Friday, 27 February 2015



शिवरायांची प्रतिभा ही अतिशय उत्तुंग होती हयात कणभरही संशय नाही. शिवरायांच्या अंगभूत गुणांची बरोबरी तर सोडाच त्याचे एक दशमांश सुद्धा आज कोणात सापडणार नाही हे अगदी सत्य आहे.

किंतु, "शिवरायांना ' कुळवाडीभूषण रयतेचा राजा ' हे विशेषण महात्मा जोतिबा फुले यांनी दिले" ह्याचा जर आधार दिला असता तर फार बरे झाले असते. कारण माझ्या वाचनात आलेल्या फुलेंच्या 'सार्वजनिक सत्यधर्मपुस्तक' हयात तर फुलेंनी शिवरायांना अक्षरशून्य असे उद्बोधुन त्यांनी समर्थ रामदासांच्या कपटजालात फसून शुद्र-अतिशुद्रांच्या ईश्वराने पाठवलेल्या मसीहा मुसलमानांचा पाठलाग केला; असे लिहिलेले मिळाले. मग फुलेंनी शिवरायांना 'कुळवाडीभूषण रयतेचा राजा' हे विशेषण लावले असे म्हणणे हे खुद्द फुलेंना दुतोंडी ठरवते. जे मला तरी उचित वाटत नाही. असो....

"ज्योतिबा फुले ह्यांच्यामुळे जगाला शिवराय माहीत झाले" हां दावा तर अतिशय चुकीचा व जणू शिवरायांच्या प्रतिभेलाच धक्का लावण्याचा अपराध आहे. कारण शिवराय जेव्हा हयात होते तेव्हाच; अर्थात फुले जन्माला येण्याच्या २०० वर्षे आधीच अफझल्याला यमसदनी धाड़ले तेव्हाच शिवरायांची किर्ती जगभर पसरली होती.. अक्षरशः इंग्लंडच्या वृत्तपत्रात त्यांची बातमी छापून आली होती. आणि ५ मोठ्या पातशाह्यांना धुळ चारुन महाबलाढ्य असे हिंदु साम्राज्य निर्माण करून तत्कालीन बहुतांश राजशक्तींच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत शास्त्रोक्त पद्धतीने स्वतःचा राज्याभिषेक करवणार्या व महाराष्ट्रातीलच नव्हे; तर अखिल हिंदुस्थानातील जनमानसावर विलक्षण छाप सोड्णार्या शिवरायांची जगाला ओळख करून दिली हे म्हणणे म्हणजे एखाद्या अफ्रीकन जंगलात राहणार्या कृष्णवर्णी मनुष्याने सुर्याला तेलाचा दिवा दाखवण्यासारखे आहे.

तसेच ज्या फुलेंनी शिवरायांची ओळख जगाला करून दिली असा दावा केला जातोय त्यांनी आपल्या अख्ख्या आयुष्यात शिवचरित्राचे किती पारायण केलेत, त्यावर किती व्याख्यान दिलीत? कारण त्यांनी शिवचरीत्राला जनमानसात पोहोचवण्यासाठी खुप काही कयास घेतले हे सिद्ध करणारा एकही समकालीन पुरावा नाही.

मुळात बहुतांश गोष्टी ह्या तथ्यहीन व केवळ कोरे आरोप आहेत ज्यांचा एकही समकालीन पुरावा उपलब्ध नाही. जसे की; "छञपती शिवरायांनासुध्दा धर्माच्या नावाखाली शुद्र ठरविले होते. राज्याभिषेक नाकारला होता" ह्याला एकही समकालीन पुरावा उपलब्ध नाही.

"महात्मा फुलेंना एक इंग्रजी अधिकारी लिजिट साहेब यांनी इंग्रजीमध्ये असलेला छञपती शिवरायांचा इतिहास थोडाफार सांगितला होता. त्यांना शिवरायांबद्दल उत्सुकता निर्माण झाली".... मुळात; ज्या इंग्रजांना शिवरायांनी आपल्या स्वराज्याच्या सरहद्दीत एक इंचही घुसू दिले नाही... ज्यांना कधी उभेही केले नाही... त्या इंग्रजाकडून शिवचरीत्र समजले; ते ही महाराष्ट्रातच जन्मलेल्या एका महाराष्ट्रीयन माणसाला.... हे म्हणजे महताश्चर्यच म्हणावे लागेल... ह्याचा अर्थ असा निघतो की हां माणूस एकतर कधीही महाराष्ट्राच्या मातीशी जुडला नसावा; किंवा त्याला शिवरायांविषयी फार काही आपुलकीच नसल्याने त्याने त्यांच्या चरित्राविषयी कधी अभ्यास केला नसावा, अन्यथा त्याला आपल्या स्वजनांवर विश्वास नसावा.

"टिळकांनी फुलेंच्या सामाजिक क्रांतीला धर्मप्रतीक्रांतीत परावर्तित केले आणि बहुजन राजा ब्राम्हणी बंदीगृहामध्ये बंदिस्त केला" हां तर अतिशय हास्यास्पद दावा आहे... कारण स्वतः फुलेंनी आपल्या पोवाडयात समर्थ रामदास स्वामींना शिवरायांचा गुरु संबोधून त्यांनी शिवरायांना उत्तेजित केल्याने ते मुसलमानांच्या पाठीमागे लागले असा दावा केलाय... ह्याचा अर्थ; स्वतः फुले हे मानतात की शिवराय ज्याला वर लेखकाने ब्राम्हणी धर्म संबोधले आहे त्या सनातन हिंदु धर्मासाठी मुसलमानांविरोधात लढले (ज्यांना फुले आपले मसीहा मानतात). पुन्हा; शिवरायांच्या समकालीन सर्व साहीत्यात; मग ते कवी भूषण ह्यांच शिवभूषण असो, की स्वामी परमानंदांच शिवभारत असो, की सभासद बखर असो, प्रत्येकात हे जागोजागी अगदी स्पष्ट जाणवते की शिवराय हे ज्याला वरील लेखक ब्राम्हणी धर्म म्हणून उपालंभ देतोय त्या सनातन हिंदु धर्माचे परम निष्ठावान, कट्टर पुरस्कर्ते व त्याला मानणारे होते.... ह्या संबंधी बरेच आधारभूत प्रसंगही शिवचरीत्रात सापडतात... जाणकारांना जास्त बोलणे न लगे.

आणि जे इंग्रज जगभर स्वतःच्या कपटपूर्ण निती विषयी जगभर प्रसिद्द होते; व ज्यांनी शिवरायांना नेहमी एक शत्रु म्हणूनच पाहीले, त्या इंग्रजाकडून कोणत्या प्रकारचे शिवचरीत्र शिकले असावे हे स्पष्टच आहे.... व अशा माणसाकडून शिवचरीत्र शिकून काय धारणा बनणार हे ही अगदी स्पष्ट आहे.

आता राहीला शेवटचा व सर्वात महत्वाचा मुद्दा.... शिव-समाधी शोधाचा.. तर त्यावर अखेरचे २ शब्द....

शिव-प्रभुंची समाधी जेथे आहे ते रायगड ही शिव-प्रभुंनी स्थापन केलेल्या हिंदु साम्राज्याची राजधानी.. तेव्हा १६७४ मध्ये शिवराज्यभिषेकापासून ते १८१८ मध्ये इंग्रजांकडून झालेल्या मराठेशाहीच्या पतनापर्यंतच्या एकुण १५० वर्षात फार तर मधले एक ते दीड दशक सोडले तर (जेव्हा रायगड जंजीऱ्याच्या सिद्दीकड़े होते व नंतर १७३५ मध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांनी पहिल्या छत्रपती शाहुंसाठी तो जिंकुन दिला), बहुतांशी रायगड हे शिव-प्रभुंच्या वंशजांकड़े, अर्थातच मराठ्यांकड़ेच होते. त्यामुळे आणि शिवप्रभुंच्या व्यक्तिमत्वाविषयी महाराष्ट्रातील असलेला जनमानसातील स्नेह व आदर भाव पाहता पुढील ३०-४० वर्षातच शिव-प्रभुंची समाधी हरवणे किंवा विस्मृतीत जाणे कदापि शक्य नाही.

पुन्हा; १८१८ मध्ये इंग्रजांसमोर मराठ्यांच्या पतनानंतरही जो तह झाला तो सातार्याची गादी व इंग्रज यांच्यात झालाय.
त्यावेळी अजिंक्यतारा, रायगड व परळीचा किल्ला याचा ताबा सातारकरांनी स्वत:कडे ठेवला होता.

अजिंक्यतारा- निवासस्थान
परळीचा किल्ला- गुरूस्थान
रायगड- राजधानी.

ह्याचा अर्थ; १८१८ नंतर ही बऱ्याच काळ रायगड हे सातारा गादीकड़े होते; जे की शिव-प्रभुंचेच वंशज होते ...

त्यामुळे समाधी न तर हरवली होती न विस्मृतीत पडली होती... हां केवळ एक खोटा प्रचार आहे... अप-प्रचार.... तसेही समाधी काही कोणाच्या खिशातील पाकीट किंवा एखाद वस्तु नाही की हरवेल.... व जिचा शोध लावावा लागेल....

मुळात, सदोदितच्या युद्धजन्य स्थितीमुळे व इंग्रजांनी केलेल्या तूफ़ान मार्याने रायगडची पडझड झालेली होती... आणि जे रायगडाने झेलले तेच काही प्रमाणात समाधीने ही... त्यामुळे समाधीची वास्तू थोड़ी जीर्ण झाली होती.... जिचाच जीर्णोद्धार पुढे १९१३ मध्ये टिळकांनी पुढाकार घेऊन करवून घेतला. त्याचे छायाचित्र आजही उपलब्ध आहे.

किंतु; काही हिंदु धर्म-द्रोही व ब्राम्हण-द्वेषी उपटसुंभ प्रवृत्तींना एका ब्राम्हणाला मिळत असलेले हे श्रेय पाहवले नाही... व त्यांनी समाधी शोधाची काल्पनिक स्टोरी बनवून तीचा प्रचार केला... मुळात, फुलेंच्या समाधीच्या शोधाचा एकही समकालीन ऐतिहासिक पुरावा उपलब्धच नाही.. जसे की एखादे तेलचित्र, किंवा एखाद्या वर्तमानपत्रात बातमी.... किंवा फुलेंच्या एखाद्या सोबतीने आपल्या लिखाणात कुठे नमूद केलेले त्याचे वर्णन वगैरे....

त्यामुळे त्यांच्या समाधी-शोधाचा हां दावा पूर्णपणे फोल असून त्यामागे द्वेषपूर्ण वृत्तीने रचलेले कारस्थान मात्र आहे.... तेव्हा असा हां खोटा इतिहास व अप-प्रचार त्वरीत थांबवावा ही विनंती...

हर हर महादेव जय श्रीराम
जय भवानी जय शिवाजी......!!!!

पाचाडचा जिजाबाईंचा वाडा : -
उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाडाची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास ‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात.

तोफा बद्दल थोडसं...
बांगडी तोफेची नाळ घडीव लोखंडापासून केलेली असते. लोखंडी गोलावर पट्ट्या एका आधारावर रचून त्यावर लोखंडी धाव गरम असताना चढवली जाते. थंड झाल्यावर ही धाव चप पट्टयांमधील जागेवर सांधली जाते. अशा अनेक धाव जोडून तोफेची नाळ तयार करत.तोफेच्या मागच्या आणि पुढच्या बाजूस अधिक बळकटी यावी म्हणून जास्तीच्या धावा साधण्यात येत असे.
जंजिर्यामधील कलाल बांगडी तोफेच्या रचनेत लोखंडी पट्टयांचा वापर दिसून येत नाही पण मुल्हेर येथील शिवप्रसाद / रामप्रसाद या तोफांमध्ये लोखंडी पट्ट्या वापरलेल्या दिसतात.
चारशे वर्षापासून असलेल्या बांगडी तोफा पुरातन हिंदुस्तानी कारागिरांच कौशल्य सिद्ध करतात.

- इतिहासाच्या झरोक्यातून...


औरंगजेबला महाराजांची धास्ती

इ.स.१६६६ दरम्यान शिवाजी महाराज आग्रा कैदेत असतांना त्यांच्या भीतीने औरंगजेब आग्र्‍याच्या किल्ल्यातून समोरच असलेल्या जामा मशिदीत नमाज पढावयास जातांना इतका प्रचंड आरक्षक व्यवस्था (बंदोबस्त) ठेवतो, याचे त्या वेळी सर्वांनाच आश्चर्य वाटले होते; पण शिवाजीराजांच्या भीतीपोटी तो असे करत असे, याचा उल्लेख राजस्तानी पत्रात आहे.

संदर्भ : Shivaji's Visit to Aurangzib at Agra -सर जदुनाथ सरकार

#आग्रा_भेट_प्रकरण
#आवर्जून_वाचावे_असे_काही

“मावळा” काल आणि आज...
१९ फेब्रुवारी १६३०,नाही.. १६२७ कदाचित पण मला वाटत १६३० ठीक. हा प्रश्न मलाच नाही तर समस्त शिवप्रेमी मावळ्यांना पडला आहे कि महाराजांचा जन्म कधी झाला.आणि त्यांचा जन्म दिवस तिथी नुसार साजरा करायचा कि तारखे नुसार...??? असो..
“१९ फेब्रु.१६३०” साली महाराष्ट्राच्या भूमीवर देव देश धर्म रक्षणार्थ साक्षात महादेवाने शिवरायांच्या रुपात जन्म घेतला आणि बघता बघता आईसाहेब जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाने शिवरायांनी स्वतःच्या मनगटाच्या बळावर श्रींच हिंदवी स्वराज्य म्हणजे रयतेच राज्य स्थापन केलं.
६ जून १६७४ ला छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक सोहळा पंडित गागा भट्ट यांच्या हस्ते संपन्न झाला आणि रयतेचं स्वराज्य स्थापन झालं.राजसिंहासना कडे महाराजांची पाऊले चालत असतांना पहिल्या पायरीवर महाराजांचे चरण स्पर्श होताच महाराजांच्या कानावर आवाज आला राजं... महाराजांनी आवाजाच्या दिशेला नजर टाकली तर त्यांना दिसला तो मावळा तानाजी मालुसरे त्यांना आठवण झाली ती “राजं आईसाहेबांचं स्वप्न हाय नवं कोंढाणा स्वराज्यात आणायचा असं मग आधी लगीन कोंढाण्याच आणि मग माझ्या रायबाचं” स्वतःच्या पोटच्या पोराचं लग्न बाजूला ठेवून स्वराज्यासाठी कोंढाणा काबीज करायला गेलेला तानाजी परत आलाचं नाही.गड आला पण सिंह मात्र गेला. महाराजांनी दुसरी पायरी चढली आणि तितक्यात त्यांच्या चरणाला स्पर्श केला तो न्हाव्याच पोरग मावळा शिवा काशीदनं तो म्हणाला महाराज तुमची कापड अंगावर घातली आणि हा देह पवित्र झाला. भाला छातीत आरपार घुसला व्हता बघा, पण तरीबी आम्ही झुकलो नाय कारण डोक्यावर जिरेटोप होता नं राजं.शिवाजी महाराज म्हणून मरण आलं धन्य झालो आम्ही आमच्या जिवनाच सार्थक झालं.शिवा काशीद सारखा मावळा महाराजांना भेटला आणि त्याने शिवरायांचे रूप धारण करून मोघलांच्या छावणीत घुसून महाराजांच्या छातीवरील घाव स्वतःच्या छातीवर झेलून जिवनाचं सार्थक केलं
महाराज सिंहासनाच्या जवळ आल्या नंतर महाराजांच्या समोर उभे ठाकले ते म्हणजे मावळा बाजीप्रभू देशपांडे आणि महाराजांना म्हणाले महाराज एका वडीलकीच्या नात्यानं संगतोया कि मुकाट्यान तुम्ही पालखीत बसून विशालगड गाठा तो पर्यंत मी या खिंडीत या मोघलांना अडवून धरतो जो पर्यंत या देहात प्राण आहे तोवर एकबी गनिमाला खिंडीतून पुढे जाऊ देणार नाही.लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगलाचं पाहिजे.आजही हे शब्द त्या खिंडीत गुंजत आहे.इतकाच नाही तर त्या मावळ्यांच्या रक्तान ती खिंड पावनखिंड म्हणून ओळखली जाऊ लागली. असे अनेक मावळे स्वराज्याच्या कामी आले कित्येक मावळ्यांनी स्वतःच आयुष्य स्वराज्याच्या निर्माणासाठी खरची घातलं, मावळ्यांनी शिवरायांना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं आणि स्वराज्याच रक्षण केलं.स्वराज्य उभ केलं स्थापन केलं.
म्हणून आज ४०० वर्षांचा काळ लोटला गेला असतांना सुद्धा त्यांची नाव अभिमानाने घेतली जातात.त्यांच्यावर काव्य आणि पोवाडे रचले जातात.त्यांच्या शौर्याची गाथा सुवर्ण अक्षरात लिहिली जाते.कारण ते स्वामिनिष्ठ स्वभिमानी कडवट मावळे होते. स्वामिभक्ती,स्वामीनिष्ठा आणि स्वाभिमान यांचा अद्-भूत संगम म्हणजे “मावळा” हि व्याख्या लक्षात ठेवा. इतकच नाही तर महाराजांच्या स्वप्नपूर्तीसाठी राष्ट्राच्या आणि स्वराज्याच्या निर्माणासाठी सह्याद्रीसारखं ठाम पणे उभं राहून शत्रूंच्या तलवारीचे घाव आपल्या छातीवर झेलणारे ते म्हणजे मावळेचं हो.या मावळ्यांच्या फौजे मध्ये कोणी एका जाती किंवा धर्माचा नव्हता तर १८ पगड जाती आणि १२ बलुतेदार यांचा समावेश होता.परंतु आता सर्व काही बदललेलं आहे.
एक काळ असा होता कि त्या काळात एका भगव्या झेंड्या खाली सर्व एकजूट होते परंतु आता तर कोणता झेंडा घेऊ हाती ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.कारण आता गल्ली पासून दिल्ली पर्यंत कार्यकर्ते कमी आणि नेते जास्त झालेत.प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार स्वतःचे संघटन उभारले आहे. त्यामुळेचं आजच्या युवा पिढीला देशसेवा आणि राष्ट्रसेवा करण्यात रस राहिलेला नाही.देशात आज अस एकही नेतृत्व नाही कि ज्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याच्याशी एकनिष्ठ राहून देशाची प्रगती साधता येईल.असे असतांना ४०० वर्षपूर्वी याच मातीत जन्माला आलेल्या शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काही मोजकी मंडळी देशाची प्रगती आणि देव देश धर्म रक्षणाची कार्य करत आहेत.ज्याला ते शिवकार्य असं संबोधतात.
आजच्या परिस्थितीचा जर अभ्यास केला ना तर आज फक्त भाषणबाजी सुरु आहे.
जो नाही तो फक्त बोंबलत हिंडत आहे.’’अस करा..तस करा..यांनी अस केल होत..ते असे जगले..आणि स्वतः मात्र काहीच नाही.आजच्या काळात अहो असे वक्ते आहेत कि ज्यांची भाषणे ऐकतांना लोक भावूक होतात,सर्व भान विसरून तल्लीनपणे ते ऐकतात इतकंच नाही तर त्यांच्या डोळ्यातून पाणी सुद्धा येत.अंगावर शहारे उभे राहतात.परंतु ज्या वेळेस कार्यक्रम संपला एकदा काय त्या श्रोत्यांनी त्यांची चड्डी झटकली कि बस..संपलं भाषण उठा आणि निघा.“गाढवा पुढे वाचली कथा आणि कालचा गोंधळ बराच होता” अशी म्हण तेव्हा तिथे लागू पडते.शिवरायांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज फक्त नजरेने त्यांच्या मावळ्यांशी संवाद साधत होते.आणि मावळे सुद्धा तसे निष्ठेचे होते त्यांना आपल्या राजाला काय हव आहे ते लगेच कळत होत.तिथे शब्दांची गरजचं नव्हती कारण तिथे तो संवाद एका गुरुशिष्यांचा असायचा.देव आणि भक्ताचा असायचा.आता मात्र तस काहीच नाही.
एकदा शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले असतांना तिथून सुटका करून घेण्यासाठी महाराजांनी एक योजना आखली त्यांनी गडाच्या पायथ्याशी असलेल्या न्हाव्याच्या पोराला बोलावलं आणि त्याला शिवाजी महाराजांचे रूप धारण करायला सांगितले त्याने आज्ञाप्रमाण म्हणून ताबडतोब राजांसारखा पोशाख परिधान करून समोर आला आणि महाराजांना मुजरा केला.महाराजांनी त्याला बघितलं आणि थक्क झाले कारण तो चक्क शिवाजी महाराजांसारखा दिसत होता.त्याच नाव होत मावळा शिवा काशीद.महाराज त्याला बोलले शिवा तू हुबेहूब आमच्या सारखा दिसतोस ओळखूपण येत नाही आणि इतक्यात तो शिवा काशीद म्हणाला महाराज ज्या अर्थी तुम्ही सुद्धा आम्हाला ओळखू शकत नाही याचा अर्थ तो गनीम सुद्धा आम्हाला ओळखणार नाही.आणि हे शब्द ऐकताच महाराज त्याला म्हणाले शिवा तुला कस माहिती कि आम्ही तुला शिवाजी महाराज बनवून गनिमांच्या भेटीस पाठवणार आहे. तेव्हा शिवा म्हणाला महाराज तुमची जागा आमच्या हृदयात आहे आणि जे तुमच्या मनात आहे ते आम्हास कळणार नाही.आम्हास सर्व कळल आहे आपली फक्त आज्ञा असावी तुम्ही निश्चिंतपणे गड सोडा तो पर्यंत आम्ही गनिमांना अडवून धरतो.अहो हाच तो संवाद गुरुशिष्यांचा. परंतु आता मात्र हा संवाद आपल्याला बघायला मिळत नाही. कारण आताचा गुरु सुद्धा तितका पावरफुल नाही आणि शिष्य सुद्धा तितका निष्ठेचा नाही.
मी सारख सारख शिवाजी महाराजांचा उल्लेख का करत आहे असा प्रश्न सर्वांना पडला असेल तर तुम्हाला एक सांगावस वाटत कि जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराज हे असं एक व्यक्तिमत्व जन्माला आलं कि ज्यांच्यामुळे आज मंदिरात देव,दारात तुळस आणि समाजात स्त्री जातीला मान आहे.जन्माला आलेल्या नवजात शिशूला हे सांगाव लागत नाही आणि त्याच्यासमोर मांडाव सुद्धा लागत नाही कि शिवाजी महाराज कोण होते इथली मातीच त्याच्या हृदयात शिवरायांच्या कीर्तीची शौर्यगाथा आधीच रेखाटून ठेवते.इतक मोठ कार्य कि जे मांडायचं झाल तर सागरा इतकी शाई आणि गगना इतक पान सुद्धा कमी पडेल.आणि असा कर्तव्यदक्ष जाणता राजा या भूतलावर पुन्हा झाला नाही आणि होणार सुद्धा नाही.म्हणून अश्या परमप्रतापी भोसले कुलाधीकुलभूषनंचा उल्लेख कितीदा जरी केला तरी कमीचं.
आणि असही आजच्या पिढीला वेड लागलं आहे हो शिवबाचं ! गाडीवर,टी-शर्टवर, अंगावर(गोंधन), गळ्यात(लॉकेट), हातात(अंगठी) शिवाजी महाराजांना घेवून फिरतांना दिसत आहे.त्यांच्या अश्या वागण्यामुळे त्यांना महाराजांबद्दल किती आदर,प्रेम आणि अभिमान आहे हे दिसून येते मात्र त्यांची कर्म जर बघितली तर मला या सर्व गोष्टींची लाज वाटते आणि राग सुद्धा येतो त्यांच्या अश्या वागण्याचा.
एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती तिथे ४ मावळे सोबत घेवून राजे शिवाजी महाराज सुद्धा होते म्हणजे यांच्या वेशभूषा साकारलेली मुल सुद्धा होती. ढोलताशांच्या गजरात मिरवणूक सुरु झाली.मिरवणूक सुरु असतांना एका मावळ्याने म्हणजे मावळ्याची वेशभूषा साकारलेल्या त्या मुलाने एका दुसऱ्या मुलाला गुटखा दे अशी मागणी केली. तेव्हा त्याच्या सोबतच्या दुसऱ्या मावळ्याने त्याला जाणीव करून दिली अरे तू मावळा आहे ना आणि तंबाखू काय खातो महाराज बघतील ना मागून.तेव्हा ज्याने त्याला गुटखा आणून दिला तो खालचा मुलगा लगेच बोलला अरे महाराज कशाला काही करतील मी महाराजा कडूनच तर गुटखा मागून आणला.ते सर्व बघून डोळ्यात पाणी दाटलं हो, “श्रोत्यांनो हि आजची सत्य परिस्थिती आहे. अहो ज्यांनी स्वतः शिवाजी महाराज आणि मावळ्यांचा वेश धारण केला त्यांना त्यांची महती कळली नाही तर मग मला सांगा अंगावर आणि गाडीवर तसेच शर्ट वर शिवाजी महाराजांचे चित्र किंवा नाव टाकून आपल्याला शिवराय कळणार आहे का ? शिवाजी महाराज डोक्यावर घेवून फिरण्याचा विषय नाही तर डोक्यात उतरवण्याचा विषय आहे हे कळायला हवं.रस्त्याने जात असतांना जर नजरेस महाराजांचे स्मारक दिसले तर आपल मस्तक आपोआप झुकत आणि ते झुकायलाचं हव परंतु आज त्याच स्मारकाच्या खाली उभ राहून मुलींची छेड काढली जाते.यांच्या गाडीवर मागे लिहिलेलं असत आम्ही फक्त शिवरायांचे भक्त तरी मग तुम्ही नेत्यांच्या समोर झुकताच तरी कसे.शिवरायांचा भक्त स्त्रीजातीचा आदर करतो तिचे रक्षण करतो,अन्याय सहन करत नाही, तो न्यायप्रिय असतो. तसेच शिवरायांचा भक्त म्हणजे मावळे यांनी शिवाजी महाराज सोडले तर कधीच कोणत्या राजा पुढे किंवा बादशहा पुढे ते झुकले नाही आणि त्यांनी कधी पाठीवर कुणाची शाब्बासकीची थाप तर मुळीच घेतली नाही.इथे मात्र महाराजांचे नाव घेवून दीडदमडी साठी आणि पदासाठी पक्षांतर सहज केले जाते.काय हेच का तुम्ही मावळे, आहो तुम्ही कावळे आहात कावळे.
महाराज्यांना एकदा गोवळकोंड्याचा बादशहा कुतुबशहा कडील आमंत्रण आले आणि महाराज त्यांच्या भेटीला गेले तिथे कुतुबशहा ने महाराजांना महाल
दाखवला,सोने-चांदीचा खजाना दाखवला शस्त्रशाळा,घोडेशाळा दाखवली आणि मातंग, बलाढ्य,बळकट,लढाऊ अशी हत्तींचीशाळा दाखवली आणि महाराजांना म्हणाले महाराज तुमच्या कडे सुद्धा असेल ना असे हत्ती तेव्हा महाराज बोलले आमच्या कडे हत्ती नाही पण या हत्तीसारखी माणस मात्र आहे.
तेव्हा त्या कुतुबशहा ने सांगितलं कि ठीक आहे मग तुमच्या कडील हत्तीसारख्या माणसाची आमच्या या हत्तीशी लढाई होऊ द्या.आणि महाराजांनी यसाजी कंक याला आज्ञा केली आणी लगेच यासाजी मुजरा करून हत्तीच्या समोर गेला आणि त्याने एका क्षणात हत्तीला गारद केला कुतुबशहा बघतच राहिला आणि त्याने त्याच्या गळ्यातील सोन्याची माळ बक्षीस म्हणून यासाजी ला दिली आणि तितक्यात यसाजी मागे सरकला आणि बोलला कि आमचे कौतुक करायला आमचे महाराज समर्थ आहे आम्हाला आमच्या पाठीवर कुणाच्या शाब्बासकीची थाप सुद्धा नको. निष्ठा म्हणजे ती हिच.आणि मावळ्यांची शिवरायांबद्दलची स्वामिनिष्ठता म्हणजे हिच आहे.आणि अश्या स्वमिभाक्तांना आम्ही अभिमानाने मावळे म्हणतो.
आजच्या युवा पिढीला इतकच सांगू इच्छितो कि, गड्कील्ल्यांवरती उभे राहून फोटो काढण्यापेक्षा गड्कील्ल्यांसारख ताठ आणि स्वाभिमान धरून उभे रहा तेव्हा शिवरायांच स्वराज्य टिकेल आणि तेव्हा तुम्ही खरे मावळे आहात याची पावती मिळेल.आज अनेक काही संघटना शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून दुर्गसंवर्धन तसेच निस्वार्थ समाजसेवा करतांना दिसत आहे.गडकिल्ले स्वच्छता मोहीम सुद्धा राबवतांना ते दिसत आहे.तर अश्या या संघटनांना पाठींबा देवून त्यांच्या सोबत मिळून स्वराज्याचे गडकोट संवर्धन करण्याच कार्य हाती घ्या आणि ज्या गडकिल्ल्यांनी ४०० वर्षापूर्वी आपले रक्षण केले आज तुम्ही त्यांचे रक्षण करा कारण गडकिल्ले टिकले तर इतिहास टिकेल आणि इतिहास टिकला तरचं राष्ट्र टिकेल आणि जो कोणी हे कार्य करण्यास धन्यता मानत असेल तर तोच खरा मावळा आहे अस मी मानतो.कारण गडकिल्ल्यांची खरी किंमत हि एका खऱ्या मावळ्यालाचं असते.
--------------
मोडेन पण वाकणार नाय हि मावळ्याची जात हाय
अंधाराला घाबरत नाय आभाळाची साथ हाय
मोडेन पण वाकणार नाय हि मावळ्याची जात हाय
शब्दामध्ये गोडवा आमच्या रक्तामध्ये इमानदारी
करत नसतो कधी आम्ही किती कुणाची जहागीरदारी
भगव्या समोर स्वराज्यातच गड्कील्ल्यांचा घात हाय
मोडेन पण वाकणार नाय हि मावळ्याची जात हाय
गड्कील्ल्यांसाठी भांडतो आम्ही मदतीसाठी लढतोय
स्वराज्यात शिवरायांचा रायगड आज रडतोय
हे नुसतेच तांडव नाही आमचे अन्यायावर मात हाय
मोडेन पण वाकणार नाय हि मावळ्याची जात हाय
पुरे झाले तुमचे आता आश्वासनाचे हल्ले
बुरुजासकट जागे करू स्वराज्यातील किल्ले
पाठीवर अजून आमच्या शूर शिवाचा हात हाय
मोडेन पण वाकणार नाय हि मावळ्याची जात हाय
स्मरण ठेवा तानाजीचं मरण आठवा संभाजीचं
स्वराज्यासाठी रक्त सांडल पावनखिंडीत बाजीच
त्यांनी पाठीमागून वार केले हाच मोठा घात हाय
मोडेन पण वाकणार नाय हि मावळ्याची जात हाय
-----------------------------------------------------------------------------------
- सागर महाडिक (शाब्दिक वादळ)
जगदंब

Friday, 20 February 2015


मालवण जवळील कुरटे बेटावर शिवलंका अवतरली.

जंजिरे सिंधूदुर्ग टोपीकर, सिद्दी आणि मोगलांच्या उरावर राज्य करू लागला. ही हवाई नजर टिपली आहे स्व. श्री गोपाळ बोधे सरांनी. पण त्याकाळी अशी साधनं नसताना गरुड भरारी घेणारी नजर असू शकते ति फक्त राजर्षी सिंधू सागराधीपती शिवाजी महाराज यांचीच!

- सुभे आरमार

सुबक
बांधणीचा विस्तीर्ण
असा तलाव #पद्मावती तलाव
#राजगड