Monday, 14 December 2015

★ शिवाजी महाराज व बाल संभाजी राजे दिसायला कशे होते?? ★
२९-मे-१६६६ रोजी परकलदास कल्यानदासाला पत्रात लिहितो. अस्सल पत्र राजस्थानी घुंगराली भाषेत आहे. _(Shivaji's Visit to Auragnzib ata Agara_Rajasthani Records)
"पहाणाराला शिवाजी किरकोळ व बुटका असल्यासारखा वाटतो (अस्सल पत्रात_ "अर सेवोजी (शिवाजी) डील तो हकीर छोटो सो ही देखता दिस जी."). त्याचा चेहरा रंगाने फ़ारच सुंदर असून तो कोण आहे याची चवकशी नकरितां तो लोकांचा राजा असला पाहिजे असें दिसून येते (पत्रात_ "अर सुरती बहुत अजाइब गौरो रंग उपुछो राजवी दीसौ जी।"). त्याचें धैर्य व धाडस स्पष्ट दिसून येते. तो फ़ार मोठा पराक्रमी व उग्र प्रक्रुति असून त्याला दाढी आहे
(पत्रात_"हिम्मती मरदानगी ने देखतां ही असौ दिसोजु बहुत मरदानो हिम्मतवुलंद आदमी छो। सेवाजी (शिवाजी) के डाढी छै।). त्याचा मुलगा नौउ वर्षांचा आहे व तो दिसण्यास अप्रतिम देखणा व रंगाने गोरा आहे (पत्रात_"और सेवाजी (शिवाजी) को बेटो वरस ९ को छै, सु भी वहत अजाइब सुरती छै जी गोरो रंगी।")."
राजे आग्र्याला गेले होते तेंव्हा परकलदासाने त्यांना समक्ष पाहिले होते.
🚩🔥॥ हर हर महादेव, जय श्रीराम ॥🚩
🚩॥ जय भवानी, जय शिवाजी.॥🚩







🔥

No comments:

Post a Comment