Saturday, 21 March 2015

गुढीपाडव्याच्या आणि हिंदूनववर्षाच्या कोटी कोटी शिवमय शुभेच्छा

गुढीपाडव्याच्या आणि हिंदूनववर्षाच्या कोटी कोटी शिवमय शुभेच्छा
गुढीपाडव्याच्या दिवशी वर्षारंभ करण्याचे नैसर्गिक, ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्त्व !
महत्त्व : इसवी सन १ जानेवारीपासून, आर्थिक वर्ष २१ मार्चपासून, हिंदू वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून, व्यापारी वर्ष कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून, शैक्षणिक वर्ष जूनपासून, सौर वर्ष, चांद्र वर्ष व सौर-चांद्र वर्ष (लुनी सोलर) या वर्षांचेही निरनिराळे वर्षारंभ, इतके वर्षारंभ करण्याचे दिवस आहेत. यांत सर्वत्र बारा महिन्यांचेच वर्ष आहे. `वर्ष बारा महिन्यांचे असावे', असे प्रथम कोणी सांगितले व जगाने ते कसे मान्य केले ? याचा प्रथम उद्‌गाता `वेद' आहे. वेद हे अतीप्राचीन वाड्गमय आहे, याबद्दल दुमत नाही. `द्वादशमासै: संवत्सर: ।' असे वेदात आहे. वेदांनी सांगितले म्हणून ते जगाने मान्य केले. या सर्व वर्षारंभांतील अधिक योग्य प्रारंभदिवस `चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा आहे. १ जानेवारीला वर्षारंभ का, याला काहीही कारण नाही. कोणीतरी ठरविले व ते सुरू झाले. याउलट चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक व आध्यात्मिक कारणे आहेत.
नैसर्गिक : ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत- संपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त व विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) व वसंत ऋतू सुरू होतो. सर्व ऋतूंत `कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे', असे भगवंतांनी श्रीमद्‌भगवद्‍गीतेत (१०:३५) म्हटले आहे. या वेळी समशीतोष्ण अशी उत्साहवर्धक व आल्हाददायक हवा असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.
ऐतिहासिक : या दिवशी
अ. रामाने वालीचा वध केला.
आ. राक्षसांचा व रावणाचा वध करून भगवान रामचंद्र अयोध्येला परत आले.
इ. शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळवला.
ई. या दिवसापासूनच `शालिवाहन शक' सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवला.
आध्यात्मिक
सृष्टीची निर्मिती : ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.
१ जानेवारी नव्हे, तर गुढीपाडवा हाच पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन : `गुढीपाडव्याला सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्‍वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित असल्याने सृष्टी नवचेतनेने भारित होते. याउलट ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्‍वाच्या लयकाळाशी निगडित असते. गुढीपाडव्याला सुरू होणार्‍या नववर्षाची तुलना सूर्योदयाला उगवणार्‍या तेजोमयी दिवसाशी करता येईल.
गुढी उभारण्याची पद्धत:
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा हिंदु धर्मियांचा वर्षातील पहिला सण व नूतन वर्षाचा पहिला दिवस. अभ्यंगस्नान करणे, दाराला तोरणे लावणे व पूजा यांबरोबरच घरोघरी गुढी उभारून हा सण साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्तींच्या राक्षसांचा व रावणाचा वध करून भगवान श्रीराम अयोध्येत परत आले, तो हाच दिवस. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती याच दिवशी केली. अशा या सणाला हिंदूंच्या जीवनात विशेष महत्त्व आहे. सूर्योदयाच्या वेळी प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असल्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी !
गुढीपाडव्याच्या दिवशी तेज व प्रजापति लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. सूर्योदयाच्या वेळी या लहरींतून प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असते. ते जिवाच्या पेशींत साठवून ठेवले जाते व आवश्यकतेनुसार त्या जिवाकडून ते वापरले जाते. त्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी.
गुढीचे स्थान : गुढी उभी करतांना ती दरवाजाच्या बाहेर; परंतु उंबरठ्यालगत (घरातून पाहिल्यास) उजव्या बाजूला उभी करावी.
पद्धत :
अ. गुढी उभी करतांना सर्वप्रथम सडासंमार्जन करून अंगण रांगोळीने सुशोभित करावे गुढी उभारण्याच्या जागी रांगोळीने स्वस्तिक काढून त्याच्या मध्यबिंदूवर हळद-कुंकू वाहावे.
आ. गुढी उभी करतांना ब्रह्मांडातील शिव-शक्‍तीच्या लहरींना आवाहन करून तिची स्वस्तिकावर स्थापना करावी. यामुळे गुढीच्या टोकावर अस लेल्या सर्व घटकांना देवत्व प्राप्‍त होते.
इ. गुढी जमिनीवर उंबरठ्यालगत; परंतु थोडीशी झुकलेल्या स्थितीत उभी करावी.
आंब्याच्या पानांचे महत्त्व
इतर पानांपेक्षा आंब्याच्या पानांत जास्त सात्त्विकता असल्यामुळे त्यांची ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता अधिक असते. गुढीच्या टोकाला आंब्याची पाने बांधली जातात. कोवळया पानांत तेजतत्त्व अधिक असते, म्हणून पूजेत आंब्याच्या कोवळया पानांचा वापर करावा.
कडूलिंबाच्या पानांचे महत्त्व
गुढीला कडूलिंबाची माळ घातली जाते. ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या पानांनंतर कडूलिंबाच्या पानांत जास्त असते. या दिवशी कडूलिंबाच्या कोवळया पानांद्वारे वातावरणात पसरलेल्या प्रजापति लहरी खेचून घेतल्या जातात. प्रजापति लहरी ग्रहण करण्यासाठी आवश्यक गुण सर्वसाधारण व्यक्‍तीत ईश्‍वराकडून येणार्‍या लहरी ग्रहण करण्याची क्षमता खूप कमी असते.
खालील गुण असणारा जीव या लहरी अधिकाधिक प्रमाणात ग्रहण करू शकतो.
१. अंतर्मनापासून सातत्याने ईश्‍वराचे स्मरण करणे
२. गुरु व ईश्‍वर यांच्यावर अढळ श्रद्धा असणे
३. ईश्‍वराची संकल्प शक्‍ती कार्यरत असणे
४. शक्‍तीचा वापर राष्ट्र व धर्म यांच्या कार्यांसाठी करणे
सूर्यास्तानंतर लगेचच गुढी उतरवावी ज्या भावाने गुढीची पूजा केली जाते, त्याच भावाने गुढी खाली उतरवली पाहिजे, तरच जिवाला तिच्यातील चैतन्य मिळते. गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून व प्रार्थना करून गुढी खाली उतरवावी. गुढीला घातलेले सर्व साहित्य दैनंदिन वापरातील वस्तूंच्या शेजारी ठेवावे. गुढीला अर्पण केलेली फुले व आंब्याची पाने यांचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. गुढी सूर्यास्तानंतर लगेचच खाली उतरवावी. सूर्यास्तानंतर १ ते २ तासांत वातावरणात वाईट शक्‍ती कार्यरत होऊ लागतात. सूर्यास्तानंतरही गुढी उभी असल्यास त्यात वाईट शक्‍ती प्रवेश करू शकतात. त्या शक्‍तींचा आपल्याला त्रास होऊ शकतो.
गुढीची पूजा करतांना व गुढी उतरवतांना पुढील प्रार्थना करावी
अ. गुढीची पूजा करतांना करावयाची प्रार्थना : `हे ब्रह्मदेवा, हे विष्णु, या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील प्रजापति, सूर्य व सात्त्विक लहरी आमच्याकडून ग्रहण केल्या जाऊ देत. त्यांतून मिळणार्‍या शक्‍तीतील चैतन्य सातत्याने टिकून राहू दे. मला मिळणार्‍या शक्‍तीचा वापर माझ्याकडून साधनेसाठी केला जाऊ दे.', हीच आपल्याचरणी प्रार्थना !

Thursday, 19 March 2015

आवश्य वाचावे ( गुढी पाडवा संपूर्ण देश भर साजरा होईल )



आवश्य वाचावे

या येत्या दोन दिवसात गुढी पाडवा संपूर्ण देश भर साजरा होईल ....
माझ्या सेक्युलर मित्रांनो,

तूम्ही येशू ख्रिस्ताचा जन्म व फिरंगी नववर्ष जोमाने साजरे केले. तो येशू आपल्या ना देशाचा, ना गोताचा, तरी पन जाउदे. त्यात दोष तुमचा नाही. हा सर्व गळ्यात "लंगोट" घालून "कॉन्व्हेंट" ला शिकल्याचा परिणाम. बघूया तूमचे किती ख्रिस्ति मित्र हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देतात का.??

कदाचित तुम्हाला माझा राग येईल तो स्वभाविक आहे. पण मित्रांनो, याचा एक वेळ विचार करा, अन स्वाभिमानी बना, भारतिय बना... तेवढे तूम्ही समजूतदार आहातच...

हिंदूंनी गुढीपाडवा साजरा करू नये म्हणून औरंगजेबाने छ. संभाजी महाराजांची 40 दिवस हाल करून फाल्गुन अमावस्येला म्हणजे एक दिवस आधी क्रूर हत्या केली .....आपण हा औरंग्याचा मनसुबा साध्य होऊ द्यायचा नाही. आपण गुढीपाडवा जोशातच साजरा करायचा...

आणि हो

फक्त राजकारणी माणसा कडून एकच अपेक्षा आहे पाडव्याच्या " फेर्या " काढतांना भगवाच झेंडा मिरवा, तुमच्या पक्षाच्या झेंडे घरीच ठेवा "हिंदुनववर्ष " आहे हे लक्षात ठेवा. भगवा हे आपल्या अस्मितेचे प्रतिक .…
__/\__

हिंदू असाल तर मेसेज शेअर करून आपल्या सर्व मित्र-मैत्रिणींना जाणीव करून द्या

मुजरा या मराठ्यांच्या राजधानीस

मुजरा या मराठ्यांच्या राजधानीस
मावळ पंढरी, धारकऱ्यांची जननी, शिवरायांच्या कर्तृत्वाची उंची, राजाराम महाराजांची जन्मभूमी, बेलाग, बुलंद.
जेम्स डग्लस, खाफीखान, साकी मुस्तैदखान, मेहमूद हाशिम खालीखान यांसारख्या परकीयांना देखील आपल्या वैभव संपन्नतेवर लिखाणास भाग पाडणारा
किल्ले राजगड......
असो हिमालय किती भव्य तरी
मनी पूजीन राजगडा



Wednesday, 18 March 2015

राजमुद्रा

 

छत्रपती राजाराम महाराजांचे पुत्र शिवाजी यांनीही आपल्या परम्‌प्रतापी आजोबांच्या राजमुद्रेप्रमाणेच आपलीही राजमुद्रा बनवून घेतली. अगदी जशीच्या तशी. फक्त थोरल्या महाराज शिवछत्रपतींच्या मुद्रेतील "शाहसूनो:" अर्थात "शाह(जी)पुत्रा" ऐवजी "रामसूनोः" म्हणजेच "रामपुत्र" हे शब्द घालण्यात आले. सदर मुद्रा ही राजारामपुत्र शिवाजी (दुसरे) यांच्या एका अस्सल पत्रावरील आहे.

: Kaustubh Kasture

सह्याद्री … (जेवढा देखणा तेवढाच राकट, रोद्र, कणखर)



सह्याद्री …
(जेवढा देखणा तेवढाच राकट,
रोद्र, कणखर)
हिमालय दिसायला देखणा, उंच उंच
गगनभेदी गिर्यारोहकांसाठी नेहेमीच आकर्षण.
हिमालय सर करणे अवघड गोष्ट नाही. पण …….

सह्याद्री रौद्र रूप धारण केलेला
कणखर,
हिमालयाच्या पेक्षा थोटकाच पण
सह्याद्री सर करायला सिंहाच काळीज हव.
पायात १०० हत्तींच बळ हवं.
छत्रपती शिवरायांसारखा दृढ निश्चय हवा
भल्या भल्या गिर्यारोहकांच्या काळजाचा
थरकाप उडवनारा सह्याद्री पर्वत
जेवढा देखणा दिसतो तेवढाच रोद्र आहे.

चौर्‍याऐंशी बंदरात हा जंजीरा

चित्रगुप्त याने लिहिलेल्या बखरीत सिंधुदुर्गबाबत पुढील मजकूर नमूद केला आहे :
'चौर्‍याऐंशी बंदरात हा जंजीरा,अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका,अजिंक्य जागा निर्माण केला । सिंधुदुर्ग जंजीरा,जगी अस्मान तारा । जैसे मंदिराचे मंडन,श्रीतुलसी वृंदावन, राज्याचा भूषण अलंकार । चतुर्दश महारत्नापैकीच पंधरावे रत्न, महाराजांस प्राप्त जाहले ।
Photo- late. Gopal Bodhe

Tuesday, 17 March 2015

आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी


वय वर्ष ८४ अखंड शिव शंभूंचा ध्यास , पायात चप्पल न घालत फिरणं ,किल्ले श्री रायगडावरील शिव मूर्तीची पूजा , ज्या गडकोटानी आयुष्यभर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची साथ दिली ते गडकोट तीर्थक्षेत्र व्हावीत यासाठी १ लाखभर धारकरयांची धारतीर्थ मोहीम काढण , शंभू महाराजांचं बलिदान लक्षात राहावं आणि त्याची जाणीव आजच्या पिढिला करून देण्यासाठी कठोर असा बलिदान मास पाळण , शिवाजी महाराजांसारख तेज त्याग आणि शक्ती आम्हाला पण दे म्हणून नवरात्रात गावोगावी दुर्गामातेच्या चरणी हजारोंच्या संख्येने धावत जाण्याचा कार्यक्रम देशाला देण (महाराष्ट्र,कर्नाटक,तामीऴनाडु,दिल्ली,हरीयाना,पानीपत,गुजरात,राजस्थान ई.राज्यात दुर्गामाता दौड सुरु केली ),
छत्रपती परंपरेचा वाढ दिवस मोठ्या हौसेने साजरा करण ,आणि शिवाजी संभाजी रक्तगटाची तरुण पिढी तयार करण्यासाठी आजच्या तरुणाला लाजवेल असा जीवापाड प्रयत्न करण हे फक्त आणि फक्त गुरुवर्य आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजीच करू शकतात.

ज्यांचे आम्ही दास....!
त्याचा रायगडीये वास.....!

असे म्हणत आपले सबंध आयुष्य शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे खरे जीवन आधी स्वत; जगून मग दुसर्यांना जगायला सांगणारे गुरुजी पाहाताना गुरुजींचाच एक श्लोक आठवतो .

जळल्या वीना न उजळे जगतात काही |
मातीत बीज कणिसा स्तव नष्ट होई ||
झीजताच सौरभ सुटे खालू चंदनाचा |
संभाजी मार्ग आमुचा ही समर्पणाचा ||

जसा दिवा स्वतः जळून जग प्रकाशमय करतो तसे गुरुजी एक सन्यासी जीवन जगून हिंदुस्थान ला शिव-शंभू रक्त गटाच्या लोकांचा समाज निर्माण करण्याच्या व्रताशी कटिबद्ध आहेत.

ONE MAN ARMY ..!!

एका सदरा व धोतरावर आयुष्य घालवले.हजारो युवकांना शिवाजी संभाजी महाराजांच्या कार्याचा खरा अर्थ सांगीतला.
आजवर कोणालाही न जुमाननार्या मात्र शिवरायांच्या रक्तातील असणार्या छत्रपती उदयनमहाराज यांच्या डोऴ्यातुन अश्रु उभे करणारे व्यक्तीमत्व...!!!!
" आदरणीय गुरुवर्य संभाजीराव विनायकराव भिडे गुरुजी. "

गुरुजी आमच्या कातड्याचे जोडे करुन तुमच्या पायात घातले तरी तुमचे उपकार फिटणे अशक्य....

ONE MAN ARMY हि संकल्पना खरोखर तुम्हास लागु पडते एका माणसाची ताकत काय असते हे पाहायचे असेल तर एकवेळ नक्की यांना भेट द्या .

हो..अगदी सहज भेट मिळेत..APPOINTMENT वैगेरे ची गरज नाही.
कधी कधी एस,टी .मध्ये सुध्दा भेटतील ,कारण V I P सारखी वेगळी गाडी प्रवासाला त्यांना लागत नाही.
ओठावर मिश्या मावत नाहीत..आणि काळजात शिवाजी-संभाजी मावणार नाहीत..असे व्यक्तिमत्व भेटले कि समजावे हेच ते गुरुजी...

वाकून नमस्कार कराल..तेव्हा..पायात चप्पल सुध्दा .दिसणार नाही.

राजकारण ,सत्ताकारण , अर्थकारण हे सगळे थुंकून टाकून #श्री_शिवप्रतिष्ठान_हिंदुस्थान च्या रूपाने हिंदवी स्वराज्याच्या गुरूजींनी सुरू केलेल्या कार्य चळवळीला सालाम !!!

जय श्री राम
जय भवानी
जय जिजाउ
जय शिवराय
जय शंभुराजे
जयोस्तु हिंदू राष्ट्रम्
जयोस्तु मराठा
जय महाराष्ट्र !!!

॥ राष्ट्रांत निर्मू अवघ्या शिवसुर्यजाळ ॥
॥ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ॥

-संस्कृती फोटोग्राफी