Monday, 21 December 2015

छत्रपती शिवाजी महाराज युद्ध मोहिमे वरती जाताना आपल्या आई जिजाऊ न सोबत व महाराण्यान सोबत चर्चा करत
ज्या काळा मध्ये स्त्रियांना कुठले हि स्वातंत्र्य नसताना महाराजांनी त्यांना प्रतेक क्षेत्रात प्रधान्य दिले
महाराज मोहिमे वरती असतांना जिजाऊ स्वराज्याचा कारभार सांभाळत
आपल्या सुनांना प्रशाशनाचे हक्क अधिकार दिले
स्त्री स्वातंत्र्याची सुरवात त्यांनी आपल्या घरातून सुरु केली.


" शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाण ! आनंदाने नांदत होते बहुजन-मुसलमान !! म्हणजेच शिवराज्यामध्ये मुस्लिमांना किती आदराने वागवलं जायच हे यावरुन स्पष्ट होते. मात्र काही जात्यांध संघटना शिवरायांच्या नावाचा गैरवापर करुन त्यांची प्रतिमा मुस्लिमविरोधी असल्याचे सांगतात. त्याच संघटना जातीय दंगली घडविण्यात यशस्वी होतात. सर्वसामान्य मूलनिवासी बहुजन समाज़ातील आणि मुस्लिमांची मुले या दंगलीत धर्माच्या नावाखाली वापरल्या जातात व सत्यशोधक शिवबांच्या नावावर मुस्लिमांचा तिरस्कार करणारे समाज कंटक स्वत: सुरक्षित राहतात......... जय जिजाऊ....... जय शिवराय

No comments:

Post a Comment