Saturday, 19 December 2015

श्री छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा...

स्वराज्य होउन सुशासन व्ह्यायला अवघ आयुष्य काय तर सात जन्म सुद्धा वाट पहावी लागली असती. आणि त्यासाठी लागणारा विवेक हा राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज ह्यापाशी होता...
हिन्दवी स्वराज्याचा होम धगधगत ठेवण्यासाठी लाखो मराठी स्वराज्याचे शिलेदार आपल्या उभ्या आयुष्याच्या आणि संसाराच्या आहुत्या देत होते..
अथक परीश्रम करून स्वराज्याचा ची पाळमुळ रचून त्या अभेद्य वटवृक्षाची सावली आपल्या पुढच्या पिढीला मिळावी अशी दूरदृष्टी श्रीशिवप्रभुंची होती..
भविष्यात कश्मीर पासून कन्याकुमारी परीयंत हिंदवी स्वराज्य प्रस्थापित होईल आणि होणारच आणि ह्या मराठी साम्राज्याचा राजा ही जबरदस्त असला पाहिजे. ह्याचा विचार शिवप्रभुनी केला असणारच.
त्याच्या समोर हिंदवी स्वराज्याचा भावी छत्रपतींची मुर्ति उभी.
हुशार, कर्तबगार, शुर लढ़वय्या शिपाई गडी, संस्कृत पड़ींत जनू असे
एका सम्राटाचे वलय त्यांना लाभले होते. महाराणी जिजाऊसाहेब ह्यांच्या पंखाखाली वाढलेले. दिल्ली पासून दक्षिणे परियन्त च्या राजकारणात न्हाहुन निघालेले. शिवरायांन एवढेच पुरंदर, वीर धुरंधर, धर्मवीर छत्रपती ते...
जैसे शिवप्रभुंनी जानिले तैसेचि शंभूराज्यांनी स्वराज्य सांभाळले...
ह्या वीरनृपाचा जन्म आज किल्ले पुरंदर वर झाला...
श्री छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा..

No comments:

Post a Comment