Wednesday, 23 December 2015

तुम्हाला कळतंय का.… काहीतरी चुकतंय आपलं.

तुम्हाला कळतंय का.… काहीतरी चुकतंय आपलं.

वाघाच्या समोर पडलेल्या, भीतीने सर्व अवसान गळलेल्या परिस्थितीतही वाघासमोर हात जोडणार्या हतबल माणसाचे शुटींग करू पण स्वताच्या कपड्यांचा दोरखंड करून त्याला बाहेर नाही काढणार.

वर्दीच्या माजाने बेधुंद झालेला एखादा पोलिस एका तरुणाला अकारण शिवीगाळ करतोय - मारतोय तर त्याचा विडीओ काढू पण सर्वांनी एकत्र येउन त्या पोलिसाला समज देण्याचे धाडस नाही करणार.

एखादा घमेंडी मुलगा बेदरकारपणे एखाद्या तरुणीच्या गाडीवर स्वताची गाडी ठोकून मर्दुमकी दाखवताना त्याला एक कानाखाली वाजवून जागेवरच त्याची औकात दाखवण्या ऐवजी एखाद्या वाहनाच्या आडून शुटींग करण्यात धन्यता मानणार.

वेगवान लोकल गाडीतून पडत असताना जीवाच्या आकांताने मदतीची याचना करणार्या आणि आपल्या डोळ्यासमोर मरणार्या तरुणाचे शुटींग करू पण झटकन त्याच्या कंबरेच्या पट्ट्याला घट्ट धरून त्याचे प्राण वाचवण्याचा साधा प्रयत्नही नाही करणार. 

सोशल नेटवर्किंग वरची झटपट प्रसिद्धी आणि फेसबुक च्या लाईक याच्यासाठी काहीही करूअरे हे झालं तेव्हा मी स्वतः तिथे होतो हे मोठ्या फुशारक्या मारत सांगू पण जे सहज टाळता आलं असतं त्याचा विषयपण नाही काढणार.

ही प्रवृत्ती आता बदलूत अन् समाजाच्या कामी येवूयात

सेन्सेशनल पोस्ट पुढे पाठवताना इमोशनल अप्रोच मागेच राहत चाललाय याच्याकडे लक्ष नाही आपलं.. 

खरचचुकतंय आपलंकाहीतरी चुकतंय आपलं.
म्हणून नक्कीच यापुढे समाजपयोगी कामे करुया.


No comments:

Post a Comment