं.
नेताजी : महाराज आताचा हा काळ खूप बदललेला आहे.तुम्ही फक्त हा शिवजन्मोत्सव अनुभवून बघितला.तुमची परवानगी असेल तर मी तुम्हाला आताचे संपूर्ण दैनंदिन जीवनाचे दर्शन घडवतो.
महाराजं : नेताजी आम्ही या ठिकाणी आलो ते याचं कारणासाठी,आम्हाला या दुबळ्या रयतेचे प्रश्न सोडवायचे आहे आणि राजकीय सत्तेचा आणि पैशांचा माज चढलेल्या यवनांच्या हातून पुन्हा एकदा माझा सह्याद्री मला स्वतंत्र करायचा आहे.
नेताजी : आज्ञा महाराजं ! तुम्ही सांगाल तसचं होईलं.
महाराजं : तान्हाजी आणि नेताजी आपण देव,देश,धर्म आणि माणूस या चारही जणांना आमच्या समोर हजर करा. त्यांच्या समस्या काय आहेत आणि त्यांची चूक काय हे आपण त्यांच्या कडूनच जाणून घेवू. आणि आपली भेट आता थेट रायगडावरचं होईलं.
या तुम्ही आता.
(महाराजांना मुजरा करून, महाराजांची आज्ञाप्रमाण म्हणून तानाजी व नेताजी हे देव देश आणि धर्म तसेच माणूस यांचा शोध घ्यायला गेले.)
(- “मित्रांनो शब्दात न धरता त्या मागची भावना जाणून घ्या..”) लवकरच पुढील भाग...
- शिवाजी राजे यांच्या समोर ते चारही (देव देश आणि धर्म तसेच माणूस ) आले तर त्यांच्याशी महाराजांचा काय संवाद होईल...ते पुढील भागात !
----- क्रमश :-----
जय भवानी जय शिवाजी
साभार - सागर महाडिक (शाब्दिक वादळ)
जगदंब
--------------------------------


एक सत्य, भयानक रंगपंचमीचे.

एक सत्य, भयानक रंगपंचमीचे.
वाचा, आपसूक डोळ्यात पाणी येईल, नक्कीच हाताच्या मुठी आवळल्या जातील, रक्ताच्या जागी धमन्यात ज्वाला वाहेल,
सव्वातीनशे वर्षे झाली त्या रंगपंचमीला... पुण्याजवळच...१० कोसांवर भीमा नदीच्या तीरी दोन गावे
आहेत आमने सामने... वढू आणि तुळापूर... अतिशय रम्य परिसर... झोकदार वळण घेऊन
वाहणारी जणू दुसरी चंद्रभागाच...
तिच्या तीरावर ती रंगपंचमी सुरु होती.... आपला राजा, रयतेचा तारणहार,
यवनांचा कर्दनकाळ, हिंदुस्थानवर धर्मरक्षणाचे मजबूत छत्र धारण
केलेला छत्रपती, शंभूमहादेवाच्याच
प्रलयंकर रुपाचे अवतार, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज.
भटक्या कुत्र्यांच्या तावडीत बेसावध सिंह सापडावा तसे औरंग्याच्या कचाट्यात
सापडले होते...
सापडतात कसले, फ़ंदफ़ितुरीचा छंद लागलेल्या स्वकीय नातेवाईकानेच दिलेल्या माहितीमुळे अनाहुतपणे फसवले गेलेहोते.
आणि त्या वखवखलेल्या लांडग्यांनी सुरु केली ती रंगपंचमी...
रोज एक एक अवयव कलम करीत शंभुराजांना इस्लामच्या जाळ्यात ओढण्याचे हजार यत्न त्यांनी करून पाहिले...
पण छे! अहो जो राजा केवळ ९ वर्षात १३० लढायांमध्ये महापराक्रमाने विजय
संपादन करून एका वेळी १०-१० शत्रुंशी टक्कर घेऊन त्यांना मातीत मिळवून बसला होता तो असल्या भ्याड कृत्यांनी आपला धर्म बदलेल?
कालत्रयी अशक्य!
एकवेळ सूर्य पश्चिमेला उगवेल पण सच्चा धर्मभक्त हिंदू अन्य
धर्माचा स्वीकार करणार नाही!
शेकडो लढायांमध्ये शत्रूच्या रक्ताने रंगपंचमी खेळलेला हा महायोद्धा आज
मात्र स्वत:च्याच रक्ताने
माखला होता...
अंगावरची संपूर्ण
कातडी सोलली गेली होती...
पुन्हा खपल्या धरल्या तर त्याही काढून यवन आपल्या पाशवी वृत्तीचा परिचय देत होते...
त्यांना हेच कळत नव्हते की ते
शंभूराजांना नाही तर हिंदू
धर्माला डागण्या देत आहेत!
खवळलेला हिंदू समाज पुढे याच औरंग्याला दक्खनच्याच मातीत गाडून अटकेपार भगवा घेऊन गेला ते काय उगाच
की काय??
त्याही भीषण परिस्थितीत
एका सच्च्या मित्राप्रमाणे त्यांना साथ देणारे "कवीराज कलश" हेही कैद होते... प्रत्येक पाशवी अत्याचार त्यांच्यावरही केला जात होता...
तशातही न डगमगता त्यांनी या रंगपंचमीचे वर्णन आपल्या शीघ्रकाव्यात करून ठेवले.!
यावन रावन की सभा....
शंभू बंध्यो बजरंग......
त्या दुष्ट रावणाच्या सभेत जसे
हनुमंताला बंदी करून आणले होते ना तसे या लांडग्यानी आज
माझ्या शंभूराजाला बंदी केले आहे.!
लहु लसत सिंदुरसम....
खूब खेल्यो रणरंग.....
पूर्वी शत्रूच्या रक्ताने
रंगपंचमी खेळलेल्या या राजाचे सर्व शरीर आज लसलसणा-या जखमांतील रक्ताने माखून,
लाल शेंदूर फ़ासलेल्या हनुमंता सारखेच सारखेच लाल बुंद झालेले आहे!
ज्यों रवि छवी छलत ही,
खद्योत होत बदरंग....
सूर्य उगवल्या उगवल्या जसा काजवा निस्तेज होऊन जातो....
त्यों तुव तप तेज निहार तखत तजों अवरंग....
अरे राजा अगदी तसाच
तुझ्या तेजाचा प्रखर आविष्कार सहन न झालेला हा औरंग्या तुझ्याकडे बघवत नसल्याने खाली मान घालून बसलाय!
नमाज कसला पढतोय हा! घाबरलाय तुला!
स्व-धर्मापुढे काय तुच्छ लेखलं असेल या महावीरांनी आपल्या जीवनाला !
कोटी कोटी सलाम या निर्भय निडर वृत्तीला!
ही रंगपंचमी शंभूराजे खेळले नसते तर आज आपल्याला रंगपंचमी खेळायची संधीच मिळत नव्हती मित्रांनो,
हे इतिहासपूत्रानो सत्य कायम ध्यानात ठेवा!
खरेतर हा बलिदान मास
दु:खाचा महिना...
या काळात हिंदूंनी काहीच आनंदाचे सण समारंभ करू
नयेत...
आपल्या बापाचे सुतक असताना जसे आपणा हे
नियम पाळतो ना तसेच या हिंदू
धर्माच्या बापासाठी,
शंभूराजांसाठी आपणा करू तितका त्याग थोडाच आहे...
परंतु निदान रंगपंचमी खेळताना, रंग उडविताना इतके तरी ध्यानात राहू द्यावे की माझ्या राजाने स्वत:च्या रक्ताने रंगपंचमी खेळली म्हणून
आज आम्ही ही रंगपंचमी ३२५ वर्षांनंतर सुद्धा निर्धोकपणे खेळतो आहोत!
धर्मवीराग्नी, धर्मतेज, धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराज की जय.

Friday, 6 March 2015

असे पुरंदर किल्ल्याचे वर्णन केलेले आढळते.


अल्याड जेजुरी
पल्याड सोनोरी
मध्ये वाहते कऱ्हा
पुरंदर शोभती शिवशाहीचा तुरा ||

असे पुरंदर किल्ल्याचे वर्णन केलेले आढळते. पुरंदर म्हणजे इंद्र. ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान अढळ आहे तसाच हा पुरंदर किल्ला. पुराणात या डोंगराचे नाव आहे ’इंद्रनील पर्वत’. हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला, तोच हा इंद्रनील पर्वत.

११ जून १६६५ साली इतिहास प्रसिद्ध ’पुरंदरचा तह’ झाला. यात २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले त्र्यांइची नावे अशी,

१ पुरंदर २ रुद्रमाळ किंवा वज्रगड
३ कोंढाणा ४ रोहीडा
५ लोहगड ६ विसापूर
७ तुंग ८ तिकोना
९ प्रबळगड १० माहुली
११ मनरंजन १२ कोहोज
१३ कर्नाळा १४ सोनगड
१५ पळसगड १६भंडारगड
१७ नरदुर्ग १८ मार्गगड
१९ वसंतगड २० नंगगड
२१ अंकोला २२ खिरदुर्ग (सागरगड)
२३ मानगड

महाराष्ट्र हा डोंगरांचा देश, दुर्गांचा देश.



महाराष्ट्रातील गड-किल्ले

महाराष्ट्र हा डोंगरांचा देश, दुर्गांचा देश.
गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राचे वर्णन कसे केले आहे?

'राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा'

अशा या राकट देशाचा प्रतिनिधी म्हणजे सह्याद्री. सह्याद्रीत कोठेही उभे राहून नजर फिरवली तर, दर चार-दोन शिखरांआड एखादं शिखर तटबुरुजांचं शेला-पागोटे चढवून उभं राहिलेलं आढळतं. यातील बहुतेक दुर्गांनी श्रीशिवछत्रपतींची चरणधूळ आपल्या मस्तकी धारण केली आहे. त्या शिवस्पर्शानं पावन झालेली ही महाराष्ट्राची धारातीर्थे आहेत. या गड कोट-किल्ले अन् दुर्गांमधून इये देशीचे पुत्र ताठ मानेने वावरले आहेत. या बळीवंत दुर्गांच्या आधारावरच शिवरायांनी परकीय, आक्रमक, धर्मांध सत्ताधीशांना नामोहरम केलं आणि या भूमंडळाचे ठायी , धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे हे समर्थ वचन सार्थ केले. दुर्ग म्हणजे काय? त्याचे प्रकार किती? महाराष्ट्रात असे किती दुर्ग आहेत? ते कुठे आहेत? तिथे पोचायचे कसे? गड किल्ले कसे पहायचे? त्यांचे महत्त्व काय? आजची त्यांची स्थिती कशी आहे? असे अनेक प्रश्न आपल्यासमोर येतात. त्यांची अभ्यासपूर्ण परंतु थोडक्यात माहिती प्रा. प्र.के. घाणेकर यांच्या सौजन्याने या विभागात दिलेली आहे.

चला तर पाठीवर एक पिशवी, भक्कम बूट,बरोबर खाण्याचे काही पदार्थ आणि पाणी घेऊन गड-किल्ले सर करूयात!

किल्ला म्हणजे काय?
जिथे राहून शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवता येते, वेळप्रसंगी शत्रूवर हल्ला करता येतो आणि नैसर्गिक किंवा मुद्दाम बांधकाम करून दुर्गम केलेल्या ठिकाणी राहिल्यामुळे आपले संरक्षण होते त्याला किल्ला असे म्हणतात. किल्ले ही लढायांची ठिकाणं. रणक्षेत्रांचे हे मानकरी म्हणजे स्वातंत्र्यात्मा सह्याद्रीची आभूषणेच आहेत. या किल्ल्यांचा परिचय महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्यकाने करून घ्यायला हवा. सुट्टीच्या वेळी या किल्ल्यांना भेट द्यायलाच हवी.

किल्ल्यांचे प्रकार

रामायण, महाभारत, अग्नीपुराण, कौटिल्याचे अर्थशास्त्र, ऋग्वेद, अग्नीपुराण,अथर्ववेद,वराहमिहिराची बृहत्संहिता , मनुस्मृती अशा जुन्या ग्रंथात किल्ल्यांचे महत्व दिलेले आढळते. म्हणजे त्याही काळात आपल्या देशात किल्ले होतेच. प्रथमं गिरीदुर्गंच , वनदुर्गं द्वितीयकम्
तृतीयं गव्हरं दुर्गं, जलदुर्गं चतुर्थकम् पंचमं कर्दमं दुर्गं, षष्ठं स्थान्मिश्रकं सप्तमं ग्रामदुर्गं स्यात कोष्टदुर्गं तथाष्टकम् - देवज्ञविलास, लाला लक्ष्मीधर लाला लक्ष्मीधराने देवज्ञविलास या ग्रंथात किल्ल्यांचे आठ प्रकार सांगितले आहेत. त्यातील सर्वात उत्कृष्ट गिरिदुर्ग - म्हणजे डोंगरी किल्ला, त्यानंतर वनदुर्ग म्हणजे अरण्यात असलेला किल्ला. गव्हरं म्हणजे एखाद्या गुहेचा उपयोग किल्ल्यासारखा करता आला तर तो तिस-या श्रेणीचा किल्ला मानला जातो. चौथ्या दर्जाचा किल्ला म्हणजे जलदुर्ग - पाण्यातला किल्ला. कर्दमं म्हणजे चिखलात किंवा दलदलीच्या प्रदेशातील किल्ला हा पाचव्या प्रतीचा तर मिश्रपध्दतीचा किल्ला म्हणजे सहाव्या प्रतीच किल्ला. संपूर्ण गावकुस किंवा गावाभोवती कोट
असेल तर तो सातव्या प्रकारचा किल्ला व एखादा नुसता कोट किंवा गढी हा आठव्या प्रकारचा किल्ला. सर्वसाधारणपणे डोंगरावर असणारा गिरिदुर्ग, समुद्रात बेटावर असणारा जंजीरा किंवा जलदुर्ग, जमिनीवर असणारा भुईकोट किंवा स्थळदुर्ग असे
किल्ले आपल्याला माहीत असतात.

किल्ल्यांचे महत्व

गडकोट, किल्ले आणि दुर्ग ही संघर्षाची प्रतिके. शत्रूशी लढण्यासाठी या किल्ल्यांचा आधार घेतला जाई. ज्याच्या हाती अधिक किल्ले तो राजा आपल्या प्रजेचे जास्त चांगले संरक्षण करू शकत असे अशी शिवाजी महाराजांच्या काळी परिस्थिती होती. आपल्या पूर्वजांनी प्राणांची बाजी लावून हे गड जिंकले व शत्रूंशी ते झुंजले. महाराष्ट्राची स्वतंत्र भूमी तयार होण्याआधी शौर्याचा एक मोठा इतिहास या किल्ल्यांनी पाहिलेला आहे. त्याकाळी स्वसंरक्षणासाठी महत्व असलेले किल्ले आज आपल्या इतिहासाची, आपल्या पूर्वजांच्या शौर्याची सोनेरी पाने म्हणून आपल्याला तितकेच महत्वाचे आहेत. आज महाराष्ट्रातील किल्ले पहायला गेले तर
सगळी अवकळाच दिसते. चांगल्या परिस्थितीत असलेले तट, बुरूज आढळत नाहीत. याउलट उत्तरभारतातील किल्ले मात्र सुंदर बांधकामे, देखणी तटबंदी यांनी नटलेले दिसतात. जुलमी-परकीय आक्रमकांशी या किल्ल्यांच्या मूळ मालकांनी स्वाभिमानशून्य तडजोडी केल्यामुळे हे किल्ले शाबूत राहिले. याउलट स्वातंत्र्याच्या आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातले किल्ले कोणतीही तडजोड न करता झगडत राहिले. त्यामुळेच आजला ते किल्ले म्हणजे पडक्या वास्तू आहेत. असे असले तरी ते आपली स्फूर्तिस्थाने आहेत.

महाराष्ट्र म्हणजे किल्ल्यांचा देश महाराष्ट्रात आहेत तसे आणि तितके किल्ले जगात अन्यत्र नाहीतच. दोन हजार वर्षांपूर्वीच्या सातवाहन राजवंशापासून ते राष्ट्रकूट, चालुक्य शिलाहार, यादव, कदंब, बहमनी, मोगल, दक्षिणी पातशाह्या, मराठे, पेशवे, हबशी, पोर्तुगीज, डच,इंग्रज अशा वेगवेगळया काळातल्या वंश - धर्माच्या सत्ताधीशांनी या देशात किल्ले बांधले.

महाराष्ट्रातील दुर्ग आणि छत्रपती शिवाजी महाराज - एक अतूट नाते

परक्या, धर्मांध, जुलमी सत्तांचा नंगानाच महाराष्ट्रभर चालला होता. रयतेला सुरक्षितपणे जगणे अशक्य झाले होते. पैसा-अडका, जमीन-जुमला, आया-बहिणींची अब्रू - सगळे धोक्यात आले होते. या जाचक पारतंत्र्यात शिवभास्कराचा उदय झाला आणि त्यांनी हा प्रदेश स्वतंत्र केला. त्यासाठी त्यांनी अनेक किल्ले ताब्यात घेतले. पूर्वी बांधलेल्या किल्ल्यांपैकी काहींची डागडुजी केली, काहींची फेररचना केली तर राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, कुलाबा, खांदेरी असे काही किल्ले त्यांनी पूर्णपणे नवीनच बांधले.

शिवाजीमहाराजांचे दुर्गबांधणीतले
अभिनव प्रयोग
१. डोंगर उजवीकडे ठेवून प्रवेशद्वाराशी येणारी मुख्य वाट. मध्ययुगात तोफा बंदुका असल्या तरी त्यांचा पल्ला कमी होता. त्यामुळे मुख्य लढाई डाव्या हाताला ढाल लटकावून अन् उजव्या हातातील तलवारीचे घाव घालून खेळली जाई. किल्ल्याकडे येताना तो डोंगर व ती तटबंदी उजवीकडे असेल तर वरून येणारे गोफण-गुंडे , दगड, भाले, बाण व बंदुकीच्या गोळया इत्यादी उजव्या हातातील तलवारीने अडवणे अशक्य होई व किल्ल्यावरच्या मराठयांना डोंगर उजवीकडे ठेवून प्रवेश द्वाराकडे येणाऱ्या वाटेचा फायदा होई.

२. गोमुखी प्रवेशद्वारे -

शिवनिर्मित किल्ल्यांचे वैशिष्टय म्हणजे किल्ल्याच्या महाद्वाराची गोमुखी बांधणी, प्रवेशद्वार दोन बुरुजांमध्ये लपवलेलं असल्याने शत्रूला सहजासहजी न दिसणे, प्रत्यक्ष प्रवेशद्वाराजवळ दोन बुरुजांची अरुंद खिंड व हत्तीला धडक देण्यासाठी थोडं मागे जाऊन, पळत येऊन, दारावर मुसंडी मारण्याएवढी जागा ऐन दाराशी नसणे.

३. तटबंदीची बांधणी -

मालवण शेजारचा सिंधुदुर्ग हा बलाढय किल्ला बांधताना तटाचे चिरे शिसाचा उकळता रस ओतून बसविले होते. थळवायशेत जवळच्या खांदेरीचा किल्ला ऐन समुद्रात मुरूडच्या जंजिऱ्यावरील सिद्दी अन् मुंबईकर लुच्च्या इंग्रजांच्या विरोधात उभारला. तटबंदी बाहेर समुद्राच्या लाटा आपटतात. त्यापासून संरक्षण आणि तटाशी कोणीही लगट करू नये म्हणून दगडांची रास तेथे ओतली. मुरूडच्या जंजि-याशेजारी उभारलेल्या पद्मदुर्गाची बांधणी तर अशी पक्की की तेथे बांधलेल्या तटबंदीतील दगडी चिरे गेल्या तीनशे वर्षात लाटांच्या माऱ्याने
झिजून गेले. पण चिऱ्यांमधील दरजांमधील चुना अजूनही शाबूत आहे. शिवछत्रपतींच्या किल्ल्यांसंबंधीच्या कल्पना 'रामचंद्रपंत अमात्य' या शिवकालीन मुत्सद्याने शिवराजनीती सांगणारा 'आज्ञापत्र' नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात शिवछत्रपतींच्या किल्ल्यांसंबंधीच्या कल्पना मोजक्या शब्दात परंतु चपखलपणे व स्पष्टपणे मांडलेल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत.

'संपूर्ण राज्याचे सार ते दुग'. दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येताच निराश्रय. प्रजा भग्न होऊन देश उध्वस्त होतो. देशच उध्वस्त झाल्यावरी राज्य असे कोणास म्हणावे?....ज्यापेक्षा राज्यसंरक्षण करणे आहे, त्यापेक्षा अधिकोत्तर साधनी स्वत: गडकिल्ल्यांची उपेक्षा न करिता, परम सावधपणे असतील त्या गडकिल्ल्यांची थोर मजबुती करावी. ....ज्यास राज्य पाहिजे त्यांनी गडकोट हेच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचे मूळ, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचे बल, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपली वसतीस्थळे, गडकोट म्हणजे सुखनिद्रागार, किंबहुना गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण असे पूर्ण चित्तात आणून कोणाचे भरंवशावर न रहाता त्यांचे संरक्षण करणे व नूतन बांधण्याचा हव्यास स्वत:च करावा. कोणाचा विश्वास मानू नये....... राज्य संरक्षणाचे मुख्य कारण किल्ले, ते देशोदेशी स्थळे पाहून बांधावे. किल्ल्यासमीप दुसरा पर्वत किल्ल्यासमुदायी असू नये. कदाचित असला तरी सुरुंग लावून, पाडून गडाचे आहारी आणावा.... गडाची इमारत गरजेची करू नये. तट, बुरुज, चिलखत, पाहारे, पडकोट जेथे जेथे असावे, ते बरे मजबूत बांधावे. नाजूक जागे जे असतील ते सुरुंगादी प्रयत्ने करून अवजड करून, पक्की इमारत बांधून गडाचा आयब काढावा. दरवाजे बांधावे. ते खालील मारा चुकवून, पुढे बुरूज देऊन, येती जाती मार्ग बुरुजाचे आहारी पडोन दरवाजे बांधावे...... किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे. याकरिता गड पाहून, एक-
दोन-तीन दरवाजे तशाच चोरदिंडया करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेऊन ,
वरकड दरवाजे व दिंडया चिणून टाकाव्यात....गडास यावयाचे मार्ग असतील ते सुगम नसावे. सुगम असले तर ते मार्ग मोडून
त्यावर झाडी वाढवून आणखीकडे परके फौजेस येता कठीण असे मार्ग घालावे. या विरहित बलकुबलीस चोरवाटा ठेवाव्यात. त्या सर्व काळ चालू देऊ नयेत.... गडाची राख़ण म्हणजे कलारग्याची झाडी..... गडांवर आधी उदक पाहून किल्ला बांधावा... पाणी बहुत जतन राखावे...
गडावरी राजमंदिराविरहित थोर इमारतीचे घर बांधो नये...तटोतटी केर कसपट किमपि पडो न द्यावे. ताकीद करून झाला केर गडाखाली टाकता,
जागजागी जाळून ती राखही परसात टाकून घरोघर होईल ते भाजीपाले करावे.... तटास झाड वाढते ते
वरचेवरी कापून काढावे. तटाचे व तटाखाली गवत जाळून गड नाहाणावा लागतो.... गडावरी झाडे जी असतील ती राखावी.

वेरूळ हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्वजांच्या पाटीलकीचे गाव .


वेरूळ हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्वजांच्या पाटीलकीचे गाव . घृष्णेश्वर हे त्यांचे कुलदैवत . आपल्याला कीर्ती व संपत्ती याच कुलदैवतेच्या कृपेने प्राप्त झाली , या श्रद्धेपोटी या घराण्यातील मालोजीराजे भोसले यांनीही या मंदिराचा जीर्णोद्धार सुमारे सतराव्या शतकाच्या प्रारंभी केल्याचा उल्लेख येथील भांडार गृहावरील शिलालेखात सापडतो. यापूर्वीचे हे मंदिर काळ्या पाषाणात बांधलेले होते.

आमचा "मुरारबाजी" पुरंदरावर लढत होता.


आमचा "मुरारबाजी" पुरंदरावर लढत होता. 'दिलेरंखानाशी' छातीझुंज घेत होता. वाऱ्यावर भिरभिरणारी त्याची "नजर' आणि विजेसारखी चमकणारी त्याची "तलवारं" बघता बघता साऱ्या यौवनांना सर्रा सर्रा सर्रा कापून काढत होती.
त्या 'दिलेरंखानानं' तेज बघितलं...

"अरे! रुको, रुको, रुको ये मुर्रार रुक!"..."अरे! इतनी ताकद, इतना
जिगरंबाज...क्यूँ,,क्यूँ,,क्यूँ मर्र् रहा हैं यहा...???, क़िला तो हमने लेही लिया हैं मुर्रार!
तो अपनी जान क्यूँ गवाँ रहा हैं, आओ हमारे पास जहागीर देंगे बादशाह!

आणि कडाडला मुर्रार...
"अरे! माझ्या राजानं मला काय कमी केलंय म्हणून येऊ तुझ्याकडं...!"
अखेरं "मुर्रार" पडला, "मुर्रार" सारखा धुरंदर गेला..."राजांचा पुरंदर वाचला"

अरे! जिथं पोरं "जगण्यासाठी" उभा केली जातात,
तिथं पोरं खूप लवकर "मरंतात "...
आणि जिथं पोरं "मरण्यासाठी" तयारं केली जातात,
तिथं पोरं "मेली तरी पूरून उरंतात"

"हा महाराष्ट्राचा इतिहास आहे"

!!! जय भवानी जय शिवाजी !!!
!!! जय महाराष्ट्र !!!

ज्ञानकोविंद_नृपशंभू



ज्ञानकोविंद_नृपशंभू
 
राजा कसा असावा याबद्दल नृपशंभू (संभाजी महाराज) लिहितात -

शास्त्राय गुणसंयोग: शास्त्रं विनयवृत्तये ।
विद्याविनीतो नृपति: सतां भवति संमतः ।।१।।

शास्त्रासाठी गुणांचा समन्वय नम्रवृतीने शास्त्राभ्यास, असा विधेने नम्र झालेला (विजयी) राजा सर्व संज्जनांना आवडत असतो.

मेधावी मतिमानदिनवदनो दक्ष: क्षमावानृ ऋजु-
ध्रम्रात्माप्यनसूयको लघुकर: षाड्गुन्यविच्क्षक्तीमान ।
ऊत्साहि पररंध्रवित्क्रूतधृतिवृद्विक्षयस्थानवित्त
शुरो न व्यसनी स्मरत्युपकृतं वृद्धोपसेवि च यः ।।२।।

शब्दार्थ : दिनवदन - गरिबांच्या दु:खांना बोलके करणारा । ऋजु - सरळ ।
अनसूयक - द्वेष न करणारा । लघुकर - अल्पकर घेणारा । षाड्गुण्यार्वद - राजनीतीचे ६ गुण जाणणारा ,
कृतधृतिवृद्विक्षयस्थार्नावत्त - धर्याने कुठे जोराने तर माघार घ्यायची जाण असलेला ।
इतका प्रचंड दूरदृष्टी असलेला,रयतेला जपणारा जाणता राजा महाराष्ट्राला लाभला !

मराठीच्या उद्धाराचे कार्य : दोन युगपुरुष : शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर



मराठीच्या उद्धाराचे कार्य : दोन युगपुरुष :

शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर

छत्रपती शिवाजी महाराज :

मराठी भाषा साधारणतः इसवी सनाच्या दहाव्या शतकापासून अस्तित्वात आहे असं आज ठामपणे सांगता येतं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या किमान सहाशे वर्षे आधीपासून.. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळेस राज्यकारभारात लष्करी बाबतीत, मुलकी बाबतीत, धर्मसभेच्या बाबतीत, न्यायाच्या इत्यादींच्या बाबतीत ज्या नवीन गोष्टींचा अंतर्भाव केला त्यामध्ये ‘लेखनप्रशस्ती’ हासुद्धा एक महत्त्वाचा भाग होता. विविध प्रकारचे लिखाण कसे करावे, त्यासाठी कशा प्रकारची काळजी घ्यावी यासाठी महाराजांनी काही नवीन सुचना अथवा प्रघात सुरू केला. यासाठी महाराजांनी बाळाजी आवजी चित्रे या आपल्या चिटणीसांना आणि अशाच काही भाषापंडितांना एकत्र बोलावून एक सुंदर ग्रंथ लिहीण्याची आज्ञा केली. या ग्रंथाचे नामकरण करण्यात आले ‘लेखनप्रशस्ती’ !

बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रावर सुलतानांचे आक्रमण झाले. त्याआधी, महाराष्ट्राचा पंतप्रधान होता हेमाद्रीपंडित अथवा ज्याला मराठी लोक अशुद्ध भाषेत म्हणत हेमाडपंत ! वास्तविक पंत हा शब्दही मुसलमानी उच्चारातून बनलेला आहे. मूळ शब्द आहे पंडित. त्या शब्दाचा मुसलमानी उच्चार पंडत. मग त्या पंडताचा पंङ्त, नंतर पंत असा उच्चार होऊ लागला. पूर्वीच्या काळी ब्राह्मण हा हुशार असल्याचा समज असल्याने त्याला पंडित म्हणण्याचा प्रघात होता, आणि पुढे कालानुरूप सगळ्याच ब्राह्मणांना पंत असे म्हटले जाऊ लागले. ते असो, सांगायचे असे, की या हेमाडपंताचे जसे महाराष्ट्रात सुंदर नक्षिकाम केलेली मंदिरे बांधण्यात लक्ष असे, तसेच मराठी भाषेकडेही तितकेच लक्ष असे. व्यक्तिच्या श्रेष्ठत्वानुरूप कोणाला किती महत्त्व द्यायचे आणि ते लिखाणातून कसे दर्शवायचे याबाबत हेमाद्रीपंडिताने काही नियम तत्कालीन व्यवस्थेत घालून दिलेले होते. अर्थात त्यातिल काही नियम पुढे सुलतानी अंमलातही तसेच सुरू राहीले परंतू अल्लाउद्दीन खलजीच्या आक्रमणानंतर महाराष्ट्राच्या मराठी भाषेवर मात्र अपभ्रंषाचा आणि अशुद्ध, परकीय भाषामिश्रणाचा प्रभाव पडला. आपले कित्येक शब्द भ्रष्ट झाले. दैनंदिन वापरात पूर्वी शुद्ध संस्कृतप्रचूर मराठी भाषेचे जे महत्त्व होते, ते गळून पडू लागले आणि आम्ही फार्सी अथवा उर्दू शब्दांना आपलेसे करू लागलो. क्षमा, पत्नी, दिनांक हे आणि असे अनेक मराठी शब्द जाऊन त्या जागी माफ, बायको, तेरिख असे परकीय शब्द आले ! बाहेरचे शब्द तर बाजूलाच राहीले, परंतू आपली मराठी मंगलमय वाटणारी नावे सुद्धा जाऊन मराठी लोक आपणाला सुलतानजी, पिराजी, शेखोजी, शहाजी, रुस्तुमराव, हैबतराव अशी मुसलमानी नावे स्विकारू लागले.

शिवकाळातही, सुरुवातीच्या काळात, किंबहूना राज्याभिषेकापर्यंत राज्यकारभारात असेच मुसलमानी उच्चारांचे तुर्की अथवा फार्सी शब्द रुढ झाले होते. राज्यकर्त्यांच्या पत्रांमध्ये तेरीख, माहे, मेहेरबान, किताबत इ असे कित्येक शब्द फार्सी होते. पूर्वीच्या, म्हणजे यादवसाम्राज्य बुडाल्यानंतरच्या मराठी सरदारांनी आपल्याच मराठी सरदार मित्राला लिहीलेल्या पत्रांमध्ये मायना कसा होता पहायचं आहे? पहा- “ मशहुरूल अनाम, अजरख्तखाने दामदौलतहू बजाने कारकुनाननी व हाल व इस्तकबाल.... ” आता हा मायना कोणत्या दृष्टीने मराठी भाषेतला वाटतो ? राज्यकारभारातही पेशवा, डबीर, सरलष्कर, फौज, सुरनवीस, मुजुमदार असे कित्येक वापरातले शब्द परकीय होते. महाराजांनी या शब्दांच्या बद्दल त्यांना प्रतिशब्द म्हणून अस्सल मराठी शब्दांचा कोश तयार करवून घेण्याचा संकल्प पूर्वीच सोडला असणार, परंतू १६४८ च्या पुरंदरच्या लढाईनंतर महाराजांना विश्रांती मिळालीच नाही ! पुढे गागाभट्टांनी महाराजांचे मन वळवून राज्याभिषेकासाठी तयार केले असता, त्याच वेळेस महाराजांनी आपल्या मनातील हे सारे संकल्प पूर्ण करण्याचे ठरवले. महाराजांनी रघुनाथ पंडितांकडून आणि धुंडीराज व्यासांकडून राज्यव्यवहार कोश आणि बाळाजी आवजी चित्र्यांकडून लेखनप्रशस्ती लिहून घेतली.

लेखनप्रशस्ती ही जशीच्या तशी आज उपलब्ध नाही. काळाच्या ओघात ती बहुतांशी नष्ट अथवा गहाळ झाली असावी. परंतू इतर साधनांवरून लेखनप्रशस्ती नेमकी कशी होती हे आपल्याला समजू शकते. या लेखनप्रशस्तीचा नेमका उद्देश तरी काय होता ?-

स्वराज्य निर्माण होऊन, राज्याभिषेकाच्या वेळेस निदान पंचवीस वर्षे तरी नक्कीच पूर्ण झाली होती. परंतू वर उल्लेख केल्याप्रमाणेच पत्रांचे मायने मात्र यवनीच होते. स्वराज्यातले मराठी लोक परस्परांस वा राजास लिहीतानाही मनाला येईल त्याप्रकारे मायना लिहीतात, हे महाराजांना पटत नव्हते. यामूळे एकप्रकारची हवी तशी शिस्त राज्यकारभारात राहत नाही. कोणाच्याही नकळत एक प्रकारचा ढिसाळपणा निर्माण होतो. आता स्वराज्यात मुसलमानी मायने घेणे अशक्य आहे.
हे राज्य हिंदूंचं असल्याने येथील राज्यकारभार असेल वा खाजगी-सामाजिक व्यवहार, इथे मराठी भाषेला महत्त्व प्राप्त झाले पाहीजे ! त्यामूळे, मुसलमानी अंमलाच्या पूर्वीचा लेखनाचा शिरस्ता काय होता त्यानुसार पुन्हा मराठी मराठी भाषेचे पुनरुज्जिवन करण्याचा महाराजांचा प्रयत्न होता. यासाठी महाराजांनी आधार म्हणून यादवकालिन हेमाद्री पंडितांनी घालून दिलेले नियम वापरण्याचा निर्णय घेतला.

एकूणच, महाराजांनी महाराष्ट्राच्या लेखनपद्धतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. लेखनप्रशस्ती आणि राज्यव्यवहारकोश हा त्याचाच एक भाग होय ! प्रथम भषेचे शुद्धीकरण झाले पाहीजे हा महाराजांचा आग्रह होता. एखाद्या गोष्टीच्या संज्ञा बदलल्या की त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात असणार्‍या संवेदनाही बदलतात, त्या गोष्टींकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलतो. आणि म्हणूनच, ज्ञानेश्वर महाराजांनी “ माझ्या मराठीचे बोलु कौतुके । परि अमृतातेही पैजा जिंके । ऐसी अक्षरें रसिकें मेळविन ॥ ” असं म्हटल्याप्रमाणे, छत्रपती शिवाजी महाराजांनी खरंच मराठीचे कोडकौतुक करून तीला पुनश्च राजभाषेचे स्थान बहाल करण्याचे महान कार्य केले

स्वातंत्र्यवीर सावरकर :

महाराष्ट्रातील आणखी एक तेजःपुंज व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ! महाकवी, नाटककार, समाजसुधारक, क्रांतिकारक इत्यादी सावरकरांची अनेक रुपे आपल्याला माहित आहेतच, परंतू यासोबतच सावरकर एक महान भाषातज्ञ आणि भाषासुधारक होते हे आपल्यापैकी कितीजणांना माहित आहे ? सावरकरांनी मराठी भाषेच्या उद्धाराकरीता “मराठी भाषेचे शुद्धीकरण आणि शब्दकोश” या नावाचा एक ग्रंथच लिहीला आहे. याआधी विष्णूशास्त्री चिपळूणकर या पुण्याच्या प्रख्यात भाषापंडितांनी आपल्या “निबंधमालेतून” मराठीच्या पुनरुज्जिवनाचे कार्य चालवलेच होते परंतू त्यांच्या अकाली निधनामूळे ते पुरे होऊ शकले नाही आणि नेमके तेच कार्य स्वातंत्र्यवीरांनी पुढे नेले. तत्काळी शिंद्यांच्या ग्वाल्हेर संस्थानामध्ये एक प्रातिनिधिक सभा स्थापन झाली तीचे नाव ठेवले “मजलिस-ए-आम” !! आता या शब्दाला सोप्पा शब्द “लोकसभा” आहे हे सावरकरांनी सांगितले नसते तर आपल्याला कळले असते का ? सावरकरांनी दिलेले परकीय भाषेतील शब्दांना अस्सल मराठी प्रतिशब्द पुढे उदाहरणादाखल दिले आहेत-

रजा = निरोप अथवा सुट्टी
इसम = मनुष्य
मालक = धनी
हवामान = ऋतुमान
शिवाय = विना
खबरदारी = सावधानता
हजर = उपस्थित
तयारी (तैयार) = सिद्धता
कारकीर्द = कार्यकाळ
जाहीर = प्रसिद्ध
सर्टीफिकेट = प्रमाणपत्र
स्कूल = शाळा
हायस्कूल = प्रशाळा
कॉलेज = महाविद्यालय
हेडमास्टर = मुख्याध्यापक (मुख्य अध्यापक)
प्रिन्‍सिपॉल = प्राचार्य
डिस्पेन्‍सरी (दवाखाना) = औषधालय
वकील = विधिज्ञ
टेलिफोन = दुरध्वनी
टेलिव्हिजन = दुरदर्शन
सर्क्युलर = परिपत्रक
सिनेमा = चित्रपट
फोटोग्राफ = छायाचित्र
डिरेक्टर = सुत्रधार अथवा दिग्दर्शक
इज्जत = प्रतिष्ठा

याप्रमाणे किमान १००० परकीय भाषेतील शब्दांना मराठी प्रतिशब्द देण्याचे काम सावरकरांनी केले. भाषेच्या सुधारणेतील ही एक क्रांतिच म्हणावी लागेल. आज आपण वापरत असलेले बहुतांश मराठी शब्द ही स्वातंत्र्यवीरांनी दिलेली देणगी आहे, आणि आज हे शब्द शाळेपासून व्यवसायापर्यंत, माजघरापासून जाहीर सभांपर्यंत आणि बोलीभाषेपासून लिखाणापर्यंत सगळीकडे वापरले जातात.

मराठी भाषेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देऊन तिच्या पुनरुज्जिवनाचे आणि भाषाशुद्धीचे महान कार्य करणार्‍या या दोन महाराष्ट्रपुत्रांना, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानाचा त्रिवार मुजरा !

- कौस्तुभ कस्तुरे

www.facebook.com/kaustubh.kasture
www.twitter.com/kasturekaustubh
© kaustubh kasture | www.kaustubhkasture.in

by कौस्तुभ कस्तुरे

Labels: संकीर्ण लेखसंग्रह

औरंगझेब किती मोठा धर्मांध होता




औरंगझेब किती मोठा धर्मांध होता हे कुणा कडुन लपलेले नाही .भारतात सर्वात जास्त कुणी हिंदुंची मंदिरे तोडली अस्तील तर तो औरंगझेब .औरंगझेब काही ही पाउल उचलायच्या आधी इस्लामच्या मोठ्या जानकाराला जरुर विचारायाचा .सम्भाजी महाराज असो कि गुरुतेग बहादुर आपल्या दुश्मनान्ना सजा द्यायची पधत एकच इस्लामी .सम्भाजी महाराजान्ना मारण्या आधी पण त्याने मौलवी कडुन सल्ला घेतला होता .

Based on Firmans, original edicts in Persian issued by Aurangzeb, preserved at the Bikaner Museum, Rajasthan, India...

On the 15th February 1689, Shambhaji and Kavi Kalash were brought to the Imperial camp dressed as buffons with long fool’s caps and bells placed on their heads, mounted on camels, with drums beating, with thousands of onlookers lining the roads. Aurangzeb was sitting in full darbar, and, at the sight of the prisoners, “descended from the throne and kneeling down on the carpet bowed his head to the ground in double thankfulness to the Giver of this crowning victory”. Shambhaji spurned at the offer of life and loosened his tongue in abuse of the Emperor. That very night his eyes were blinded and next day the tongue of Kavi Kalash was cut out. The Musalman clerics decreed that Shambhaji should be put to death.

After undergoing a fortnight of torture and insult, the captives were put to a cruel and painful death on the 11th March, their limbs being hacked off one by one and their flesh thrown to the dogs. Their severed heads were stuffed with straw and exhibited in all the chief cities of the Deccan to the accompaniment of drum and trumpet (Maasir-i-‘Alamgiri, 320-25; Muntakhab-ul-Lubab, 386-88, Sarkar, Aurangzeb, IV, pp.340-44).
— with NileSh Garade.

माझा सह्याद्री माझा अभिमान

माझा सह्याद्री माझा अभिमान

इंद्र जिमी जंभपर
(Like lord Indra attacked Jambhasur)
बाडव सुअम्भ पर (Like Badaw on Suambh)
रावण स दंभ पर, रघुकुल राज है
(Like Lord Ram ruled on the ego on Ravana)
पौन बारी बाह पर
(Like wind blows the water carrying clouds)
संभू रती नाह पर
(Like lord Shiva burned the lover of Rati )
ज्यो सहसबाह पर, रामद्विजराज है
(Like lord Parshuram attacked Sahasrabahu)
दावा द्रुमदंड पर
(Like the forest fire burns down trees)
चिता मृग झुंड पर (Like Cheetah on herd of Deers)
भूषण वितुंड पर (Like poet Bhushan on poetry)
जैसे मृगराज है (Like the king Lion)
तेज तम अंशपर (Like the light on the darkness)
कान्हा जिमी कंसपर (Like Lord Krishna on Evil Kansa)
त्यो म्लेच्छ वंशपर, शेर शिवराज है । (That way Lionhearted Emperor Shivaji is on all ill-willed )
शेर शिवराज है | शेर शिवराज है | शेर शिवराज है

Photography By--- Atul Vijay Chavan

शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!!
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा पेज आहे. फक्त एकदा या पेजला भेट द्या__/\__


शिवरायांनी मुठभर मावळ्यांच्या मदतीने पाच शाह्यांना पुरून उरत जे स्वराज्य उभे केले


शिवरायांनी मुठभर मावळ्यांच्या मदतीने पाच शाह्यांना पुरून उरत जे स्वराज्य उभे केले त्यामध्ये महाराष्ट्र,कर्नाटक ,तामिळनाडू,गोवाह्या राज्यांचा समावेश होता.महाराजांच्या स्वराज्यात असलेला एक किल्ला म्हणजे स्वराज्याची दौलतच..महाराजांच्या या दौलतीचा हा प्रांतनिहाय किल्ले

१) प्रांत कर्नाटक :- प्रांत जगदेवगड : ह्यात अठरा किल्ले होते.
त्यांचीनावे १.जगदेवगड , २.सुदर्शनगड ,३.रमणगड ,४.नंदीगड ,५.प्रबळगड ,६.बहिवरगड,७.वारुणगड ,८.महाराजगड,९.सिद्धगड,१०.जवादीगड,१२.मंगळगड,.१३.गगनगड,१४.कृष्णगिरी,१५.मल्लिकाअर्जुनगड,१६.कस्तुरीगड,१७.दीर्घपपलीगड ,१८.रामगड

२)प्रांत वेलूर- ह्यात सांप्रतचा अर्काट जिल्हा मोडतो.यात पंचवीस किल्ले होते
त्यांची नावे :-१.कोट आर्काट२.कोट लेखनुर,३.कोटपळणापट्टम ,४.कोटत्रीमळ,५.कोट त्रीवादी,६.पाळेकोट,७.कोटत्रिकोणदुर्ग,८.कैलासगड,९.चंजीवरा कोट,१०.कोट वृंदावन,११.चेतपाव्ह्ली,१२.कोल्बाळगड,१३.रसाळगड,१४.कर्मठगड,१५.यशवंतगड,१६.मुख्यगड,१७.गर्जनगड,१८.मंडविडगड १९.महिमंडगड २०.प्राणगड २१.सामरगड २२.साजरागड २३.गोजरागड २४.दुभेगड २५ अनुरगड .

३)प्रांत श्रीरंगपट्टण:-ह्यात बावीस किल्ले होते.
१.कोटधर्मपुरी २.हरिहरगड ३.कोटगरुड ४.प्रमोदगड ५.मनोहरगड ६.भवानीदुर्ग ७.कोट आमरापूर ८.कोट कुसूर ९.कोट तळेगिरी १०.सुंदरगड ११.कोट तळगोंडा १२.कोट अटनूर १३.कोट त्रिपादपुरे १४.कोट दुटानेटी १५.कोट लखनूर १६.कळपगड १७.महिनदिगड १८.रंजनगड १९.कोट आलुर २०.कोट शामल २१.कोट विराडे २२.कोट चंदमाल

४)प्रांत फोंडे बिदनूर :-ह्यात बारा किल्ले होते
त्यांची नावे १.कोडफोंडे २.कोट काहूर ३.कोट बकर ४.कोट ब्रम्हनाळ ५.कोट कडवळ ६.कोट अकोले ७.कोट कठार ८.कोट कलबर्गे ९.कोट शिवेश्वर १०.कोट मंगरूळ ११.कोट कडणार १२.कोट कृष्णगिरी

५)प्रांत बागलाण :-ह्या सात किल्ले होते
त्यांची नावे १.सालेरी २. नाहावा ३.हरसळ ४.मुलेरी ५.कणेरा ६.अहिवंतगड ७.घोडप

६) प्रांत त्रंबक:- ह्यात पंचवीस किले होते
त्यांची नावे:- १.त्रिंबक २.बाहुला ३.मनोहरगड ४.थळागड ५.चावंडस ६.मृगगड ७.करोला ८.राजपेहर ९.रामसेज १०.मासनागड ११.हर्षण १२.जवळागड १३.चांदवड १४.सबळगड १५.आवढा १६.कनकाई १७.गडगडा १८.सिद्धगड १९.मनरंजन २०.जीवधन २१.जीवधन २२.हडपसर २३.हरीन्द्रगड २४.पटागड २५.टनकई

७)प्रांत वनगड वगेरे :-ह्यात धारवाड जिल्ह्यातला बराच भाग मोडतो .यात एकंदर बावीस किल्ले होते .
त्यांची नावे :-१.वनगड २.गहनगड ३.चिमदुर्ग ४.नलदुर्ग ५.मीरागड ६.श्रीमंतदुर्ग ७.श्रीगद्नगड ८.नर गुंद ९.बहादूरविंडा १०.कोपलगड ११.महंतगड १२.व्यंकटगड १३.गंधर्वगड १४.ढाकेगड १५.सुपेगड १६.पराक्रमगड १७.कनकादिगड १८.ब्रम्हगड १९.चित्रदुर्ग २०.प्रसन्नगड २१.हडपसरगड २२.कांचनगड २३.अचलगिरीगड २४.मंदनगड

८)प्रांत कोल्हापूर,बाळापुर :- ह्यात सत्तावीस किल्ले होते
त्यांची नावे १.कोल्हार २.ब्रम्हगड ३.वड्न्नगड ४.भास्करगड ५.महिपाळगड ६.मृगमदगड ७.आंबेनिरायीगड ८.बुधला कोट ९.माणिकगड १०.नंदीगड ११.गणेशगड १२.खळगड १३.हाथमंगळगड १४.मंचकगड १५.प्रकाशगड १६.भिनगड १७.प्रेइवारगड १८.सोमसेखगड १९.मेदगिरीचेनगड२०.श्रीवर्धनगड २१.बिदनूरकोट २२.मलकोल्हारकोट२३.ठाकूरगड २४.सरसगड २५.मल्हारगड २६.भूमंगलगड २७.बिरुटकोट

९) प्रांत चंदी :-ह्यात ६ किल्ले होते
१.राजगड २.चेनगड ३.कृष्णगिरी ४.महोन्मतगड ५.आखलूगड ६.काळा कोट

१०)मावळ प्रांत सह्याद्री:- ह्यात सांप्रतचे मावळ ,सासवड ,जुन्नर व खेड हे तालुके मोडतात.ह्या प्रांतात एकंदर अठरा किल्ले होते .त्यांची नावे येणेप्रमाणे आहेत .
१.रोहीडा २.सिंहगड ३.नारायणगड ४.कुंवारी ५.केळणा ६.पुरंदर ७.दौलदतमंगळ ८.मोरगिरी ९.लोहगड १०.रुद्रनाळ ११.राजगड १२.तुंग १३.तिकोना १४.राजमाची १५.तोरणा १६.दातेगड १७.विसापूर १८.वासोटा १९ शिवनेरी ..

११)प्रांत सातारा वाई :- ह्यात अकरा किल्ले होते
१.सातारा २.वर्धनगड ३.परळी(सज्जनगड)४.पांडवगड ५.महिमानगड ६.कमळगड ७.वंदनगड ८.ताथवडा ९.चंदनगड १०.नांदगिरी ११.वैराटगड

१२)प्रांत पन्हाळा :- ह्यात तेरा किल्ले होते .त्यांची नावे
१)पन्हाळा २)खेळणा ३)विशाळगड ४.पावनगड ५.रांगणा ६.भुदरगड ७.गजेंद्रगड ८.मदनगड ९.भिवगड १०.भूपाळगड ११.गगनगड १२.बावडा

१३) प्रांत कोकण बंधारी व नलदुर्ग :-ह्यात एकूण ५८ किल्ले होते त्यांची नवे
१.मालवण २.सिंधूदुर्ग ३.विजयदुर्ग ४.जयदुर्ग ५.रत्नागिरी ,६. सुवर्णदुर्ग ७.खांदेरी ८.उंदेरी ९.कुलाबा १०.राजकोट ११.अंजनवेल १२.रेवदंडा १३.रायगड १४.पाली १५.कलानिधीगड १६.आरनाळा १७.सुरंगगड १८.मानगड १९.महीपतगड २०.महीमंडन २१.सुमारगड २२.रसाळगड २३.कर्नाळा २४.भोरप २५.बल्लाळगड २६.सारंगगड २७.माणिकगड २८.सिंदगड २९.मंडनगड ३०.बाळगड ३१.महिमंतगड ३२.लिंगाणा ३३.प्रचीतगड ३४.समानगड ३५.कांगोरी ३६.प्रतापगड ३७.तळागड ३८.घोसळगड ३९.बीरवाडी ४०.भैरवगड ४१.प्रबळगड ४२.अवचितगड ४३.कुंभगड ४४.सागरगड ४५.मनोहरगड ४६.सुभानगड ४७.मित्रगड ४८.प्रल्हादगड ४९.मंडनगड ५०.सहनगड ५१.सिकेरागड ५२.वीरगड ५३.वीरगड ५४.महीधरगड ५५.रणगड ५६.मकरंदगड ५७.भास्करगड ५८.माहुली

१४.प्रांत कऱ्हाड :- ह्यात
१.वसंतगड २.मच्छिंद्रगड ३.भूषणगड ४.कसबागड असे चार
किल्ले होते ..

आणखीन वेगवेगळ्या बखरीत १५१गडकिल्ल्यांची नावे आढळतात ..
ह्या एकंदर किल्ल्यानपैकी एकशे एकर किल्ले महाराजांनी नवे बांधले आहेत ..

अस्सल पत्र


या अस्सल पत्राचा अधिकाधिक प्रचार व प्रसार करावा मित्रांनो!

शिवछत्रपती व समर्थ रामदास यांचा काही संबंध नव्हता असा धादांत खोटा अपप्रचार करणा-या राष्ट्रद्रोही शक्तींच्या तोंडावर मारायला असे पुरावे नेहेमी आपल्या संग्रही बाळगत जा!

श्री क्षेत्र चाफळची रामनवमी ची यात्रा व इतरवेळीही याठिकाणास कोणाचाही उपद्रव होऊ नये,म्हणून कोलच्या सुभेदारास जातीने हजर राहून यात्रा सुखरूप पार पाडण्याची सूचना श्री शिवाजी महाराजांनी या पत्रात केली आहे....

श्री क्षेत्र चाफळ रामनवमी यात्रेसंदर्भात सुभेदार गणेश गोजदेउ यांना शिवरायांचे पत्र...

१५९४ श्रावण शुद्ध ९

श्री

मशहुरल हजर राजश्री गणेश गोजदेउ सूबेदार व कारकुन सुबा ता कोल प्रती राजश्री शिवाजीराजे दंडवत शुहुर सन सलास सबैन व अलफ कसबे चाफल तेथे रामदास गोसावी आहेती व श्री रघुनाथ चे देवालये केले..यात्रा भरते सर्वदा मोहछाये चालतो तेथे कट्कीचे सिपाही व बाजे लोक राहताती..ते देवाची मर्यादा चालवीत नाहि..यात्रकरू लोकांची बरेच कलागती करून तसवीस देताती म्हणून कलो आले तरी लोकांस ताकीद करणे..आणी यात्रेमधे हो अगर कोणाचा उपद्रव अगर चोराचिरटीयाचा दगा अगर तुरकाचा उपद्रव काही होउ नेदणे..सालाबाद यात्रा राखताती तैसे ता मा चे कारकून संगीजातीने यात्रा राखेत गोसावी यांचा परामर्श करीत देवाकरीता व गोसावीयांकरीता ब्राम्हण येउनु नवी घरे करून राहताती त्यांचा परामर्श घेत सुखरूप राहे ते यात्रा भरे मोहछाये चाले ते करणें तुम्ही ही ********** जाणे अंतर पडो नेदणे छ ७ रविलाखर मोर्तब सूद....

मर्यादेयं विराजते

(मूळ पत्र खालील लिंकवर उपलब्ध)

लिंक--> http://www.dasbodh.com/p/blog-page_707.html

शंभुराजे, वाघच होता..



शंभुराजे, वाघच होता..
कापत सुटला मोगलाना तरी
औरंग्या नुसता
बघत होता..

पराक्रम ऐसा नजर फिरली
ती विजयाची दिशा
होती..
रयतेच्या सुखासाठी त्याला
सत्तेची नशा
होती..

ज्याच्या पराक्रमाने फाटले
आभाळ..
औरंग्याच्या काळजात केला
जाळ..
भासला ऐसा महाकाळ..
करुन गेला मृत्युलाही
घायाळ..

गाजवीली रणांगने ऐसा
दिमाखदार होता..
वचनाला जागलेला वतनाचा
वतनदार होता..

गर्जला मराठा छावा..
वाटला देवाला हेवा..

धर्मवीर शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो

★ ।। ध्येयमंत्र ।। ★


★ ।। ध्येयमंत्र ।। ★

शिवरायांचे आठवावें रुप। शिवरायांचे
आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप । भुमंडळी।।१।।

शिवरायांचा कैसें बोलणें । शिवरायांचे कैसें चालणें ।
शिवरायांची सलगी देणें । कैसी असे ।।२।।

सकल सुखांचा केला त्याग । म्हणोनि साधिजे
तो योग ।
राज्यसाधनाची लगबग । कैसी केली ।।३।।

याहुनी करावे विशेष । तरीच म्हणवावें पुरुष ।
या उपरीं आता विशेष । काय लिहावे ? ।।४।।

शिवरायांसी आठवावें । जीवित तृणवत मानावें ।
इहलोकीं परलोकीं उरावे । किर्तीरुपें ।।५।।

निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसीआधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ।।६।।

★ ।। प्रेरणा मंत्र ।। ★

धर्मासाठी झुंझावें । झुंझोनीं अवघ्यासी मारावें ।
मारितां मारितां घ्यावें । राज्य आपुलें ।।१।।

देशद्रोही तितुके कुत्ते । मारोनि घालावें परते ।
देवदास पावती फत्ते । यदर्थीं संशोयो नाही ।।२।।

देव मस्तकीं धरावा । अवघा हलकल्लोळ करावां ।
मुलुख बडवावा कीं बुडवावा । धर्मसंस्थापनेसाठीं ।।३।।

।। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज
की जय ।।
।। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय ।।
।। भारत माता की जय ।।
।। हिंदू धर्म की जय ।।

संकलन :: रमेश जाधव.

'हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडचा महादरवाजा"

रायगडचा महादरवाजा पाहूनच किल्ल्याच्या बळकटिचा अंदाज़ येतो.
किल्ल्याचे प्रवेश द्वार हे गोमुखी पद्धतीचे आहे .
म्हणजेच किल्ल्याचा दरवाजा दोन बुरुजंच्या आत लपलेला आहे ..
अगदी जवळ गेल्या शिवाय महादरवाजा दृष्टित येत नाही .
दरवाज्यातून आत जाणारी वाट ही अरुंद अणि बुरुजत लपलेली आहे
म्हणजे शत्रु आत घुसलाच तरी किल्ल्यात येताना त्याचे संख्याबळ काहीच उपयोगात येत नाही
कारण वाट अगदीच अरुंद असल्या कारणाने बुरुजा वरून आत घुसनार्या सैन्यावर सहज मारा करत येतो
अणि रास्ता अरुंद असल्या कारणाने शत्रूला तिकडे रोखणे शक्य होते


नरवीर तानाजी मालुसरे ह्यांची तलवार...

Wednesday, 4 March 2015

किल्ले रायगडावरील " अष्टप्रधानमंडळ "…!!!

शिवभक्तनो ही माहिती जरूर वाचा…!!!
आणि share करा…!!!

शिवकालीन अष्टप्रधानमंडळ
शिवकालीन अष्टप्रधानमंडळ शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला. शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना अतिशय व्यापक व प्रभावी होती. या कल्पनेमुळे निर्वीकार पडलेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली. या समारंभ प्रसंगी शिवाजींनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती हाच स्वराज्याचा सार्वभौम व सर्वसत्ताधारी होता. त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते, राज्याच्या सर्व क्षेत्रात त्याची निरंकुश सत्ता चालत होती. न्यायदानाचे अंतीम अधिकार छत्रपतींकडेच होते. याचप्रसंगी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान पद्धती स्वीकारली. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मंत्र्यांकडे सोपवली होती. ते आपल्या कामाबद्दल वैयक्तिकरित्या छत्रपतींना जबाबदार असत. राज्याभिषेकावेळी अष्टप्रधान पद्धती पूर्ण झाली. यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्र्यांना संस्कृत नावे दिली. ही मंत्रीपदे वंश परंपरागत न ठेवता, कर्तबगारीवर ठरवण्यात येत असत. या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री कार्यरत होते.

पंतप्रधान (पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानालाच सांभाळावा लागत असे यावरुन या पदाचे महत्त्व लक्षात येते. पंतप्रधानाला वार्षिक १५ हजार होन, पगार मिळत असे.