Monday, 14 December 2015

।। एक आवाज एकच पर्याय ।। ।।जय जिजाऊ जय शिवराय।।

उभाच राहीन नेहमी,
गाथा तुमच्या पराक्रमाची,
आठवन सदा करुन देईन,
मराठ्यांच्या इतिहासाची.....
कहाणी भगव्या रक्ताची..
हादरलेल्या तख्ताची..
जिजाऊंच्या दुधाची..
गुलामगीरीच्या क्रोधाची..
जन्म देणा-या मातेची..
पराक्रमाच्या प्रथेची..
शिवरायांच्या धैर्याची..
शंभुच्या शौर्याची..
तळपत्या भवाणीची..
उफानत्या ईंद्रायणीची..
मावळ्यांच्या शक्तीची..
तंत्रशुध्द युक्तीची..
सह्यांद्रीच्या माथ्याची..
रायगड्याच्या पायथ्याची..
फौलादी छातिची..
तलवारीच्या पातीची..
रणागंनाच्या मातीची..
मराठ्यांच्या जातीची..
रयतेच्या भक्तीची..
भगव्याच्या शक्तीची..
स्वराज्य प्राप्तीची..
स्वातंत्र्याच्या तृप्तिची..
।। एक आवाज एकच पर्याय ।।
।।जय जिजाऊ जय शिवराय।।


No comments:

Post a Comment